हेरले / प्रतिनिधी दि.२५ / ९/१८
सलीम खतीब
हेरले ( ता. हातकणंगले) येथील बबन भाऊ कदम
माळभाग चर्चच्या नजीक यांच्या घरात सोमवार मध्य रात्री चोरी झाली .चोरट्यांनी दोन दूचाकीसह
दहा तोळे सोने व रोकड पंधरा हजार रुपये लंपास केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बबन भाऊ कदम हे सेवानिवृत्त कर्मचारी शेती करतात. ते पत्नी मुलगा रोहित आदी तीन कुटुंब सदस्य माळ भाग चर्चच्या पाठिमागे वास्तव्य करतात. सोमवारी रात्री हे झोपी गेले असता दोनच्या सुमारास चोरांनी प्रथमतः गेटचे कुलूप तोडून घराच्या मुख्य दरवाज्याची कढी खिडकीतून काठीला मोळा बांधून त्याच्या साह्याने काढून घरात प्रवेश केला. घरातील तिजोरी जवळच तीघे झोपले होते. तिजोरी उघडून दहातोळे सोन्याचे दागिने, पंधरा हजार रुपये रोकड व स्पेलंडर दुचाकी क्र(MH-09AR-6973) क्र. (MH-09CF4065) या चोरून पोबारा केला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. चोरांनी घरातील दहयाचा डबा व छोटी पाण्याची घागर घेऊन घरापासून अंदाजे दोनशे मिटरवर दहयाचा आस्वाद घेत पर्स व इतर साहित्याची तपासणी करून त्या वस्तू तिथेच टाकून निघून गेले.
पहाटे घरातील सर्वाना जाग आल्यानंतर घरात चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. तात्काळ हातकणंगले पोलीस ठाण्यास चोरीची वर्दी बबन कदम यांनी दिली. सकाळी हातकणंगले पोलीस घटना स्थळावर दाखल होऊन घडलेल्या चोरीच्या तपासाच्या अनुषंगाने घरातील स्थिती पाहून पंचनामा केला. चोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचारण केले होते. घरापासून दोन तीनशे मिटरपर्यंत माग काढून कोल्हापूर सांगली मार्गालगत पर्यंत जाऊन श्वान घुटमळ्ले.मध्यवस्तीत धाडसी चोरीच्या प्रकाराने गावामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हेरले गावात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून त्याच बरोबर घरातील धाडसी चोरीचा प्रकार घडल्याने चोरटयांना जेरबंद करण्याचे आव्हान हातकणंगले पोलींसा समोर उभे ठाकले आहे. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीसात झाली असून पोलीस निरीक्षक सिताराम डुबल अधिक तपास करीत आहेत.
फोटो
हेरले ( ता. हातकणंगले) येथील बबन कदम यांच्या घरातील फोडलेली तिजोरी