ज्ञानराज पाटील
भारतीय लोक उत्सव प्रिय असल्याने ते प्रत्येक उत्सव अगदी मनापासून साजरा करतात... धर्माच्या आणि सीमांच्या मर्यादा त्यांना उत्सव साजरे कारण्यापासून रोखण्यास असमर्थ ठरल्याचे आजवर दिसून आले आहे.
अगदी क्रिकेट मॅच जिंकली तरी दिवाळी एवढ्याच फटाके फोडून आनंद साजरा केला जातो त्यामुळे, नववर्षाचे स्वागत गुढीपाडव्याला करायचे कि, १ जानेवारीला.. .हा ज्याच्या त्याच्या संतोषाचा आणि समाधानाचा भाग.. अर्थात, कोणताही उत्सव साजरा करत असताना एकाद्याचे (पाश्चिमात्य) अंधानुकरण करण्याच्या नादात आपण आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य विसरून आपल्या जीवनरचनेत न शोभणारे कृत्य तर करत नाही ना? याचा विचार होणे गरजेचे वाटते.
मुंबईत नुकत्याच झालेल्या घटनेमुळे या पार्टी करणार्या मुलामुलींची काळजी वाटते . ते सर्व सुखरूप घरी पोहोचते व्हावेत असेच सर्व पालकांना वाटते . स्त्रिया व मुलींवर 31 च्या पार्टीत अत्याचार होणे हे तर किळसवाणे आहे.
निव्वळ दारू पिऊन लोड होणे हिच जर 31 डिसेंबर ची व्याख्या होणार असेल तर त्याला नक्कीच विरोध केला पाहिजे.
म्हणून सोशल मीडियावर "मराठी आहे मराठीच राहणार, नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढी पाडव्यालाच देणार" अश्या पोस्ट फिरत असतात त्यात वावगे ते काय ?