माजगांव प्रतिनिधी:—
सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपली मुले कोणत्याही बाबतीत मागे राहू नयेत यासाठी धडपड करणारा कोगे ग्रामस्थांनी कुमार व कन्या विद्या मंदिर पोर्ले/ठाणे ता.पन्हाळा.जि.कोल्हापूर या जिल्हा परिषदेच्या शाळेला आज दि.०६/०९/२०१८इ रोजी सदिच्छा भेट दिली.या वेळी कन्या शाळेचे मुख्याध्यापक डी.एस. चौगुले यांनी स्वागत केले.
त्यांनी शाळेची इमारत,मैदान,हॅन्डवाॅश स्टेशन,रंगरंगोटी,वर्गसजावट,आॅफीस रचना,ई लर्निंग सुविधा यांची सखोल माहिती घेऊन शिक्षकांशी चर्चा केली.तसेच शाळेत मुलांच्या कडून घेतल्या जाणार्या विविध उपक्रमांची माहिती घेतली व मुलांचे कौतुक करुन त्यांना खाऊचे वाटप केले.यावेळी यशवंत बॅकेचे संचालक उत्तम पाटील यांनी शालेय परिसर,शालेय इमारत रचना व शालेय उपक्रमांची प्रसंशा केली.
या शिष्टमंडळामध्ये यशवंत बॅकेचे संचालक उत्तम पाटील,तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष महादेव पाटील,विलास पाटील,बापु संतु पाटील,राजाराम मांगोरे,विष्णु इंगवले,नायकू पाटील,अर्जुन पाटील,भिवाजी पाटील,मारुती निकम इ ग्रामस्थ होते.
यावेळी कुमार शाळेचे मुख्याध्यापक सी.डी.सावंत सर यांनी आभार मानले.याप्रसांगी दोन्ही शाळेचा शिक्षक वृंद उपस्थित होता.