हजार रूपये प्रतिखड्डा
बक्षिसांची रक्कम आहे.
सेल्फी विथ खड्ड्यांचा
इरादाही भक्कम आहे.
सेल्फी विथ खड्ड्यांचा
ऑनलाईन गाजावाजा झाला.
कुणी कुणी तर सेल्फी काढताना
थेट खड्ड्यांमध्ये गेला.
सेल्फी विथ खड्डे
कार्यक्रम खूप सोपा आहे !
खड्डेच सांगू शकतात,
नेमकी कुणा-कुणाची
आपल्यावर कृपा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-6405
दै.झुंजार नेता
2नोव्हेंबर2017