हेरले / प्रतिनिधी दि. १५/१/१८
मौजे वडगांव ( ता. हातकणंगले ) येथील निरंजन महाराज आश्रमाचे सदगुरू श्री विनयानंद महाराज यांच्या अमृतहस्ते हभप गुरुवर्य श्री भाऊसाहेब पाटील महाराज यांना 'सहजानंद महाराज ' या पदवीने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी सदगुरू विनया नंद महाराज म्हणाले की, प्रवचनी प्रगटे आनंदl किर्तने भेटे मुकुंदllगायनी लाभे स्वानंदI म्हणूनी नाम सदानंद I| वेदांत सहज भाषेत उकलून सहज आनंद प्रदान करण्याची कलाही भगवंतांची कृपा आहे. म्हणून त्यांना सहजानंद पदवी बहाल करण्यात येत आहे.
सहजानंद महाराज यांना यादव महाराज, रंगनाथ महाराज, तळाशीकर महाराज, देऊकर महाराज यांचा सहवास व मार्गदर्शन लाभले. गेली ५० वर्षे श्री सहजानंद महाराज किर्तन प्रवचनाद्वारे अध्यात्म ज्ञान प्रसार सेवा मोठया निष्ठेने व ईश्वर सेवा म्हणून करीत आहेत. ते वारकरी महासंघाचे बेळगांवचे अध्यक्ष आहेत.या प्रसंगी आश्रमाचे आदिनाथ महाराज, आबासो देसाई, सुरेश चौगुले, संदिप थोरवत, दत्तात्रय भानसे, विश्वनाथ माळी, श्री बिसले महाराज, नारायण एकल महाराज, जगन्नाथ पाटील महाराज, जि.प. सदस्य राजेंद्र पाटील, साळवे निपाणी व जेष्ठ साधक उपस्थित होते.
फोटो
श्री भाऊसाहेब पाटील महाराज यांना सहजानंद पदवी प्रदान करतांना सदगुरू श्री विनयानंद महाराज व इतर मान्यवर