कोल्हापूर प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील
14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी कोल्हापूर येथील केळवकर मेडिकल सेंटर ( डायबेटिस केअर व रिसर्च सेंटर) मार्फत मधुमेह रुग्णांकरीता मंगळवार दि 14 नोव्हेंबर 2017 रोजी मोफत मेळावा आयोजित करण्यात आला होता . सुरुवातीला केळवकर मेडिकल सेंटर पासून जनजागृती रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन अर्जुन माने (उपमहापौर कोमनपा) यांचे हस्ते करण्यात आले. सुरुवातीला प्रसिद्ध वक्ते विठ्ठल कोतेकर यांनी सकारात्मक दृष्टिकोन आणि आरोग्य या विषयावर व्याख्यान दिले. नंतर तज्ञ डॉक्टर्सकडून मार्गदर्शन केले गेले तसेच मधुमेह रुग्णांना तज्ञ वक्त्यांकडून आहार जीवन शैली व्यायाम याबद्दल मार्गदर्शन केले .
उपस्थित रुग्णांचे आहारापुर्वी व आहारानंतर अशी दोन वेळा रक्त शर्करा तपासणी केली . यावेळी अल्पोपहार सोय करण्यात आली होती . डॉ. प्रल्हाद केळवकर, डॉ. सिद्धी कुलकर्णी, डॉ. प्रांजली धामणे व इतर तज्ञ मंडळी चे मधुमेह समज - गैरसमज, मधुमेह व स्त्री आरोग्य, मधुमेह व आहार या विषयावर व्याख्यान झाले .
या मोफत आणि समाजोपयोगी कार्यक्रमात कोल्हापूर आणि परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला . हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी केळवकर मेडिकल सेंटर, कोल्हापूर च्या वतीने सुनंदा पाटील , राजेंद्र नाईकवडी, पापालाल मेस्त्री, संदिप दाभाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.