हेर्ले / वार्ताहर दि. ८/१/१८
जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना आमदार डॉ.सुजित मिणचेकर फाऊंडेशन यांच्यावतीने शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्या आले.
माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून शिक्षण विभाग व शैक्षणिक कार्यात अमुलाग्र बदल केला आहे. तसेच अनेक शैक्षणिक, शिक्षक, शाळा आदींच्या समस्या दूर करण्यात उल्लेखनिय कार्य केले आहे. माध्यमिक शिक्षण विभागाची शैक्षणिक प्रतिमा उंचावणेसाठी प्रयत्नशिल आहेत. या कार्याची दखल आम.डॉ. सुजित मिणचेकर फांऊडेशने घेऊन त्यांना शिक्षकरत्न पुरस्कार जाहिर केला होता.
कुंथुगिरी ( ता. हातकणंगले) येथे नामदार दीपक केसरकर गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते तसेच माननीय आमदार सुजित मिणचेकर यांच्या उपस्थितीत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला..
फोटो - - - -
मा. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना शिक्षणरत्न पुरस्कार प्रदान करतांना नाम. दीपक केसरकर व आमदार डॉ.सुजित मिणचेकर, संजय चौगुले.