हेरले / प्रतिनिधी : दि. १०/१/१८
मौजे वडगांव ( ता. हातकणंगले ) येथील नवीन वसाहत गल्ली नं .५ व ४ येथे डांबरीकरण कामाचा शुभारंभ हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचे हस्ते व संजय गांधी निराधार योजनेचे हातकणंगले तालुका अध्यक्ष व माजी जि.प. सदस्य महेश चव्हाण यांचे उपस्थितीत संपन्न झाला,
सदरच्या रस्त्यासाठी ५ लाखाचा निधी अपुरा असुन यामध्ये २०० मिटर्स रस्ता होतो व अर्धी गल्ली अपूर्ण राहते म्हणून प्रकाश कांबरे यांनी आमदार साहेबांना विनंती करून दोन पूर्ण गल्या होतील असा निधी दयावा अशी विनंती केली, यावेळी ग्रां.पं. च्या वतीने उर्वरीत ४ गल्याचं रस्ता व गटर्स करावे असे निवेदन सरपंच काशीनाथ कांबळे यांनी दिले, यावेळी महादेव जाधव, शाखा प्रमुख सुरेश कांबरे.उपसरपंच किरण चौगुले, अवधूत मुसळे, मानसिंग रजपूत,महादेव शिंदे, पोलीस पाटीलअमीर हजारी, सुभाष अकिवाटे,अर्जुन भेंडेकर, अनंत जाधव,सचिन लोहार, पवन जाधव, अक्षय लोहार, शुभम कदम, विजय पाटील, दिलीप कांबरे, प्रकाश झांबरे, यश चौगले, विशाल काकडे, नंदू कांबरे, सलीम हजारी, शब्बीर हजारी, अभिजीत थोरवत, प्रसन्न कांबरे, उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार सुजित मिणचेकर यांचा सत्कार पि.के. सामाजीक सेवा ग्रुपचे प्रकाश कांबरे यांनी, महेश चव्हाण यांचा सत्कार महादेव जाधव यांनी, दिपक यादव यांचा सत्कार बाबुराव लोहार यांनी तर महादेव शिंदे यांचा सत्कार दिलीप कांबरे यांनी केला.
प्रास्तवीक शांतीलाल कांबळे यांनी केले तर आभार हेमंत चव्हाण यांनी मानले.
फोटो :
मौजे वडगाव येथील नविन वसाहत रस्ता उद्घाटन प्रसंगी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, महेश चव्हाण, प्रकाश कांबरे, मानसिंग रजपूत,कारीनाथ केंबळे,दिपक यादव, अमीर हजारी, महादेव जाधव,
महादेव शिंदे,