Tuesday 28 November 2017

mh9 NEWS

डाॅ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल: ’इंटरनॅशनल स्कूल अॅवार्ड‘ ने सन्मानित !

पेठ वडगांव
येथील डाॅ.सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल, पेठ वडगांवला ‘ब्रिटिश कौन्सील’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्कूलने सादर केलेल्या अतिउत्कृष्ट प्रकल्पामुळे डाॅ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलला हा पुरस्कार प्राप्त झाला. हा  पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार दिनांक 17/11/2017 रोजी ताज हाॅटेल मुंबई येथे ब्रिटीश कौन्सीलच्या विभागीय संचालिका मिस हेलेन फिलविस्टर यांच्या हस्ते संपन्न झाला. मिस हेलेन फिलविस्टर यांच्या हस्ते स्कूलचे संचालक डाॅ. सरदार जाधव व माध्यमिक विभाग प्रमुख श्री. मारूती कांबळे यांना मानाचा किताब व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
विविध देशातील विद्यार्थ्यांशी प्रोजेक्टमधून संवाद साधता यावा, त्यांच्या विचारांची देवाण घेवाण व्हावी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानवी जीवन, अन्य घटकांचा अभ्यास व्हावा हया हेतूने हे प्रोजेक्ट पाठवले गेले. डाॅ. सायरस पूनावाला स्कूलने एकुण 7 प्रोजेक्ट पाठविले होते. हयामध्ये आंतरराष्ट्रीय जगताची नैसर्गिक संपत्ती, दळणवळणाची साधने, आहार, जल व्यवस्थापन, संस्कृती, नियम, चालीरिती, सण इत्यादी विषयी प्रोजेक्टवजा माहिती श्रीलंका, अफगानिस्तान, पाकिस्तान, इजिप्त, नेदरलॅड, त्रिनीदाद व इराक हया देषामध्ये फेसबुक, व्हाॅटसअॅप, इमेल, व्हिडिओ काॅन्फरन्स  द्वारे पाठवून हे प्रोजेक्ट पूर्ण केलेे.
हे प्रोजेक्ट परदेषात पाठविल्याने विद्यार्थ्यांची अध्ययनवृत्ती वाढली. तसेच परदेषातील विद्यार्थ्यांना ही याचा खूप फायदा झाला. आंतरराष्ट्रीय जगताशी ओळख होण्यास मदत झाली. हे प्रकल्प ब्रिटीश कौन्सीलने ठरवून दिलेल्या मूल्यांकन प्रणालीत पात्र झाल्याने शाळेला हा अॅवाॅर्ड मिळाला आहे.स्कूलने विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करून घेतली. सर्व विद्यार्थ्यांनी यासाठी चांगले योगदान दिले. प्रोजेक्ट सादरीकरण, त्याचा उपयोग, आंतरराष्ट्रीय दर्जा, शैक्षणिक उपयोग, विद्यार्थी सहभाग, तंत्रज्ञानाचा उपयोग, विचार संबंधता  या घटकांचे उत्कृष्ट उपयोजन केल्याने स्कूलला हा पुरस्कार मिळण्यास मदत झाली आहे.
हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व विद्यार्थी, तसेच प्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर व शिक्षक श्री.जावेद नदाफ, श्री विनायक मोहिते, कु. सविता निकम, सौ. चित्रा हगलहोले, सौ. आरिफा शेख, श्री. विद्याधर कांबळे, सौ. माधवी कोतेकर, श्री राकेश ढवळे, श्री.संदिप बावचकर सौ. दिपाली चिर्कोडे यांनी मोलाचा वाटा उचलला. समन्वयक म्हणून श्री मारूती कांबळे यांनी ही जबाबदारी पार पाडली. ब्रिटीश कौन्सील प्रोजेक्ट साठी संस्थेचे अध्यक्ष श्री गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, स्कूलच्या अध्यक्षा सौ. विद्या पोळ यांचे प्रोत्साहन मिळाले.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :