हेरले / प्रतिनिधी दि. २४/१२/१७
हेरले ( ता.हातकणंगले )येथील जिजामाता विद्यालय यांच्या वतीने ग्राहक दिनानिमित्त,"चिमुकल्यां चा बाजार" भरविण्यात आला होता. त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
पहिली ते चौथीच्या विदयार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. फळभाज्या, पालेभाज्या, फळे, खाऊचे पदार्थ आदीसह खेळणी यांचे स्टॉल लावले होते. बाजारामध्ये व्यापारी शेतकरी जसे आपले उत्पादने विक्री करतात. त्याप्रमाणे चिमुकल्यांनी विक्री केली. हा बाजार पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती.
उदघाटन जि. प.सदस्या डॉ.पद्माराणी पाटील व पो.पाटील नयनताई पाटील यांच्या शुभहस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती सरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच विजय भोसले,संस्थापक शरद माने, संस्थेचे अध्यक्ष व ग्रा.पं. सद्स्य राहुल शेटे, सतीश काशीद,विजया घेवारी ,स्वरूपा पाटील, मीनाताई कोळेकर,शोभा खोत आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो - हेरले येथील जिजामाता विद्यालयाच्या बालचमूच्या बाजारात खरेदी करतांना जि.प. सदस्या डॉ.पद्माराणी पाटील व इतर मान्यवर