हेरले / प्रतिनिधी दि. १४/१/१८
प्रत्येक सामाजिक उपक्रमातून वेगळी छाप पाडणाऱ्या उडान फाऊंडेशनकडून संक्रांतीच्या सणाला असाच एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला.. तिळगुळ आणि एकमेकांना शुभेच्छा म्हणून भेटवस्तू न देता झोपडपट्टी मधील गरजू लोकांना कपडे, अन्नधान्य आणि इतर उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष भुषण शिवाजी लाड यांच्या कल्पनेला उपक्रम प्रमुख म्हणून मोनिका ताम्हणकर आणि माधुरी जाधव यांचे सहकार्य लाभले..
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपणही काहीतरी देने लागतो या भावनेतून उडान फौंडेशनची सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत वेगवेगळे सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवून "उडान फौंडेशन" ने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या ग्रुप मध्ये कोल्हापूर मधील २५० पेक्षा जास्त मुली व महिला आणि २०० पेक्षा जास्त मुले आणि पुरुष सहभागी आहेत. या ग्रुपमध्ये सहभागी होण्याचे असेल तर ८६९८८७ ९८९०या नंबरशी संपर्क साधावा.
संक्रांतिनिमित्त ग्रुप मधील सदस्यांनी जुने-नविन कपडे, तांदूळ, गहू, तेल असे साहित्य जमा केले होते. हे साहित्य *नागाव ता. हातकणंगले* या ठिकाणी राहत असलेले ऊस तोडणी मजूर, झोपडपट्टी आणि कोल्हापूर मधील चंबूखडी रोड जवळ असणाऱ्या झोपडपट्टीमध्ये देण्यात आले. या उपक्रमसाठी अध्यक्ष भुषण लाड, उपाध्यक्षा नेहाली दिवाण, अँड. उल्का पाटील, डॉ. नाझीया मोडक, सारीका सूर्यवंशी, पूजा रुग्गे, माधुरी जाधव, नम्रता भालकर, तेजल दिवाण, प्राजक्ता चव्हाण हे सदस्य उपस्थित होते.
फोटो
उडान फाऊंडेशनचे कार्यकर्ते कपडे वाटप करतांना