हेर्ले / वार्ताहर दि. ११/१२/१७
हातकणंगले तालूक्यातील जय हनुमान सह.दूध संस्थेमार्फत विविध योजनेतून दूध उत्पादकांना १ लाख९८ हजार रूपयाचा लाभांश निधी वाटप करण्यात आला.
जय हनुमानदूध संस्थेकडून सर्वदूध उत्पादक सभासदांची दि ओरियंन्टल इन्सुरन कंपनी मार्फत वार्षिक विमा पॉलिसी उतरविली आहे. मनोहर शिवाप्पा चौगुले यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना १ लाख ८oहजार रुपयांचा धनादेश तसेच याच योजनेतून दूध उत्पादक अनिल गंगाराम भोसले यांना वैरण कापत असतांना हाताला विळा लागूलेने ऑपरेशन केले होते. त्यांना १६ हजार २५४ रुपयांचा मेडिक्लेम, नारायण बाबूराव संकपाळ यांची म्हैस मृत झालेने २ हजार पशु मयत निधी योजनेतून आदी तीन सभासदांना १ लाख ९८ हजार २५४रूपयांचा धनादेश स्वाभिमानी शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, चेअरमन महादेव शिंदे, माजी चेअरमन बाळासाहेब थोरवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
जय हनुमान दूध संस्थेने म्हैस दूध दर फरक ६रू व गाई दूध दर फरक २रूपये ९० पैसे इतका उचांकी हातकणंगले तालूक्यातून दिला आहे. सर्व सभासदांना गोकूळच्या सर्व सेवा तसेच सभासद मयत अनुदान, शालेय विद्यार्थी शिष्यवृत्ती, वृक्षारोपन, लेक वाचवा अभियान, पशुसंवर्धन शिबीरे, आदी सामाजिक उपक्रम राबवित आहे. यामुळे संस्था अत्पावधितच आदर्श दूध संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. सुधाकर निर्मळे, लक्ष्मण कांबरे, सलीम खतीब यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी चेअरमन महादेव शिंदे, व्हा. चेअरमन शकील हजारी, संचालक मंडळ माजी चेअरमन बाळासाहेब थोरवत, माजी उपसरपंच सुरेश कांबरे, जयवंत चौगुले, नेताजी कांबरे, बाळासो चौगुले, निवास शेंडगे, सुनिल सुतार, सागर थोरवत, शिवाजी रजपूत, महादेव चौगुले, प्रकाश पाटील, सुभाष मुसळे, सचिव आण्णासो पाटील, लक्ष्मण चौगुले, विलास घुगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो
मौजे वडगाव जय हनुमान दूध संस्थेमध्ये लाभाशांना धनादेश प्रदान करतांना सुधाकर निर्मळे व इतर मान्यवर