हेरले/ प्रतिनिधी दि. १/१२/१७
देशातील छात्रसैनिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची साहसी वृत्ती त्यांच्या पराक्रमांची ओळख, पन्हाळा पावनखिंडीतील पराक्रमांची ओळख होऊन ऐतिहासिक घटना घडामोडीची ज्ञान होऊन छात्र सैनिकांच्या अंगी निर्भिडता व पराक्रमी धाडस निर्माण व्हावे या उदात्त उद्देशान राष्ट्रीय स्तरावरील शिवाजी पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन केले जाते. या मोहिमेतून प्रत्यक्ष महापराक्रमींचा ऐतिहासिक ठेवा व किल्ल्यांचे महत्त्व जाणून संस्कृतीचे ज्ञान आत्मसात करावे असे प्रतिपादन कोल्हापूर एनसीसी ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडिअर पी.एस. राणा यांनी केले.
ते शिवाजी ट्रेकिंग ट्रेलच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. शिवाजी पदभ्रमंती ही राष्ट्रीय स्तरावरील मोहिम असून शुक्रवार दि. १ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता प्रथमतः ब्रिगेडिअर पी.एस. राणा यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पा हार अर्पण केला. तदनंतर शिवाजी पदभ्रमंती मोहिमचे उद्देश सोदाहरण विषद करून ध्वज दाखवून मोहिमेची सुरुवात एनसीसी भवन येथून झाली. याप्रसंगी डेपुटी ग्रुप कमांडर कर्नल एच.एस. राठोर, कमांडिंग ऑफिसर कर्नल आर.के. तिम्मापूर,कर्नल जे.पी. सैकिया, ट्रेनिंग ऑफिसर कर्नल एन.एस. संगा, अॅडम ऑफिसर विश्वनाथ कांबळीमठ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसी यांच्या वतीने शिवाजी पदभ्रमण मोहिमेचे संयोजन केले आहे. ही मोहिमेचे २५वे वर्ष सुरू आहे. यामध्ये श्रीलंका देशातून एक अधिकारी व सहा कॅडेट सहभागी झाले आहेत. देशातून महाराष्ट्र , कर्नाटक, गोवा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश या नऊ राज्यातून ८०० व महाराष्ट्रातून २०० असे एकूण १००० कॅडेट या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
ही मोहिम ५२ कि.मीचीे असून चार दिवस २५० प्रमाणे कॅडेट एनसीसी भवन येथून सुरूवात करतात. प्रत्यक्ष निकमवाडीतून पदभ्रमंतीस सुरुवात होते.पहिला मुक्काम पन्हाळा, दुसरा खुटाळवाडी, तिसरा शाहुवाडी चौथा पांढरपाणी ते बुधवाडीत संपतो. माघारी एनसीसी भवनकडे गाडीतून प्रवास संपतो. या मोहिमेतून विविध राज्यातील . छात्र सैनिकांची ओळख होते. निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक ठिकाणे, किल्ले राजवाडे, पराक्रमी ठिकाणे, प्रतिकूल प्राकृतिक विभाग, निसर्ग सानिध्य यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. या मोहिमेचे संयोजन एनसीसी अधिकारी , सुभेदार मेजर श्रावण यादव, सुभेदार विजय वांगेकर, हरी गावडे, मोहन सुर्यवंशी, राजाराम पाटील, अशोक बांबुगडे, बी एचएम बाजीराव माने, पीआय स्टाफ करीत आहेत.
फोटो
एनसीसी भवन येथून एसटीटी कॅम्पची झेंडा दाखवून सुरूवात करतांना ब्रिगेडिअर पी.एस. राणा व सीओ कर्नल.आर.के. तिम्मापूर
( छाया सुधाकर निर्मळे)