हेरले / प्रतिनिधी दि. २१/१/१८
श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था इचलकरंजी यांच्या वतीने राजस्तरीय पत्रकार भुषण पुरस्काराने सुधाकर निर्मळे यांना गौरविण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात सुधाकर निर्मळे यांनी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन स्थापन करून पत्रकारांना संघटित करण्याचे कार्य केले आहे. सार्वजनिक ,सामाजिक , शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी सातत्याने लिखाण करून अनेक समस्यांचे निराकरण केले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना आम. उल्हास पाटील, प.पु. पंडीत अतुलशास्त्री भगरे, अध्यक्ष अमित काकडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन पत्रकार भुषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
फोटो - इचलकरंजी येथे सुधाकर निर्मळे यांना पत्रकार भुषण पुरस्कार प्रदान करतांना आम. उल्हास पाटील, प.पु. पंडीत अतुलशास्त्री भगरे, अध्यक्ष अमित काकडे