माजगांव प्रतिनिधी:—
दि.०४/०९/२०१८
हनुमान तरुण मंडळ शैक्षणिक व्यासपीठ वडणगे,ता.करवीर साद माणुसकीची या शैक्षणिक,सामाजिक चळवळीच्या माध्यमातून शिक्षकांप्रती व्यक्त झालेल्या विचारांनी प्रभावित होवून सामाजिक जाणीव जपण्याचा इवलासा प्रयास गेली अनेक वर्षे साद माणुसकीची व्यासपीठ करत आहे.
सुनील विलास अस्वले सरांचा वाढदिवस निमित्तमात्र मानुन आज पर्यावरण रक्षणाच्या जाणीवेतून त्यांच्या सर्व सहकारी गुरुवर्य बंधु भगीनींना कापडी पिशव्यांचे वाटप केले.
हनुमान तरुण मंडळ शैक्षणिक व्यासपीठ वडणगे च्या माध्यमातून गेली अनेक वर्षे हुषार तसेच बिकट परिस्थितीत असणार्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,जेष्ठ नागरीक सात्कार मार्गदर्शन,विद्यार्थी करीयर मार्गदर्शन सत्कार,महिलांसाठी प्रबोधनात्मक व्याख्यान,विद्यार्थी दत्तक,वृक्षारोपण व वृक्ष संर्वधन तसेच कापडी पिशव्यांचे वाटप असे अनेक विधायक उपक्रम अंमलात आणले आहेत.
आज सरांचा वाढदिवस निमित्त ठरवून त्यांच्या कर्मभुमीत कापडी पिशव्यांचे वाटप करुन पर्यावरण संरक्षण कामी इवलेसे कार्य संपन्न करण्याचा प्रयास केला.
या कार्यक्रम प्रसंगी कन्या वि.मं.पोर्ले/ठाणे ता.पन्हाळा जि.कोल्हापूर शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक डी.एस.चौगुले सर,गणपती मांडवकर सर,नामदेव पोवार सर,काशिराम जाधव सर,प्रकाश पोवार सर,बाजीराव कदम सर,कौरे सर उपस्थित होते.