माजगांव प्रतिनिधी:—दि.०८/०९/२०१८
विद्या मंदिर घोटवडे ता.पन्हाळा जि.कोल्हापूर.शाळेचे अध्यापक शंकर बापू जाधव मुळ गाव उत्रे ता.पन्हाळा जि.कोल्हापूर.यांचा जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मार्फत दिला जाणारा सन २०१८ सालातील विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला याबद्दल त्यांचा शिक्षक संघ पन्हाळा शाखा व दिव्यांग शिक्षक संघटना पन्हाळा.यांच्या वतीने जाहीर सत्कार करणेत आला.
शंकर जाधव सरांनी आपल्या नोकरीच्या कालावधीमध्ये स्वत: दिव्यांग असुनही एखाद्या सर्व दृष्टीने तंदुरुस्त असणार्या व्यक्तिलाही लाजवेल असे काम केले.या कामाची पोहोच त्यांना पुरस्काराच्या रुपाने मिळाली.असे मत राजर्षी शाहू पतसंस्था .कोडोली ता.पन्हाळा चे संचालक दिगंबर शिंगे यांनी मांडले.काम करताना त्यांचा उत्साह वाखाणन्यासारखा असतो.असे कन्या विद्या मंदिर पोर्ले/ठाणे शाळेचे अध्यापक नामदेव पोवार म्हणाले.आभार पन्हाळा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनील मोरे यांनी मानले.
कार्यक्रमाला संघटनेचे उपनेते विलास मोरबाळे,दिव्यांग शिक्षक संघटनेचे सुभाष शिंगाडे,शिक्षक संघाचे विष्णु मोहिते,रविद्र माने इत्यादी उपस्थित होते.