हेरले/ प्रतिनिधी दि. २४/११/१७
विभागीय कला -उत्सवात लोकनाट्या स्पर्धेमध्ये श्री भैरवनाथ विद्यालयाने विभागात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.
मानव संसाधन विकास मंत्रालय व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने आयोजित विभागीय कला -उत्सवात लोकनाट्य या कला प्रकारात स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये विभागातूनअनेक संघ सहभागी झाले होते.भुयेवाडीच्या श्री भैरवनाथ विद्यालयाने उत्कृष्ट सादरी करण केल्याने त्यांना प्रथम क्रमांक देण्यात आला . या यशाने संघाची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कला -उत्सव स्पर्धसाठी निवड झाली आहे . या स्पर्धसाठीचे स्क्रीप्ट लेखन व दिग्दर्शन जनार्दन पाटील यांनी तर ई - प्रोजेक्ट -एम् .आर. पाटील , रंगभूषा , वेषभूषा आमानावर व्ही .एम्. तसेच नैपथ्य एन् .आर. कांबळे यांनी काम पाहिले . सर्व यशस्वितांना मुख्याध्यापक पी .एम् . पाटील , डी .व्ही. पाटील व श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ पदाधिकारी यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले .
फोटो - विभागीय विजेता श्री भैरवनाथ विद्यालय संघ मान्यवरांच्या हस्ते बक्षिस स्विकारतांना.