कसबा बावडा: ७ नोव्हेंबर या दिवशी १९०० साली बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या श्री छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये (तेव्हाचे गव्हर्नमेंट हायस्कूल) पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला होता. त्या वेळी त्यांचे नाव भिवा असे होते. या शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. या घटनेचे स्मरण म्हणून तसेच विद्यार्थ्यांना ‘शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असलेल्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी यासाठी’ महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून ठरविले होते.त्याचाच एक भाग म्हणून कसबा बावडा परिसरातील उपक्रमशील शाळा राजर्षी विद्यामंदिरमध्ये "विद्यार्थी दिवस" मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर दिवशी शालेय आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन मा.अजितकुमार पाटील व शाळेची आदर्श विद्यार्थिनी श्रद्धा दाभाडे यांच्या हस्ते करणेत आले.सदर प्रसंगी मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी डॉ. बाबासाहेबांचे शैक्षणिक जीवन याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचा आदर्श ठेवून जीवन जगावे असा संदेश त्यांनी दिला.
तसेच आजचे शुभ औचित्य साधून शाळेमध्ये हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.यशराज घाडगे,संध्या चौगले (इ.१ली),समृद्धी केसरकर,निखिल सुतार (२री),चिन्मय पोवार जान्हवी कोरवी(३री),पार्थ साठे , सृष्टी काटकर(४थी),राजवर्धन अडनाईक, सानिया कांबळे(६वी), यशराज कदम,श्रध्दा दाभाडे(७वी)आदी विद्यार्थ्यांनी हस्ताक्षर स्पर्धेत क्रमांक मिळवले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंभू गाटे यांनी केले तर आभार अरुण सुनगार यांनी मानले. सुजाता आवटी, उत्तम कुंभार, सुशील जाधव, जयश्री सपाटे,आसमा तांबोळी,कल्पना पाटील ,गायत्री प्रभावळे तसेच भागातील बहुसंख्य पालक उपस्थित होते.