बुधवार ,दिनांक 12 सप्टेंबर 2018
कसबा बावडा: कसबा बावडा परिसरातील उपक्रमशील केंद्रशाळा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ च्या वतीने महिला पालकांचा शाळेतील सहभाग व सम्पर्क वाढवा आणि शाळेतील मुलींना भारतीय परंपरेचे व संस्कृतीचे दर्शन व्हावे या उदात्त उद्देशाने शालेय परिसरामध्ये मुलींसाठी व महिलांसाठी गौरी गणपती आगमनाच्या पूर्वसंध्येला झिम्मा फुगडीचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेच्या विद्यार्थिनी व महिला पालक ‘गाठोडे’ असो की ‘झिम्मा फुगडी’ फेर धरून सामूहिक नृत्य करत होत्या. ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’, ‘पिंगा गं पोरी पिंगा’, ‘गोफ विणू बाई गोफ विणू’ यांसारखी गाणी गात होत्या. हे करतानाच भारतीय प्रथा परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्याचाही सल्ला शाळेतील मुलींना देत म्हणत होत्या.... ‘आम्ही जपतो आपुला वारसा तुम्हीही जपा’...
सदर विशेष उपक्रमाचे आयोजन शालेय प्रशासनाच्या विशेषतः महिला शिक्षकांच्या वतीने करणेत आले होते.सदर उपक्रमाच्या प्रमुख शाळेच्या जेष्ठ शिक्षिका सुजाता आवटी या होत्या.सदर उपक्रमांबद्दल शाळाव्यावस्थापन समिती अध्यक्षा प्राजक्ता शिंदे मॅडम म्हणाल्या,‘‘झिम्मा फुगडी हा खेळ वयाचे बंधन विसरायला लावतो. गाण्यांच्या शब्दांवर फेर धरताना मन प्रसन्न होते.’’ उपाध्यक्षा पल्लवी पाटील म्हणाल्या, की फुगडी खेळताना माहेरची आठवण आली, तर विद्यार्थीप्रिय शिक्षिका जयश्री सपाटे मॅडम यांनी खेळ खेळताना सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचे सांगितले. विद्याचेतना मंचच्या अर्चना एकशिंगे यांनी या उपक्रमामुळे महिलांचा सामजिक संपर्क वाढतो असे सांगितले. महिलांच्या या विशेष उपक्रमाला शुभेच्छा देताना मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी ‘‘भारतीय संस्कृतीत विशिष्ट सणांसोबतच पारंपरिक खेळांची रचना केल्याने स्त्रियांना सामूहिक खेळ खेळता येतात. त्याचे जतन व्हायला पाहिजे.’’ असा संदेश दिला.
या उपक्रमात संध्या चौगले,दिशा कांबळे,आदिती बिरंजे,निशिका शिंदे,अस्मिता लोंढे,अस्मिता चौगले, जान्हवी कोरवी,वेदांतीका पाटील,कादंबरी चौगुले,तनिष्का पाटील,कोरवी, आशिषा गायकवाड, निशिका शिंदे,स्मृती चौगुले,प्रतिभा कोरवी,रसिका माळी, मृणाली दाभाडेे,अनुष्का साठे आदी मुलांनी आपले गायन कौशल्य सादर करून उपस्थित महिलांची मने जिंकली.
यावेळी मुख्याध्यापक अजितकुमार पाटील , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्राजक्ता शिंदे ,उपाध्यक्षा पल्लवी पाटील,वैशाली कोरवी,संगीता चौगले,व सदस्य, जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार,रमेश सुतार ,शिवशंभू गाटे सर ,आस्मा तांबोळी,सेवक हेमंतकुमार पाटोळे ,मंगल मोरे व इतर महिला शिक्षिका पालक व आजी माजी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संयोजन सुजाता आवटी यांनी केले.
1 comments:
Write commentsपारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांना आपण प्रसिद्धी दिल्याबद्दल आभारी आहोत
Replyधन्यवाद
मुख्याध्यापक,
राजर्षी शाहू विद्यामंदिर,कसबा बावडा, कोल्हापूर