*
कसबा बावडा;दि.२७:
संविधान दिन (राष्ट्रीय विधी दिन) हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान समितीने स्वीकारला होता.याच शुभप्रसंगाचे स्मरण होण्यासाठी व विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व समजण्यासाठी आज राजर्षी शाहू विद्यामंदिर मध्ये संविधान दिन मोठ्या उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.
सदर दिवशी शालेय आवारात निखिल सुतार,वेदांतीका पाटील,पीयूष सणगर,समर्थ कांबळे,जानवी कोरवी,चिन्मय पोवार, वैष्णवी ठोंबरे,या विद्यार्थ्यांनी संविधान प्रस्ताविकेचे मोठ्याने वाचन केले.त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी संविधान वाचण्याचा संकल्प केला.तसेच सदर प्रसंगी मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी संविधान म्हणजे मूलभूत हक्क व कर्तव्ये यांची सोनेरी गुंफण आहे. संविधान म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा.या कायद्याचा आदर्श ठेवून विद्यार्थ्यांनी जीवन जगावे असा संदेश त्यांनी दिला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंभू गाटे यांनी केले तर आभार अरुण सुनगार यांनी मानले. शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य रमेश सुतार,जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार, सुशील जाधव, जयश्री सपाटे,आसमा तांबोळी,कल्पना पाटील,सुलोचना चव्हाण,गायत्री प्रभावळे मॅडम , हेमंतकुमार पाटोळे मंगल मोरे तसेच भागातील बहुसंख्य पालक उपस्थित होते.