Sunday, 31 May 2020

महाराष्ट्र राज्य अनलॉक 1.0 - नवीन सुधारित नियमावली

महाराष्ट्र राज्यात मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या निर्देशानुसार अनलॉक 1.0 धर्तीवर नवीन नियमावली जाहीर केली असून ती दि. 8 जून ते 30 जून पर्यंत लागू राहील. तथापि जिल्हा पातळीवर स्थानिक प्रशासनाकडून आणखी सुधारित शिथिल किंवा कठोर नियम लागू होऊ शकतात. 

वाशिम लॉकडाऊन’ ची सुधारित नियमावली १ जूनपासून लागू

*‘*
·        केशकर्तनालय, ब्युटीपार्लर राहणार बंद

·        रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत ‘नाईट कर्फ्यू

·        मास्कचा वापर, सोशल डिस्टसिंगचे पालन बंधनकारक


प्रतिनिधि - आरिफ़ पोपटे

वाशिम, दि. ३१ : 

जिल्ह्यात ३० जून २०२० पर्यंत लॉकडाऊन लागू राहणार असून याबाबतची सुधारित नियमावली १ जून २०२० पासून लागू करण्यात येत आहे. जिल्ह्यात यापूर्वी प्रमाणेच सर्व दुकाने सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्यास अथवा अशा ठिकाणी गर्दी आढळून आल्यास या आस्थापना, दुकाने बंद करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी म्हटले आहे.

नवीन नियमावलीनुसार केशकर्तनालये, स्पा, सलून, ब्युटीपार्लर बंद राहणार आहेत. जिल्ह्यात रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत ‘नाईट कर्फ्यू’ लागू राहणार असून याकालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर  कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई राहील. दुध संकलन व विक्री, भाजीपाला विक्री, कृषि उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंतच्या काळात सुरू ठेवण्यास मुभा राहील. तसेच बँकांचे कामकाज सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहील. नगरपरिषद क्षेत्राबाहेरील पेट्रोलपंप २४ तास सुरु राहतील. नगरपरिषद क्षेत्रातील पेट्रोलपंप सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरु राहतील.

जिल्ह्यात सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस इत्यादी बंद राहतील. शॉपिंग मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर आतिथ्य सेवा, सिनेमागृह, जिम्नॅशियम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थियटर, बार आणि ऑडिटोरीयम, असेम्ब्ली हॉल सारखी ठिकाणे बंद राहतील. विशेष परवानगीशिवाय रेल्वेद्वारे प्रवासी वाहतूक बंद राहील. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, अॅकॅडमीक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व सर्व प्रकारच्या मेळाव्यांवर बंदी राहणार आहे. सर्व धार्मिकस्थळे, प्रार्थनास्थळे सामान्य व्यक्तींसाठी बंद राहतील. कोणत्याही परिस्थितीत धार्मिक सभा, धार्मिक परिषद, धार्मिक मेळावे भरविता येणार नाहीत. दारूची दुकाने सुरु ठेवण्यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क शाखेमार्फत ५ मे २०२० रोजी निर्गमित करण्यात आलेले आदेश यापुढेही कायम राहतील.

क्रीडा संकुलाचा बाह्य परिसर, मैदाने नागरिकांना व्यायामासाठी खुली राहतील. मात्र, याठिकाणी सामुहिक खेळ खेळण्यास बंदी राहील. व्यायामासाठी जाणाऱ्या व्यक्तींनी सोशल डिस्टसिंग पाळणे बंधनकारक राहील. इनडोअर क्रीडा संकुल बंद राहतील. सर्व प्रकारची मालवाहतूक सुरु राहील. मात्र, राज्यांतर्गत तसेच आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक संनियंत्रित राहील. अशा प्रवासासाठी यापूर्वीप्रमाणे ई-पास सुविधा सुरू राहील.

एका व्यक्तीसह दुचाकीकरिता तसेच चालक व दोन व्यक्तींसह वाहतूक करण्यास तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना परवानगी राहील. जास्तीत जास्त ५० टक्के क्षमतेसह जिल्ह्यांतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहतुकीला परवानगी राहील. आंतरजिल्हा वाहतूक तूर्तास बंद राहील, सदर वाहतूक सुरु करण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील.

सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडावर मास्क, रुमाल, गमछा, दुपट्टाचा वापर बंधनकारक राहील. तसेच दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फुटाचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी अथवा कार्यालयीन कामाच्या ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन, पण व तंबाखू खाण्यास प्रतिबंध राहील.

विवाह समारंभ जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीने करता येईल. मात्र, विवाह समारंभामध्ये सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर व सॅनीटायझरचा वापर करावा लागेल. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० व्यक्तींना परवानगी राहील. सर्व सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीच्या साधनांमध्ये सोशल डिस्टसिंग बंधनकारक करण्यात आले आहे. ६५ वर्षावरील व्यक्ती, तसेच अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर स्त्रीया, १० वर्षाखालील मुले यांनी घरातच थांबावे. केवळ अत्यावश्यक कारणास्तव परवानगी राहील.

सर्व आस्थापनाधारक, दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान ६ मीटरचे अंतर राहील याची दक्षता घ्यावी, तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना आस्थापना अथवा दुकानात प्रेवेश देवू नये. व्यक्तींच्या संपर्कात येणारी ठिकाणे, वस्तूंचे सातत्याने निर्जंतुकीकरण करावे. हॅण्डवॉश, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर इत्यादी बाबींची तजवीज संबंधित आस्थापना, प्रतिष्ठान यांनी करावी.

ज्या हॉटेलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस, शासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी वास्तव्यास आहेत, अशांसाठी तसेच अलगीकरण व्यवस्था केलेली हॉटेल सुरु राहतील. रेस्टॉरंट व इतर आदरातिथ्य सेवा आरोग्य खात्याच्या, गृह खात्याच्या व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी करिता तसेच अलगीकरण व्यवस्थेसाठी सुरु राहतील. इतरांसाठी बंद राहतील. बस स्थानक, रेल्वे स्थानक येथील कॅन्टीन व्यवस्था सुरु राहील. रेस्टॉरंटला अन्नपदार्थ घरपोच करण्याची मुभा राहील.

सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासनाच्या महामंडळांचे कार्यालयीन कामकाज नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत सुरु करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखाची राहील. सर्व शासकीय कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करावे. तसेच सर्व नागरिकांनीही त्यांच्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६०,  भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी श्री. मोडक यांनी कळविले आहे.

खानापुर येथील ग्रामपंचायतच्या अनागोंदी कारभारामुळे पाणी टंचाई

*
*नालीच्या खोदकामामुळे नळ योजना बंद*.
 . 
*दोन दिवसात पाणी न मिळाल्यास ग्रा. प. टाळे ठोकणार*. 

*प्रतिनिधि आरिफ़ पोपटे*

 कारंजा =तालुक्याती ग्राम खानापुर येथे कोरोनाचा सामना करत असताना आता गावकर्‍यांना पाण्यासाठीही वन वन भटकती करावी लागत आहे . गेल्या तीन दिवसापासुन घरात पाण्याचा थेबं नाही आणी आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची आवशकता असताना पाण्यासाठी भटकती करावी लागत असुन याबाबत सरपंच आणी ग्रामसेवक हे गंभीर नसुन गावातील नागरिकाचे पाण्यामुळे हाल होत आहे याबाबत  ग्रा प . सदस्य शखर खडारे यांनी ग्रामसेवकाला वारवार फोन केला पंरतु ग्रामसेवकाने प्रतिसाद दिला नाही .
या गावात शासनाची कोणतीही नळ योजना नाही खानापुर गावाची लोकसंख्या हि तीन हजाराच्या जवळपास आहे आणी या गावात श्रींमत नागरिकांच्या घरी स्वंतञ बोरवेल आहे आणी ७५ टक्के नागरिकांना गावातील एका नागरिकांच्या स्वतंञ बोरवेल वरुन ७५ टक्के नागरिकांना पाणी पुरवठा सुरु होता पण ग्रामपंचायतने झोपडपट्टी परिसरात नाली चे कामाकरीता खोदकाम सुरु केले असुन त्या स्वतंञ बोरवेल धारकाने या नालीमुळे बोरवेला दुर्गधी पाणी येवु शकते त्यामुळे त्या ठिकांनी जमीनीतुन पाईपलाईन टाकावी असी काही नागरिकांचे म्हणे होते परंतु ग्रामपंचायतने या विषयी काना डोळा केल्याने त्या बोरवेल धारकाना गावातील पाणी पुरवठा बंद केल्याने गावात एकच खडबळ उडाली आणी पाण्यासाठी काहीना हातपंपावर गर्दि करत आहे तर वार्ड क्रमाक २ मध्ये हातपंप आहे त्या हात पंपावर ग्रामपंचायतने बोरवेल ची मोटर बसवल्याने वार्ड क्रमाक २ मधिल नागरिकांना पाण्याची मोठ्या प्रमानात समक्षा निर्मान झाली आहे त्यामुळे वार्ड नबंर २मधिल बोरची मोटर काढुन हात पंप सुरु करण्यात यावे अंन्यता बोरची मोटर सुरु करुन गावातील नागरिकांना पाणी देण्यात यावे तसेच ग्रामपंचायतच्या गलतान कारभाराने गावकर्‍यांना पाण्याची समक्षा निर्मान झाली आहे  तेव्हा दोन दिवसात ग्रामपंचायतने पाणी पुरवठा सुरु न केल्यास ग्रामपंचायतला टाला ठोको आदोल करावे लागेल तसेच त्यापेक्षाही तीव्र आंदोलन म्हणजे सामुहीक आत्महत्या करण्याची प्रवागी देण्यात यावी अशी  ग्रामपंचायतचे सदस्य शेखर खंडारे व महिलानी मागनी केली आहे  आहे  

ठाणेदाराच्या तत्परतेने हरवलेले 1 लाख 11 हजार रुपये मिळाले - माहिती देणाऱ्याचा असाही प्रामाणिक पणा

*    *प्रतिनिधि आरिफ़ पोपटे* 
  कारंजा लाड दि. 31  कारंजा येथे रिकरींग व्यवसाय करणारा  कामानिमित्त सुपर मटण दुकान मंगरूळपीर रोड कारंजा या दुकानात गेला असता त्याच्याकडे असलेल्या 1 लाख 11 हजार 500 रुपयांची बॅग त्या दुकानात राहली. मात्र ती बॅग राहल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांना मिळताच त्यांनी विलंब न लावता काही वेळातच त्या दुकानातून 1 लाख 11 हजार 500 रुपये असलेली बॅग ताब्यात घेतली. या बाबत माहिती देणारा व्यक्ती व ठाणेदाराच्या तत्परतेमुळे 1 लाख 11 हजार 500 रुपयांची बॅग ज्याची आहे त्याला मिळाल्याने त्याने समाधान व्यक्त केले.
     सविस्तर असे की दि.31मे रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान मंगरूळपीर रोडवरील सुपर मटण दुकानात रिकरींग करणारा राजू मोतीराम ढोके रा खाटिक पुरा हा दुकानात गेला असता काम झाल्यानंतर तो त्या ठिकाणाहून निघून गेला मात्र त्याच्याकडे असलेली बॅग ही त्याच दुकानात राहल्याची माहिती अरविंद भगत याला होती. त्याने दुकाना बाहेर येताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांना माहिती देताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेच सुपर मटण दुकानात पोचले. त्या दुकांदाराकडू शिताफीने बॅग हस्तगत केली. त्या बॅग मध्ये 1 लाख 11 हजार रुपये व रिकरींग चे कागदपत्रे मिळाली. माहिती देणारा अरविंद भगत व ठाणेदार पाटील यांच्या तत्परतेने  राजू ढोके यांना 1 लाख 11 हजार 500 रुपये मिळाल्याने त्यांनी आभार व्यक्त केले.

नंदगावात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने मोठे नुकसान

नंदगाव प्रतिनिधी  :  
नंदगाव ( ता - करवीर ) व परिसरात   सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला . वाऱ्याच्या प्रंचड वेगामुळे  मोठ मोठली  झाडे रस्त्यावर पडली . पाऊस व वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ऊस पिक उमळून    खाली पडून खुप नुकसान झाले आहे . अनेक घरांच्या छताची कौले , व सिंमेटचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे . व पावसाचे पाणी थेट छतावरुन घरात साचले .भात पेरणी केलेल्या शेतांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते . अनेक शेतकरऱ्यांनी साचलेले पाणी काढण्यासाठी लगबगीने शेताची वाट धरली . 
पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या मात्र या पावसामुळे साधल्या अशी चर्चा परिसरातील शेतकऱ्यांच्यात होती . 
( फोटो . विदया मंदीर नंदगाव जवळील मुख्य रस्त्यावर पडलेले भले मोठे झाड , ( छाया . विजय हंचनाळे. नंदगाव )

अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मास्क व सॅनिटायझरचे वाटप


गांधीनगर प्रतिनिधी,
एस एम वाघमोडे
गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९५ जयंती  कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करित कोरोणा संसर्गापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना नूतन सरपंच जितेंद्र यशवंत यांचेकडून मास्क व सॅनिटायझरचे  वाटप करण्यात आले.
देशात आणि राज्यात थैमान घातलेल्या कोरणा विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भव्यदिव्य प्रमाणात साजरा करण्यात येणारा अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळा अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी सर्वच मान्यवरांनी महिला असूनही अहिल्यादेवी देवी होळकर यांनी तब्बल सत्तावीस वर्ष सर्वोत्कृष्ट राज्यकारभार करित आदर्श निर्माण केला असे नमूद केले. यावेळी सरपंच जितेंद्र यशवंत ,पंचायत समिती करवीर चे सदस्य प्रदीप झांबरे, उपसरपंच तानाजी पाटील, माजी सरपंच आप्पासाहेब धनवडे, पांडुरंग कांबळे , ग्रामपंचायत सदस्य विनोद सोनुले, जयश्री रेवडे ,गुंडा वायदंडे, जितेंद्र कांबळे ,आनंदा बनकर ,कर्याप्पा पुजारी, यशवंत खिलारी, आनंदा रेवडे  आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन महादेव वाघमोडे तर आभार कृष्णात रेवडे यांनी केले.
फोटो 
गडमुडशिंगी ( ता. करवीर) येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मास्क व सॅनिटायझरचे चे वाटप करण्यात आले.

Saturday, 30 May 2020

शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागुन तीन बैल जळाले एक बैल होरपड़ला - शेती उपयोगी साहित्य व बैला चा चारा - दीड लाखाची हानि

*
     प्रतिनिधी        *आरिफ़ पोपटे*                     
     मानोरा तालुक्यातील इंजोरी येथील शेतकऱ्यांच्या गोट्याला आग लागून दोन जोडीपैकी 3जिवंत बैल जळून  एक बैल गंभीर जखमी झाल्याने दीड लाखाचे हानी शासनाने मदतीच करण्याची विनंती शेतकरी वर्गाकडून होत आहे,,, मानोरा तालुक्यातील इंजोरी  येथील बिल, एस, एन एल टावर जवळ असलेले पांडुरंग घोडे नामक शेतकऱ्याच्या बैलाच्या गोट्याला 30 मे 2020 रोजी दुपारी तीन वाजता दमान अचानक आग लागल्याने तसेच शेतातील साहित्य व जनावरांचा चारा असे दीड लाखाचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे शेतकरी पांडुरंग घोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या या आगीत गोठ्यात बांधलेल्या चार बैल जोडी पैकी एक बैल जागीच ठार झाला तर दोन बैल 99% जळाले तो एक बैल गंभीर दुखापत झाल्याचे दिसून येत आहे या आगीमध्ये शेतकऱ्यांचे शेतीचे साहित्य जनावरांचा चारा आदी घराचे जळून खाक झाले व त्यांचा अंदाजे दीड लाखाच्यावर नुस्कान झाल्याने शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी शेतकरी कुटुंबातील लोकांची तसेच गावातील सर्वांची मागणी आहे

टोळधाड संदर्भात जि. प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी घेतली कृषी विभागाची विशेष बैठक

  * 

शेतकऱ्यांनी  विशेष  काळजी  घेण्याचे  केले  आवाहन
उदगीर प्रतिनिधी :- गणेश मुंडे
राजस्थान,मध्य प्रदेश मधून  टोळ धाड महाराष्ट्रात  सीमावर्ती  भागात  आली  असून  यासाठी  विशेष  खबरदारी  बाळगण्याची  गरज  आहे.यासाठी  लातूर  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष  राहुल केंद्रे यांनी  कृषी विभागातील  अधिकारी  आणि  तज्ज्ञ  यांच्यासोबत विशेष  बैठकीचे  आयोजन  केले  होते.वाळवंटी टोल किंवा नाकतोडे ही  किडीची  एक महत्वाची  जात आहे. वाळवंटी टोळ ही कीड मोठ्या प्रमाणात पिकांचे व इतर वनस्पती झाडाझुडपांचे नुकसान करते या किडीच्या दोन अवस्था  आहेत, जेव्हा हे किडे एक एकटे अवस्थेत असतात तिला एकटी अवस्था असे म्हणतात जेव्हा ही कीड सामूहिक आढळून येते तेव्हा तिला समूह असे म्हणतात समुहा अवस्थेत तर ही कीड मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. सद्यपरिस्थितीत राजस्थान गुजरात मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यामध्ये वाळवंटी टोळ्या आढळून येतात.या पूर्वीही किडीचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला आहे या आधीचं 1926 ते 1931 मध्ये, 1949 ते 1955, 1962,1978  व 1993 मध्ये सुद्धा या किडीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून या किडीने आपल्या शेतात प्रवेश करू नये याकरिता वेगवेगळ्या उपाययोजना सुचविण्यात आल्या. 
शेताच्या आजूबाजूला मोठे चर खोदणे तसेच वाद्य वाजवणे,  मोठ्याने आवाज करणे.संध्याकाळी रात्रीच्या वेळी ही  टोळधाड झाडाझुडपांवर  जमा होतात त्यावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्यास नियंत्रण होते. 
 वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करून टोळधाड नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे. यासह विविध उपायांवर चर्चा करण्यात आली व योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना करण्यात आल्या. 
टोळ धाडीचा  विशेष बंदोबस्त करण्यासाठी आज दिनांक 28 मे 2020 रोजी विशेष बैठक लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला कृषी सभापती गोविंद चिलकुरे,समाजकल्याण सभापती रोहीदास वाघमारे, जिल्हा परिषद कृषी समिती सदस्य महेश पाटील,कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर कांबळे,कृषी विद्यावेत्ता डॉक्टर सूर्यवंशी,मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन दिग्रसे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने,कृषी विकास अधिकारी एस आर चोले,उपविभागीय कृषी अधिकारी महेश तीर्थकर आदी उपस्थित होते.

आदिवासी विकास विभाग आदिवासींच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ करीत आहे ! - खा. डॉ. हिना गावित

          नंदुरबार - ( प्रतिनिधी वैभव करवंदकर ) - -

           कोव्हिड १९ विषाणू चे कारण दाखवत इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाहिले आणि दुसरीचे प्रवेश देणार नाही  असा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे त्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षणाच्या बट्याबोल होणार आहे.                
          कोरोनाचे कारण पुढे करत येत्या शैक्षणिक वर्षात इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाहिले आणि दुसरीचे प्रवेश न करण्याबाबत आदिवासी विकास विभागाने निर्णय घेतला आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावी अशी मागणी करत निर्णय मागे न घेतल्यास आदिवासी विद्यार्थ्यांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा खासदार डॉ.हिना गावित यांनी दिला आहे. नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यंदाच्या शैक्षणिक वर्षात नामांकित इंग्रजी शाळेत इयत्ता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही,असा निर्णय आदिवासी विकास विभागाने 22 मे रोजी घेतला आहे. यावर खा. हिना गावित यांनी हरकत घेतली असून हा निर्णय आदिवासी विद्यार्थ्यांचा नुकसान करणारा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. येत्या 8 दिवसात हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा खा. हिना गावित यांनी दिला आहे. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावित हे देखील उपस्थित होते.

कोरोना संकटातही लूट - बोगस पास देऊन प्रवाशांची फसवणूक, वडगांव पोलिसात गुन्हा दाखल


     पेठ वडगांव / वार्ताहर- बोगस पास देऊन प्रवाशांची फसवणूक केले प्रकरणी तिघां विरोधात वडगांव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललित रा.दिवा ठाणे, विशाल विलास पोवार वय 25रा.दिवा ठाणे, प्रविण प्रल्हाद खेतले वय 36 रा. मुंडे ता. चिपळून अशी आरोपींची नावे असून याबाबत रविंद्र विष्णू निकम वय 32 सध्या रहाणार दिवा पूर्व ठाणे मूळ गाव अडकूर ता. चंदगड जि. कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे. 
         याबाबत अधिक माहिती अशी की रविंद्र विष्णू निकम यांना लॉकडाऊनमुळे आपल्या अडकूर ता. चंदगड कडे यायचे होते यासाठी ते दिवा ठाणे येथील ललितच्या नेट कॅफे मध्ये गेले होते त्यावेळी ललित याने विलास पोवार यांची निकम यांचेशी भेट करून दिली. जिल्हाधिकारी यांचेकडील ई पास काढण्यासाठी ललित व पोवार या दोघांनी स॔गनमत करून रविंद्र निकम यांचेकडून पाच हजार रुपये घेतले तसेच प्रविण प्रल्हाद खेतले याची टेंपो ट्रॅव्हल एम एच 08एपी 1483 पंचवीस हजार रूपयेस भाडेने ठरवून दिली. त्यानुसार रविंद्र निकम हे आपली पत्नी, मुले, वडील यांना घेऊन च॔दगड कडे येण्यास निघाले. महामार्गावरील किणी टोल नाका येथे गाडी व ई पासची तपासणी केली असता सदर पास बोगस  असल्याचे निदर्शनास आले .त्यामुळे निकम यांनी वरील  तिघां विरोधात  वडगांव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील टेंपो ट्रॅव्हल ताब्यात घेण्यात आली आहे .अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रदिप काळे करत आहेत 
                

माझं कोल्हापूर माझा रोजगार - पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी 

कोरोनामुळे जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक परप्रांतीय कामगार हे काम सोडून गेले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात कामगार कसे मिळणार हा प्रश्न उद्योजकांसमोर निर्माण झालाय. तर अनेकांचे रोजगार गेल्यामुळे ते चिंतेत आहेत. हीच औद्योगिक क्षेत्रातील पोकळी भरून काढण्यासाठी आणि जिल्ह्यातील युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेतलाय. त्यांनी माझं कोल्हापूर माझा रोजगार या अभियानातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. त्यासाठी नामदार पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन माझं कोल्हापूर माझा रोजगार या अभियानाची घोषणा केली. 
उद्योगांना चालना देण्यासाठी आणि स्थानिक युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी माझं कोल्हापूर माझा रोजगार ही संकल्पना घेऊन जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संस्था आणि संघटनांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक घेतली. यावेळी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी आगामी सहा महिन्यांचा विचार केला तर कामगार मिळणे अवघड होणार आहे.  इचलकरंजीतून 23 हजार कामगार परत गेले. जिल्ह्यात एक लाख कामगारांची गरज भासणार असल्याचे सांगितले. इचलकरंजी एअरजेट असोसिएशनचे सतिश पाटील आणि शटललेस असोसिएशनचे अनिल गोयल यांनी पालकमंत्री म्हणून आपण जे पाऊल उचलले आहे हे महत्वाचे असल्याचे सांगितले. तर राजगोंडा पाटील यांनी यामुळं नक्कीच उद्योजक उभारी घेतील असा विश्वास व्यक्त केला.  उद्योजक शामसुंदर मर्दा यांनी सध्या कापड बनविण्यात कामगारांचा मोठा तुटवडा भासतो. पुढील तीन वर्षात अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे इथल्या स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे अशी सूचना केली. 
क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी सध्या चार हजार कामगारांचा तुटवडा आम्हाला भासत आहे. त्यासाठी आम्ही आमच्या कन्स्ट्रक्शन क्षेत्रात कामगारांची नोंदणी करून घेत असल्याचे स्पष्ट केले. तर  राजीव पारीख यांनी बांधकाम कामगारांना आवश्यक असलेले सर्व फायदे मिळवून देणे गरजेचे आहे. सेन्ट्रीगं कामगार, प्लम्बर यांना प्रशिक्षण देऊन कामावर घेऊ त्यासाठी क्रीडाईतर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अस सांगितले.  
हॉटेल मालकसंघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर यांनी आम्ही सेवा क्षेत्रात आहोत आम्हालाही पाच हजार कामगारांची गरज असल्याचे सांगितले. 
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे प्रदीप व्हरांबळे आणि नितीन वाडीकर यांनी स्थानिक कामगारांकडून चांगल्या प्रकारे काम केले जात असल्याचे सांगितले. उद्योजक दिनेश बुधले यांनी सध्याच्या परिस्थितीच विचार करता येणाऱ्या कामगारांनी  त्यांची मानसिकता बदलून मिळेल त्या ठिकाणी नोकरी केली पाहिजे अस सांगितले. 
कागल पंचतारांकित एमआयडीसीचे गोरख माळी यांनी फौंड्री उद्योगाला चालना देण्यासाठी आम्हाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ पाहिजे त्यासाठी आम्ही कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा प्रयत्न करतोय. कामगारांना प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी देण्यासाठी फाईव्ह स्टार एमआयडीसी इथं प्रयत्न करत आहोत असं सांगितलं. 
शिरोली एमआयडिसीचे अतुल पाटील आणि सुरेंद्र जैन यांनी सध्या कामगारांच्या मागणीचा प्रश्न निर्माण होतोय. त्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. 
गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे सचिन शिरगावकर यांनी आमच्या दोन्ही इंडस्ट्रीजमध्ये कामगारांची गरज असल्याचे सांगितले. 
तर उद्योजक किरण पाटील यांनी स्थलांतरित कामगार परत येणार नाहीत. आता आपनालाच पाऊले उचलायला पाहिजेत, कोल्हापूरसाठी काहीतरी चांगले करण्यासाठी कार्यरत राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. 
आर्किटेक्ट असोसिएशनचे अजय कोराने यांनी कुशल मनुष्यबळ मिळायला पाहिजे. लहान आणि मध्यम प्रकल्पांना चालना दिली पाहिजे अस मत मांडले. 
आयटी असोसिएशनचे शांताराम सुर्वे, स्नेहल बियानी आणि प्रसन्न कुलकर्णी यांनी कोल्हापूरमधले हजारहुन अधिक आयटीत काम करणारे कामगार हे कोल्हापूर सोडून बाहेर काम करत आहेत. आता या स्थानिक कामगारांना कोल्हापूरात नोकरीच्या संधी देता येतील. आता आयटी क्षेत्रात येत्या तीन वर्षांत 250 कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे सुमारे पंधरा हजार नोकऱ्या या क्षेत्रात उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त केला. 
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यामुळे गरजूंना नोकरी तर औद्योगिक क्षेत्राला आवश्यक कुशल मनुष्यबळही मिळणार असल्याचे संजय शेटे यांनी स्पष्ट केलं. 
सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्थानिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न करत आहेत. हे महत्वपूर्ण आहे. यासाठी कॅम्पस इंटरव्ह्यूव घेऊन निवड करण्यात येतील. कोल्हापूर लवकरात लवकर सुस्थितीत कसं येईल यासाठी प्रशिक्षण देऊन  नोकरीच्या संधी देणे उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.  
आमदार ऋतुराज पाटील यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये औद्योगिक संस्थाच्या प्रतिनिधींनी आपले प्रश्न मांडले आहेत. कौशल्य विकास  शिक्षणावर भर दिलाय. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असून लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच सकारात्मक प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. 
आमदार चंद्रकांत जाधव यांनी कोरोनाच्या संकटाने अनेकांचे उद्योग बंद पडलेत. परप्रांतीय कामगार हे परत गेले आहेत. नामदार सतेज पाटील यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून काम करत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. 
यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपण आता चांगली सुरवात केलीय. माझं कोल्हापूर माझा रोजगार ही संकल्पना घेऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. लवकरच जॉब फेअर घेऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे.  युवकांना मार्गदर्शन करून त्यांना नोकरीमध्ये सामावून घेऊ. यामध्ये उद्योजकांनीही पुढाकार घेऊन प्रयत्न करावेत. असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते माझं कोल्हापूर माझा रोजगार या अभियानाच्या लोगोचे अनावरण ऑनलाईन करण्यात आले. 
. पालकमंत्री सतेज पाटील

 माझं कोल्हापूर माझा रोजगार या अभियानाच्या माडण्यामातून ज्यांना नोकरी पाहिजे आहे त्यांनी ई मेल आणि व्हाट्स ऍपवर आपल्या नावाची नोंदणी करावी असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं. 

कोरोनाचे संकट जरी असलं तरी आता नोकरीच्या संधी आता स्थानिकांना मिळत आहेत. त्यामुळे कुशल आणि अकुशल अशा सर्वांनीच नोकरीच्या संधी आत्मसात कराव्यात असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं. यावेळी डी वाय पाटील शैक्षणिक प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस सतेज पाटील उपस्थित होते.

गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील लघुउद्योग सुरू करा; शिवसेनेचे निवेदन


गांधीनगर प्रतिनिधी,
एस एम वाघमोडे
गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील लघु उद्योग अजूनही बंद असल्यामुळे या उद्योगावर अवलंबून असणारे असंख्य कामगार घरीच बसून असून त्यामुळे अशा कामगारांचे आर्थिक व सामाजिक परिस्थिती बिकट बनत चालले असून यासाठी गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील सर्व लघुउद्योग सुरू करून या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या कामगारांच्या हाताला रोजगार द्यावा असे निवेदन करवीर शिवसेनेच्यावतीने गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकांत पोतनीस यांना देण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या अटींच्या धास्तीने बंद असणाऱ्या उद्योगांचे योग्य समुपदेशन करून अशा उद्योजकांना आपले उद्योग पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राज्यात व देशांमध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यापासून एमआयडीसीतील अनेक उद्योग बंद होते परंतु सरकारने कोरोना संसर्ग रोखण्याच्या काही मार्गदर्शक सूचना देऊन उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यावेळी शिवसेना करवीर तालुका प्रमुख विनोद खोत, शिवसेना उपतालुका प्रमुख भगवान कदम, दयानंद शिंदे, सुरेश पाटील, रवींद्र जाधव ,शांताराम पाटील ,अभिजीत पाटील, बबलू शेख ,सुशांत देसाई, मानसिंग मगर व काका खोत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो 
गोकुळ शिरगाव करवीर शिवसेनेच्यावतीने लघुउद्योग सुरू करण्यासंबंधी निवेदन गोशिमा ला देण्यात आले.

कागल तालुक्यामध्ये सिटूचा सुवर्ण महोत्सवी स्थापना दिवस उत्साहात साजरा

 

कागल तालुक्यामध्ये सिटुचा सुवर्ण महोत्सवी स्थापना दिन शारिरीक अंतर ठेवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती सिटुचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ शिवाजी मगदूम यांनी दिली. 
कागल तालुक्यामध्ये सिटुच्या वतीने कामगारांनी संघटनेच्या कार्यालयासमोर, घरासमोर ध्वजारोहण करून तसेच कामाच्या ठीकाणी शारिरीक अंतर ठेऊन मानवी साखळी करून सिटुच्या घोषणांनी परीसर व गल्लीबोळ दणाणुन सोडला. 
आपआपल्या तालुक्यातील सर्वच कार्यालयावर झेंडावंदन करून गावागातील कामगारांनी दहा दहाच्या संख्येने एकत्र येऊन शारीरिक अंतर ठेवून संघटनेचा झेंडा हातात घेऊन घोषणा द्यायच्या आहेत.
यावेळी सिआयटीयु झिंदाबाद, मी सिटूचा   - -  सिटू माझी,लाल बावटा कामगार संघटनेचा-विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असाे, इन्किलाब जिंदाबाद, बांधकाम कामगार एकजुटीचा. - विजय असो, नोंदीत बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये अर्थसहाय्य मिळालेच पाहिजे, बांधकाम कामगारांना घरासाठी अनुदान मिळालेच पाहिजे, बांधकाम कामगारांचे प्रलंबित योजनांचे लाभ तातडीने खात्यावर वर्ग करा,बांधकाम कामगारांना घरासाठी अनुदान मिळालेच पाहिजे, आशा व गटप्रवर्तक यांना सेवेत कायम करा, उसतोडणी कामगारांचे महामंडळ स्थापन करून नोंदणी करा, सेंट्रल किचन पद्धत रद्द करा,केंद्र सरकारने कामगार विरोधी धोरण मागे घ्यावे. या व इतर मागण्यांनी परीसर दणाणुन सोडला. 
या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सिटु सलग्न लाल बावटा बांधकाम कामगार संघटना, कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन, उस तोडणी कामगार संघटनांनी सहभाग नोंदवला.
हा संपुर्ण कार्यक्रम पाडण्यासाठी सिटुचे जिल्हा उपाध्यक्ष व राज्य सचिव कॉ शिवाजी मगदूम, विक्रम खतकर, उज्ज्वला पाटील, मनिषा पाटील, मोहन गिरी, राजाराम आरडे, सुप्रिया गुदले, सारीका पाटील, विनायक सुतार, जोतिराम मोंगणे, संगिता कामते, अनिता अनुसे,आनंदा डाफळे, दशरथ लोखंडे, दगडू कांबळे, गौस नायकवडी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

हेरले उपसरपंचपदी राहूल शेटे यांची बिनविरोध निवड.



         हेरले / प्रतिनिधी
           अमर थोरवत
       
 हातकणंगले तालुक्यातील हेरले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राहूल शेटे यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच आश्विनी संदीप चौगुले होत्या.
       हेरले ग्रामपंचायतीवर माजी सभापती राजेश पाटील यांच्या स्वाभिमानी गाव विकास आघाडीची सत्ता आहे. सत्ता स्थापन झाले नंतर प्रथमतः विजय भोसले यांची उपसरपंच पदी निवड केली होती. त्यांनी गेली अडीच वर्षे उत्कृष्ट कार्य केले आहे. स्वाभिमानी गाव विकास आघाडी अंतर्गत ठरले प्रमाणे उपसरपंच पदाचा विजय भोसले यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त झाले होते. 
     उपसरपंच पदाच्या निवडीसाठी शनिवारी सभेचे आयोजन केले होते. राहुल शेटे यांचा उपसरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषीत केली. राहूल शेटे यांची बिनविरोध निवड झाल्याने मावळते उपसरपंच विजय भोसले यांनी  त्यांचा सत्कार केला. अडीच वर्षे उपसरपंच विजय भोसले यांनी उत्कृष्ट कार्य केले बद्दल त्यांचा सरपंच आश्चिनी चौगुले व ग्रामपंचायत सदस्य मज्जीद लोखंडे यांनी सत्कार केला.
     या सभेस ग्रामपंचायत सदस्य सतिश काशिद, मज्जीद लोखंडे, फरिद नायकवडी,  विजय भोसले, सदस्या अपर्णा भोसले, आशा उलसार, विजया घेवारी, शोभा खोत, स्वरूपा पाटील, रिजवाना पेंढारी, मिनाताई कोळेकर , आरती कुरणे आदी सदस्य उपस्थित होते.

डी वाय पी आणि पालक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने JEE, NEET आणि CET बद्दल ऑनलाइन मार्गदर्शन शिबीर

* 

डी. वाय. पी. ग्रुप चे कार्यकारी संचालक डॉ. ऐ. के. गुप्ता आणि पालक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने "प्रवेश परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या पुढील आव्हाने" या विषयावर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. या मार्गदर्शनामध्ये त्यांनी MHT-CET  व  NEET या प्रवेश प्रक्रियांसाठी लागू असणाऱ्या ऑनलाइन प्रोसेस बद्दल सविस्तर माहिती दिली. कोविड-१९ मुळे अध्यापनात झालेले बदल व त्याचा पुढील प्रवेश प्रक्रियेवर झालेला परिणाम या विषयावर प्रामुख्याने जोर दिला. डॉ. ऐ. के. गुप्ता म्हणाले कि, Neet परीक्षेमध्ये कमी मार्क्स पडले तर शैक्षणिक वर्षात मिळवलेल्या गुणांचा पुढील प्रवेशामध्ये काहीही उपयोग होणार नाही. विद्यार्थ्यांनी Neet   परीक्षेसाठी अभ्यासाचे वेळापत्रक बनवून  दर आठवड्याला विषयानुसार सराव परीक्षा दिली पाहिजे. या सराव परीक्षेतील गुणांचे पृथक्करण करून आपल्या अभ्यासामध्ये वेळोवेळी बदल केले पाहिजेत. 
         पालकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले कि प्रथम तुम्ही तुमच्या पाल्याशी संवाद साधून त्याचे मत विचारून घ्या. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य, शांतता आणि आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासाठी प्रोत्साहन द्या. दैनंदिन जीवनातून आपल्या पाल्याशी कमीत कमी ३० मिनिटे चर्चा करा. प्रवेश प्रक्रिये साठी लागणाऱ्या आवश्यक कागद पत्रांची आत्ताच पूर्तता करा. 
           शेवटच्या सत्रांत ते मुलाना उद्देशून म्हणाले कि गेली १४ वर्षे तुम्ही सतत अभ्यास करताय पण आताचे ४० दिवस JEE मेन्स च्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. ध्येय मोठे ठेवा, लहान ध्येय ठेवणे हा गुन्हा आहे. तुमची आत्ताची बॅच हि भाग्यवान आहे कारण कोविड-१९ मुळे तुम्हाला अभ्यासासाठी ८० ते ९० दिवस जास्तीचे मिळाले आहेत. ज्यावेळी तुमचे पदवीचे शिक्षण पूर्ण होईल त्यावेळी कोविड-१९ मुळे पुष्कळ संधी उपलब्ध असतील. कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका कारण CET/NEET/JEE या परीक्षा होणारच आहेत. शासन मार्फत या परीक्षा होण्या आधी डी. वाय. पाटील. अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पालक शिक्षक संघ याच्या मार्फत या परीक्षांच्या मॉक टेस्ट घेणारच आहे. कोविद-१९ मुळे  अभियांत्रिकी मध्ये भविष्यांत येणाऱ्या संधी आणि प्रवेश प्रक्रियेची माहिती डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा कोल्हापूर येथे दिली जात आहे. त्या बरोबरच विद्यार्थी व पालकांना वैयक्तिक मार्गदर्शन आणि प्रवेश घेण्यासाठी फॉर्म भरून देण्याची सोय करून दिली आहे त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
             सदर ऑनलाइन शिबिरासाठी पालक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रचंड मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला तसेच इतर विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या शिबिराचे पुन्हा आयोजन करण्यात यावे अशी मागणी देखील संस्थेकडे केली जात आहे.

टीकटॉकची साथ - नोकरीचा घात , अॉनड्युटी टीकटॉकमुळे एसटी महिला अधिकार्याची नोकरी गेली

प्रतिनिधी - 
लॉकडाऊनमध्ये एसटी सेेवा बंंद आहे. आता लॉॉकडाऊन 4.0 मध्ये फक्त जिल्हा अंतर्गत सेवा सुरू केली आहे. सांगली जिल्ह्य़ातील तासगाव आगारात अशा वेळी एका एस टी महिला अधिकार्याने बस स्थानकांमध्ये ड्युटीवर असताना व्हिडीओ बनवून तो टीकटॉकवर शेअर केला. फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी व्हायरल झालेला व्हिडीओ चांगलाच अंगलट आला आहे. संबंधित अधिकाऱ्यावर वरिष्ठांनी कारवाई केली असून निलंबित करण्यात आले आहे.
यामुळे टीकटॉक च्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नोकरीचा घात केला आहे. 

कृषी विभाग आपल्या दारी - कारंजा कृषी विभागाची पेरणीपुर्व कार्यशाळा काजळेश्वर येथे संपन्न

*
कार्यशाळेत बियाणे तयार करण्याचे कृषी मंडळ अधिकाऱ्यांनी दिले प्रशिक्षण  

 .

प्रतिनिधि कारंजा :*आरिफ़* *पोपटे* 
कारंजा तालुक्याती काजळेश्वर उपाध्ये : पेरणीचे दिवस जवळ येत असल्याने कारंजा कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी शासन
सूचनेनुसार कृषी विभाग शेतकऱ्यांचे दारी हा नावीन्य पूर्ण उपक्रम राबवित असून उकर्डा ;पानगव्हान शिवारात शेती असणाऱ्या काजळेश्वरचे शेतकऱ्यांना खरीप पुर्व प्रशिक्षिण कार्यशाळा दि .२९ मे रोजी संध्याकाळी काजळेश्वर येथे घेण्यात आली .
        वृत्त असे की पेरणीचे दिवस जवळ येत असतांना शेतकरी यांना घरगुतीबीयाणे तयार करणे ;बीज 
प्रक्रीया व बीयाण्याची उगवण शक्ती
तपासणे ;बीयाण्याला पेरणीपुर्व बुरशीनाशकलावणे ;उतारावर आडवी पेरणी करणे इत्यादीबाबतची माहीती कार्यशाळेत प्रत्यक्ष   लॅपटॉपचे माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी मंडळ अधिकारी संतोष चौधरी यांनी सखोल माहीती दिली . तसेच शेतीचा बियाणे खर्च कमी करूण तंत्रज्ञानाचा वापर करून
उत्पादन कस वाढविता येईल याबाबतची वैज्ञानिक तांत्रीक मार्गदर्शन कृषी सहायक निलेश घाडगे पाटील यांनी केले तर पीक उत्पादन वाढीसाठी व लागवडीचा खर्च कमी करण्याचे अनुशंगाने माहीती कृषी सहाय्यक चंदण राठोड
यांनी दिली . तसेच उताराला आडवी पेरणी व बी.बी.एफ. तंत्रज्ञान म्हणजे सरी वरंबा पद्धतीची पेरणी याबाबत सखोल मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी संतोष चौधरी तसेच कृषी सहाय्यक राम मारगे यांनी शेतकऱ्यांना दिली . कार्यशाळा तुळशीरामजी उपाध्ये यांचे अध्यक्षतेखाली पार पडली . मार्गदर्शक तसेच प्रमुख उपस्थीतीत कृषी मंडळ अधीकारी संतोष चौधरी ;कृषी सहाय्यक निलेश घाडगे पाटील ;चंदन राठोड : राम मारगे मान्यवर होते . कार्यशाळेला विनोद पा . उपाध्ये ' तंटामुक्ती अध्यक्ष देवानंद उपाध्ये ;मुकेश उपाध्ये ;नकुल उपाध्ये ;वैभव  उपाध्ये परशु तिडके
दिनेश लाहे ;विवेक उपाध्ये ;संतोष उपाध्ये इत्यादी शेतक -यांची उपस्थिती होती .कोरोणा महामारी लक्षात घेता शासन सूचनांचे पालन करुन कार्यशाळा संपन्न झाली .


शेती लागवड खर्च कमी करूण सोयाबीन ;तूर उत्पादण वाढीसाठी कारंजा कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शनात कृषी विभाग शेतकऱ्यांचे दारी उपक्रमानुसार शेतकऱ्यांना बीयाणे उगवण शक्ती ;बीजप्रक्रीया बुरशीनाशकाचा वापर ;बी.बी.एफ. तंत्रज्ञान ;उताराला आडवी पेरणी तसेच शेतकऱ्यांचे प्रश्नांची सोडवणूक मार्गदर्शन कार्यशाळा घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या बांधावर खत बी बीयाने उपक्रमा प्रमाणे सदर उपक्रम कृषी विभाग करीत आहे .
संतोष चौधरी 
कृषी मंडळ अधीकारी कारंजा .

डझनभर पेक्षा जास्त संघटनेचा आंदोलनात सहभाग तहसीलदार यांना धक्काबुक्की प्रकरण ; आरोपींना तात्काळ अटक करा.



प्रतिनिधी । कारंजा (लाड) आरिफ़ पोपटे
कारंजा येथील मोहम्मद सलिम मजिद हासमानी व यांना सहकार्य करणारे यांच्यावर २० मे रोजी गुन्हे दाखल झाले असून त्या पैकी एकाना आतापर्यत अटक केली इतर आरोपी मोकाट असून त्यांना त्वरित अटक करा अशी मागणी विदर्भ पटवारी, महसूल, कोतवाल संघटना यांच्यासह डझनभर संघटनेच्या वतीने  उपविभागीय महसूल अधिकारी तसेच उपविभागील पोलीस अधिकारी यांना दि.२९ मे रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

कुंचल्यातून दिला तंबाखू विरोधी दिनाचा संदेश


तंबाखूचा दुष्परिणाम चितारला गेला कुंचल्यातून, 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो*. 

उदगीर प्रतिनिधी:- *गणेश मुंडे*  

तालुक्यातील कल्लूर येथील श्री पांडुरंग विद्यालयातील येथील  कलाशिक्षक यांनी लॉकडाऊनचा सदुपयोग करीत समाजभान राखून कुंचल्यातून तंबाखू विरोधी दिनाबद्दल जनजागृती करणारी अनेक चित्रे रेखाटली आहेत. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
संपूर्ण विश्वात कोरोनामुळे मृत्यूचे तांडव सुरू आहे.खेडी,तांडा,वाडी, गाव,तालुका,शहर,सगळीकडे पोहचला हा कोरोना व्हायरस. कोरोना महामारी आजारावर आळा घालण्यासाठी ही शासनाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (गुटखा,मावा, मशेरी,पानमसाला,सिगारेट,विडी,ई.) खाणे हे आरोग्याला घातक आहे. असे पदार्थ खाऊन सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर अथवा परिसरात कुठेही थुंकल्यास कायद्याने बंदी घातली आहे.आजचा दिवस म्हणजे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा दिवस आहे.यासाठी समाज प्रबोधनाची अत्यंत गरज आहे. 
चंद्रदीप नादरगे ग्रामीण चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत.वेगवेगळे सामाजिक आशय घेऊन अनेक चित्रे त्यांनी रेखाटली आहेत.आजचा दिवस म्हणजे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा दिवस आहे.या अनुषंगाने  पालकांना आपला मुलगा कोनत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ देवू नये हे त्रिकाल सत्य आहे.परंतु आपणच घरी तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करत असाल तर येणाऱ्या काळात तुमचीच मुले तुमचं अनुकरण करून व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात. यासाठी आजच सावधान व्हा...!      
आणि आजच्या दिवसापासूनच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन मी करणार नाही असा संकल्प सर्वांनीच करा.असा संकल्प केल्याने तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून दिवसेंदिवस वाढत चाललेली ही संख्या हळूहळू घटत जाईल आणि आपल्याबरोबर इतरांचेही स्वास्थ्य निरोगी राहील.
 *तंबाखूच्या व्यसनाचे दुष्परिणाम*
★तोंडामध्ये हळूहळू व्रण पडतात.
★व्रनाच्या मोठ मोठ्या जखमा होतात.काही दिवसांनी गाठी होतात.
★दवाखाना व औषध उपचार सुरु होतात.तोंडातील जखमा भरून आल्या नाहीत तर तोंडाचा कॅन्सर होतो.
★तंबाखू पोटात गेल्यावर पोटाच्या निरनिराळ्या तक्रारी सुरू होतात आणि तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो.★फुफुसचा त्रास होतो.★मूत्राशय व मूत्रपिंडाचे आजार होतात.★गर्भाशयाचा कर्करोगही होतो.★तंबाखूत असणाऱ्या निकोटिन मुळे मेंदूचे कार्य मंदावते.★मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होते.★औषध उपचाराने हा कर्करोग बरा होतो याची खात्री नाही.मोठमोठ्या शहरात तरुणांमध्ये फॅशन म्हणून धुम्रपाणाचे प्रमाण वाढले आहे.तंबाखू खाणे, सिगारेट-विडी ओढणे,तापकीर हुंगणे, दातांना मशेरी लावणे, चिलीम, हुक्का,चिरुट आशा पदार्थाचा वापर शहरी भागातील तरुण सर्रास करताना दिसतात.त्यामुळे धुम्रपणाचे प्रमाण वाढले आहे.तंबाखू ,दारू व अमली पदार्थ नशा उत्पन्न करतात.
त्यांचे सतत सेवन केल्याने व्यक्तीच्या
आरोग्याला धोखा निर्माण होतो.आणि अशा व्यसनामुळे शेवटी व्यक्तीचा प्राणही जाऊ शकतो.वाईट व्यसनांचे प्रत्येकाने दुष्परिणाम ध्यानात ठेवावे.
व अशा व्यसनापासून दूर रहावे.जर प्रत्येकाने स्वतःवर विश्वास आणि मनावर ताबा ठेऊनच तंबाखू व अमली पदार्थाचे सेवन बंद केले पाहिजे.म्हणतात ना आरोग्य संपत्ती हीच धन संपत्ती.आपले आरोग्य जपाल तर कुटुंबही सुरक्षित राहील.असे झाले तरच भारत तंबाखू व अमली पदार्थमुक्त होऊ शकतो. 
          अशी अनेक चित्रे कागदावर चितारून चंद्रदीप नादरगे यांनी याबाबत तंबाखू विरोधी दिनाचे महत्त्व सांगितले आहे.

Friday, 29 May 2020

पट्टणकोडोली देवस्थान समितीच्या पदाधिकारी निवडी संपन्न

पट्टणकोडोली :. ( साईनाथ आवटे) 
अध्यक्ष पदी अमोल बाणदार 

तर उपाध्यक्षपदी प्रशांत निकम..........
 
पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील सकल मराठा समाज पट्टणकोडोली व  तुळजाभवानी देवस्थान कमिटी व  अध्यक्ष मा. श्री. मच्छिंद्र पांडुरंग जाधव* यांच्या सहमतीने सकल मराठा समाज पट्टणकोडोली व तुळजाभवानी देवस्थान कमिटी* *2020-21* या वर्षा करता अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या अध्यक्ष पदी अमोल बाणदार उपाध्यक्ष पदी मा.श्नी. प्रशांत निकम खजिनदार - .रविंद्र डेळेकर सेक्रेटरी-महादेव इंगळे यांची तसेच 21  सदस्य निवडण्यात आले असून तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार तसेच समाजातील बांधवांना येणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
नियमित पुजारी म्हणून जयसिंग (आण्णा) दळवी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली असल्याचे नुतन अध्यक्ष अमोल बाणदार यांनी सांगितले.

कारंजा तालुक्यातील काजळेश्वर चौकीला पोलीस तथा शिक्षक कर्मचारी रखरखत्या उन्हात करत आहेत वाहनाची तपासणी



प्रतिनिधी आरिफ़ पोपटे
काजळेश्वर  : अकोला जील्हा रेड झोन घोषीत आहे . अकोला जिल्हयातून धानोरा पाटेकर मार्ग काजळेश्वर कडून कारंजा तालूक्यात प्रवेश होऊ नये करीता काजळेश्वर चौकीला ज्ञानप्रकाश विद्यालयाचे शिक्षक कर्तव्यावर आहेत . रखरखत्या उन्हात काटेकोर कर्तव्य बजावतांना पोलीस कर्मचारी सहमाध्यमिक शिक्षक दिसत आहेत .
          वृत्त असे की काजळेश्वर येथे अकोला जील्हा सिमा बंद करण्या हेतू धानोरा पाटेकरकडून येणारी वाहतूक थांबविण्यासाठी चौकी क्रं .१० कारंजा तहसीलदार धीरजमांजरे यांनी दिली आहे . या चौकीवर आमचे प्रतीनीधीने भेट दिली असता
कारंजा ग्रामीन पोलीस स्टेशनचे हेड कान्स्टेबल मुरलीधर उगले ;ज्ञान प्रकाश विघालयाचे स . शिक्षक मनोज उपाध्ये ;योगेश उपाध्ये कर्तव्यावर होते . रखरखत्या उन्हात वाहनाची तपासणी करीत होते .परवाणगी नसनाऱ्याना वापसी करीत होते . दुचाकी ' मोटारसायकली तीनचाकी अॅटो तसेच चारचाकी गाड्या भर उन्हात  तपासणी करुन आपले कर्तव्य पार पाडीत आहेत .कोरोणा विषाणूचा संसर्ग वाशिम जील्याला होऊ नये कारंजा तालूक्यात रेड झोनमधून बाधीत येऊ नये करीता प्रामाणिक प्रयत्न करतांना ह्या चौकीवर खडा पहारा देण्याचा प्रामाणीकप्रयत्न असल्याचे कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे हेड कान्स्टेबल मुरलिधर उगले म्हणाले . सामाजीक बांधीलकी जोपासत विलास सावरकर हे चौकीवरील कर्मचारी यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देत आहेत .

वाढदिवसानिमित्त 1 लाख होमिओपॅथिक औषध बाटल्या आणि 10 हजार सॅनिटायझर स्प्रे बॉटल्स वाटप करणार - आमदार ऋतुराज पाटील


कोल्हापूर प्रतिनिधी : 

गेली दोन महिने सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी 31 मे रोजी होणारा माझा वाढदिवस साजरा करणार नाही. वाढदिवसाच्या निमित्ताने कोल्हापूर दक्षिण मतदार संघ तसेच कसबा बावडा येथील घरोघरी रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या 1 लाख होमिओपॅथिक औषध बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी 10 हजार सॅनिटायझर स्प्रे बॉटल्स देण्यात येणार आहेत. रक्तदान करु इच्छिणाऱ्या तरुण पिढीसाठी गुगल फॉर्मच्या माध्यमातून रक्तदात्यांची डिरेक्टरी तयार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. 
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या दोन महिन्यांच्या काळात डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून आम्ही गरजूंना वेगवेगळ्या मार्गाने मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येकजण आपआपल्या पध्दतीने प्रयत्न करीत आहे. यामध्ये स्वत:ची रोगप्रतिकार शक्ती वाढविणे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ही गोष्ट लक्षात घेवूनच कोल्हापूर दक्षिण मतदार संघ आणि कसबा बावडा येथे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या ‘आर्सेनिक एल्बम-30 C’ या भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने मान्यता दिलेल्या होमिओपॅथिक औषधाचे वाटप करण्यात येणार आहे. 
कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी योग्य प्रकारे सॅनिटायझेशन करणे महत्वाचे आहे. सार्वजनिक ठिकाणी अनेक लोक एकमेकाच्या संपर्कात येत असतात. त्यावेळी जास्त काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. ही गोष्ट लक्षात घेवूनच  दक्षिण मतदारसंघातील केशकर्तनालय, दळप-कांडप गिरण, छोटे व्यावसायिक याबरोबरच ग्रामपंचायत, दुध डेअरी, सेवा सोसायटी या सारख्या सार्वजनिक ठिकाणी अर्धा लिटर क्षमतेच्या 10 हजार सॅनिटायझर स्प्रे बॉटल देण्यात येणार आहेत. 
वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर घेण्याची संकल्पना अनेक तरुण मित्रांनी माझ्याकडे मांडली होती. पण कोरोनाच्या संकटात सोशल डिस्टंसिंगचा मुद्दा लक्षात घेवून रक्तदान शिबीर ऐवजी रक्तदान करु इच्छिणाऱ्यांची डिरेक्टरी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी गुगल फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणार आहे.ही  यादी रक्तपेढीकडे दिली जाईल. यामुळे ज्यांना रक्त हवे असेल ते रक्तपिढीच्या माध्यमातून या रक्तदात्यांना संपर्क करु शकणार आहेत.जास्तीत जास्त युवा पिढीने रक्तदाता म्हणून या गुगल फॉर्मवर नोंदणी करावी, असे आवाहनही आ.पाटील यांनी केले आहे.

महापूर पिक कर्जमाफी लढ्यास यश - कर्जमाफी रक्कम जमा

कुरुंदवाड प्रतिनिधी 
रखडलेल्या पुरवणी पिक कर्जमाफी बाबत शिरटी येथील ग्रामस्थांच्या संयुक्त लढ्यास यश मिळाले असून  शेतकऱयांच्या विविध बँकांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम  रु  ११ कोटीं  ८१लाख कालपासून जमा होण्यात सुरुवात झाल्याने शेतकऱयांच्यात समाधान पसरले आहे याचा फायदा २८४६ शेतकऱ्यांना झाला आहे शिरोळ तालुक्यातील शेतकऱयांच्या रखडलेल्या या पुरवणी पीक कर्जमाफीबाबत शिरटि  येथील बहुसंख्य शेतकऱ्यांनीसहकार आयुक्त व राज्य शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा दिला होता   तर नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर  यांनी शासकीय दरबारी  सदरचा प्रश्न लावून धरला होता. 

 याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने  २७ मार्च रोजी खास आदेश काढून शेतकर्यांच्या रक्कमा तातडीने सांगितले आहे 

  शिरोळ तालुक्यामध्ये जुलै ऑगस्ट २०१९ या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने  महापूर येऊन शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान झाले होते  त्यांचे पंचनामे होऊन शासकीय लेखा परीक्षण  हि झाले होते त्यानुसार शासनाने शेतकऱयांच्या खात्यावर पीक कर्जमाफीची रक्कम भरण्यास सुरुवात केली होती  मात्र मध्येच सहकार आयुक्तांनी एक  बँकांना देऊन संयुक्त सामायिक  खाती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास मनाई केली होती 

  यामुळे जवळपास  १२  कोटी रुपये पडून होते याबाबत शिरटि येथील शेतकऱयांनी सहकार आयुक्त जिल्हा निबंधक तालुका निबंधक यांना निवेदन देऊन सदरची रक्कम तातडीने शेतकऱयांच्या खात्यावर जमा करावी अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन आम्हाला न्याय मागावा लागेल असा इशारा राज्य शासन व सहकार आयुक्तांना दिला होता तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रश्नी उच्च न्यायालयात विनामोबदला त्यांची बाजू मांडु अशी भुमिका वकिल धैर्यशील   सुतार यांनी  घेतलि होति याची दखल घेत संबंधित विभागाने  पीक कर्जमाफी पुरवणी यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यावर विविध बँकांतून त्यांची कर्जमाफीची रक्कम जमा केली आहे याबाबत नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही    मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी पत्र  व्यवहार करून  संयुक्त व सामायिक खाती असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे नितांत गरजेचे असल्याचे त्यांना सांगितले होते या दुहेरी प्रयत्नांना यश आल्याचे  शेतकऱ्यांच्यातुन बोलले जातआहे

*::::उशिरा का असेना शासनाला यासंदर्भात जाग येऊन शेतकऱयांच्या खात्यावरती पैसा जमा करत आहेत ही समाधानाची बाब आहे पूरबाधित पिकाची कर्जमाफी मिळाली नसती तर शेतकऱयाला मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले असते   या कामी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे तालुका निबंधक प्रेमकुमार राठोड  सहकार अधिकारी बाळकृष्ण शिंदे सर्व विकास संस्थांचे चेअरमन सचिव  यांचे विशेष सहकार्य लाभले होते **::;;

                                सुरेश कांबळे

                               शेतकरी  शिरटी 

नंदुरबार जिल्हा परिषदेची २८ भरारी पथके जिल्हाभरात एकाच वेळी कामांची तपासणी

नंदुरबार ( प्रतिनिधी वैभव करवंदकर )  :- - -

                कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य व इतर सुविधा सुरळीतपणे मिळत आहेत किंवा नाही? हे पाहण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाभरात अचानक २८ भरारी पथके पाठवून एकाच वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने,  ग्रामपंचायती आणि रोजगार हमी योजनेच्या कामाची पहाणी केली. यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण होऊन, सर्व कर्मचारी नेमून दिलेल्या कामाच्या ठिकाणी पूर्णवेळ उपस्थित राहतील, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा जी सी यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात नागरिकांचा प्रत्यक्ष संपर्क येणाऱ्या ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पशुवैद्यकीय दवाखाने यातील कामकाज कोरोना विषाणूच्या (covid-19) अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांनुसार सुरू आहे किंवा नाही? हे पाहण्याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची संख्या व उपस्थिती, आरोग्य केंद्रांमधील भौतिक सुविधा, स्वच्छता, तेथील उपकरणे, केंद्रांच्या प्रशासकीय दप्तराची परिस्थिती; त्याचबरोबर औषधांचा उपलब्ध साठा, याबाबत माहिती घेण्यात येत असून, ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये मासिक सभा नियमानुसार नियमित होतात काय?, ग्रामसभा नियमांनुसार पार पडत आहेत काय?, ग्रामपंचायतीने विविध नोंदवह्या अद्ययावत ठेवल्या आहेत काय?, ग्रामपंचायतींची कर वसुली योग्यरीत्या केली जात आहे का?, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजनांची कामे योग्यरीत्या केली जात आहेत काय?, अशा पद्धतीची पाहणी या भरारी पथकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
 पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये सुद्धा उपस्थित कर्मचारी वर्ग, त्यातील तांत्रिक कामाचा आढावा, साथीच्या रोगाबाबत दवाखान्यात ठेवण्यात आलेल्या नोंदवह्या, तसेच ग्रामस्थांसाठी दवाखान्याची माहिती भिंतीवर लावण्यात आली आहे काय? या बाबींचा भेटीतील पाहणी मुद्द्यांमध्ये समावेश आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावरही या पथकांकडून भेटी देण्यात आल्या असून, कामावरील मजूर उपस्थिती तपशील, मजुरांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा तपशील, पूर्ण झालेल्या किंवा चालू असलेल्या कामांबाबत तपशील, मजुरी वाटपाचा तपशील, अशी माहिती महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांवर भेटी देऊन या पथकांनी घ्यावयाची होती.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभाग प्रमुखांच्या नेतृत्वाखाली २८ पथकांची एकूण ८४ अधिकाऱ्यांच्या समावेशाने नियुक्ती केली होती. त्यात स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शेखर रौंदळ, उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्रीमती वसुमना पंत, सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा घोडमिसे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भुपेंद्र बेडसे, महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री अतुलकुमार गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, लेखाधिकारी श्री मनोज परदेशी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री दिलीप चौधरी, लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री सुनिल शिंदे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री प्रमोद बडगुजर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री उमेश पाटील, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कार्यक्रम समन्वयक अनिकेत पाटील, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री प्रदीप लाटे, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी श्री नारायण पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री मच्छिंद्र कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री भानुदास रोकडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. सी. एस. जाधव, नंदुरबार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री अशोक पटाईत, शहादा चे गटविकास अधिकारी श्री. सी. टी. गोसावी, धडगावचे गट विकास अधिकारी श्री सी. ए. बोडरे,  अक्कलकुवाचे गटविकास अधिकारी श्री. सी.के. माळी, नवापुरचे गटविकास अधिकारी श्री नंदकुमार वाळेकर, तळोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री आर. बी. सोनवणे, ग्रामपंचायत विभागाचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री महेश वळवी, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री बी. डी. गोसावी,  सहायक गटविकास अधिकारी श्री. महेश पोतदार यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या २८ पथकांतील ८४ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन त्या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायती तसेच पशुवैद्यकीय दवाखाने व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व भागात गेलेल्या पथकांकडून जिल्ह्यातील सद्यस्थितीचा अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होण्याची अपेक्षा जिल्हा परिषद प्रशासनाने व्यक्त केली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या नेमणुकीच्या ठिकाणी पुर्णवेळ उपस्थित राहून शासनाच्या सर्व योजना नागरिकांपर्यंत सुरळीत पोहचविण्यासाठी व त्यांची १०० टक्के अंमलबजावणी करण्यासाठी सजग रहावे, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना प्रत्यक्ष काम करतांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन योग्यरीत्या मार्गदर्शन करणे,
हाच या भरारी पथक नियुक्तिमागचा उद्देश्य असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा यांनी सांगितले.

आपले आयुष्य माझ्यासाठी खूप अनमोल आहे". आमदार डॉ. विनय कोरे.(सावकार)

"
माजगाव प्रतिनिधी- 
आपले आयुष्य माझ्यासाठी खूप अनमोल आहे" असे उद्गार डॉ. विनय कोरे.(सावकार) यांनी काढले  आर्सेनिकम अल्बम ३०औषध वाटप प्रसंगी बोलत होते. 
संपुर्ण जगासह आपला देश कोव्हीड १९,कोरोना विषाणूचा सामना करीत आहे. त्याचे संक्रमण रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासन, पोलिस यंत्रणेबरोबरच आशा वर्कर,अंगणवाडी ताई तसेच प्राथमिक शिक्षक आपल्या जीवाची पर्वा न करता स्वतःला झोकून देऊन .....संपूर्ण जगाला संकटकाळी धाऊन येणाऱ्या आपल्यातल्या देवपणाच दर्शन घडवत आहेत......याबद्धल सर्व कोरोना योध्याचं आभार मानले.
          भविष्यामध्ये ज्यावेळी कोरोनाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हे कोरोना योध्ये इतिहासाच्या रूपाने अमर राहतील.
           आपल्या देशामध्ये जर १%लोकांना कोरोनाची बाधा झाली तर,आपल्या देशाची अवस्था दयनीय होऊ शकते. अशी अवस्था होऊ द्यायची नसेल तर,कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी आपण काळजी घ्यायला हवी. यावर आर्सेनिकम 
अल्बम ३० ची मात्रा गुणकारी ठरत आहे. या औषधामुळेच केरळ कोरोनामुक्त च्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच कोरोनाबधित कुटुंबामध्ये संक्रमणाची साखळी तुटत आहे.तसेच जर्मनीमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.
          माणसांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिकम अल्बम३०हे होमोप्याथिक औषध आरोग्य मंत्रालय (आयुष्य),भारत सरकार यांच्याकडून मान्यताप्राप्त आहे.सदरचे औषध आपण आपल्या कार्यक्षेत्रातील घराघरांमध्ये पोहचावावे असे आवाहन याप्रसंगी केले. हे औषध घेताना उपाशीपोटी सलग तीन दिवस पाच गोळ्या घ्याव्यात.असेही सांगितले.
          यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, पन्हाळा अंतर्गत पोर्ले/ठाणे येथील माता नेत्रा विजय खुडे यांना आमदार विनय कोरे याच्या हस्ते बेबी केअर किट देणेत आले.
            कार्यक्रमाला प्रकाश पाटील (आण्णा)माजी जि. प.सदस्य कोल्हापूर, परशुराम खुडे माजी सभापती मार्केट कमिटी, कोल्हापूर.मारुती आरेकर सरपंच ग्रा.पं. पोर्ले/ठाणे.पृथ्वीराज सरनोबत माजी सभापती पं.स.पन्हाळा. लक्ष्मण मगर सरपंच ग्रा.पं.उत्रे. संभाजी जमदाडे तंटामुक्ती अध्यक्ष, पोर्ले/ठाणे.अस्विनी पाटील आरोग्य अधिकारी,ग्रामपंचायत सदस्य व सर्जेराव गुरव सर,आनंदा डाकरे सर,हिंदुराव काशीद सर,विकास कांबळे सर,रवी माने सर,लोखंडे मॅडम धनाजी नांदगावकर सर,बाजीराव कदम सर,अंगणवाडी ताई,आशा वर्कर व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

१५ जुनला शाळा सुरू करण्यास शैक्षणिक व्यासपीठाचा तीव्र विरोध

.
हातकणंगले / प्रतिनिधी
मिलींद बारवडे
   कोरोना बाधितांची  संख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हयात वाढत असल्याने, सद्या राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने जिल्हा प्रशासनाने बहुतांशी शाळा व महाविद्यालये , विविध वस्तीगृहे, निवासी शाळांची वस्तीगृहे, आश्रमशाळा विलगीकरणासाठी ताब्यात घेतल्याने तसेच जिल्हा बंदीमुळे महाराष्ट्राच्या विविध भागात शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक अडकून पडल्याने व अनेक पालकांनी मुळ गावी स्थलातंर केल्याने आणि पालकांच्या मनामध्ये कोरोना बाबत प्रचंड भिती असल्याने व शालेय वयोगट लक्षात घेता १५ जुनपासून महाराष्ट्रात शाळा सुरू करणे हे संयुक्तीक ठरणार नाही. म्हणून याला शैक्षणिक व्यासपीठाचा तीव्र विरोध करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची मुख्याध्यापक संघाच्या  विद्याभवन सभागृहात झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष एस.डी. लाड होते.
    १५ जुनपासून शाळा सुरू करण्याबाबत शासकिय स्तरावरून शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांशी शासन चर्चा करत आहे. म्हणून जिल्हा व्यासपीठाचे मत शासनाला कळीवण्यासाठी आजच्या सभेचे नियोजन करण्यात आले होते. उपस्थित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी १५ जुनपासून शाळा सुरू केल्यास निर्माण होणाऱ्या अडचणी विषयी स्पष्ट मते मांडली. प्रत्येक शाळेत आरोग्य व्यवस्थेचा खर्च कोण उचलणार, विदयार्थ्यांमधील सामाजिक अंतर राखणे किती अवघड आहे, विद्यार्थ्यांची वाहतुक सुविधा, कोरोना सेवेसाठी नेमण्यात आले ल्या शिक्षकांना अर्जित रजा मंजूर कराव्यात, ऑनलाईन शिक्षण देण्यास येणाऱ्या समस्या, चालू वर्षी संच मान्यता करू नये व कोणत्याही शिक्षकास अतिरिक्त ठरवू नये, टप्पा अनुदानावरील सर्व शाळांना पुढील टप्पा अनुदान ताबोडतोब मिळावे , मुल्याकंन पुर्ण केलेल्या सर्व प्राथमिक , माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व सन १२-१३च्या वर्ग तुकड्यांना वेतन अनुदान सुरू करावे, आयसीटी तज्ञ शिक्षक यांना सेवेत घेऊन त्यांचे वेतन सुरू करावे या विषयांवर सर्वकंश चर्चा करण्यात आली.
       १५ जुनपासून शाळा सुरू होण्यास विरोध असला तरी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठयक्रम पुस्तकांचे वितरण व्हावे, १५ जुनपासून शैक्षणिक सत्र सुरू करून शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांना उपस्थित राहण्यास परवाणगी दयावी. 
   या सभेस अध्यक्ष सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, प्रा. जयंत आसगावकर, शिक्षक नेते दादासाहेब लाड,शिवाजी माळकर,  भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, प्रभाकर हेरवाडे, सुधाकर निर्मळे, व्ही जी पोवार,  बाबासाहेब पाटील, संतोष आयरे ,बी जी बोराडे,  सी एम गायकवाड, डी एस घुगरे,  के के पाटील, उदय पाटील, शिवाजी कोरवी, विजय पाटील, काकासाहेब भोकरे, राजेंद्र कोरे ,पंडीत पवार,    मिलींद बारवडे, आर वाय पाटील ,एस एस चव्हाण, जगदिश शिर्के ,अशोक हुबळे, संदिप पाटील, नंदकुमार गाडेकर, इरफान अन्सारी,  मोहन आवळे प्रा. समीर घोरपडे, प्रकाश सुतार  आदी पदाधिकारी उपस्थित होते.
        फोटो 
शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत चर्चा करीत असतांना अध्यक्ष एस.डी. लाड, दादासाहेब लाड, जयंत आसगावकर सुरेश संकपाळ दत्ता पाटील व इतर मान्यवर.

आरोपींना तात्काळ अटक करण्याकरिता महसूल कर्मचाऱ्यांचे काळी फित लावून आंदोलन

कारंजा प्रतिनिधि आरिफ पोपटे 
रेती माफियाकडून झालेल्या मारहाण निषेधार्थ कारंजा तहसील कार्यालयामध्ये सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काळी फित लावून आंदोलन करण्यात येत आहे.दरम्यान दि.28 मे रोजी उर्वरित फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या करिता उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन ही पटवारी संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.तसेच या आरोपींची विद्यमान सत्र न्यायालयाने जामीन सुद्धा नामंजूर केला आहे.

आपत्कालीन परिस्थिती असल्यामुळे काम बंद न ठेवता काळी फित लावून तहसील कार्यालयात काम सुरू आहे.

भारतवीर मंडळातर्फे रिक्षा व्यावसायिकांना मदतीचा हात


कसबा बावडा प्रतिनिधी ता. 29 

कसबा बावडा येथील भारतवीर तरुण मंडळाच्यावतीने रिक्षा व्यावसायिकांना साखर वाटून मदतीचा हात दिला आहे.     लाॅकडाऊनच्या काळात रिक्षा व्यवसायाला बंदी घालण्यात आली होती. त्या काळात गेले दोन महिने रिक्षा व्यावसायिक घरी बसून असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन त्यांच्या घरचे संपूर्ण बजेटही कोलमडले होते. सरकारने आर्थिक मदत करावी यासाठी सुद्धा लोकप्रतिनिधी आणि वर्तमानपत्रांतून पाठपुरावा देखील करण्यात आला होता. 
                आता लॉकडाऊन 4.0 मध्ये प्रशासनाने रिक्षा व्यावसायिकांना काही नियम लागू करून व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. पण प्रवासीच नसल्याने पाहिजे तेवढा व्यवसाय होत नाही यामुळे रिक्षाचालक हतबल आहेत. दिवसभर स्टॉपवर उभे राहूनसुदधा क्वचितच भाडे मिळते.
       कसबा बावड्यातील भारतवीर मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत कसबा बावडा ते छत्रपती शिवाजी पुतळा मार्गावर रिक्षा व्यवसाय करणार्‍या रिक्षा व्यावसायिकांना साखर वाटप करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सचिन हरिष चौगले, भारतवीर मित्र मंडळाचे पदाधिकारी व रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.

Thursday, 28 May 2020

हरित उदगीर हरित जळकोट संकल्पना लोक चळवळीतुन राबविले जाणार - - राज्यमंत्री संजय बनसोडे

उदगीर प्रतिनिधी  -  गणेश मुंडे

लातूर जिल्ह्यात वन क्षेत्राचे प्रमाण ख कमी असल्याने  हे वाढविण्यासाठी वृक्षलागवड ही लोक चळवळ व्हावी यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावे पुढील काळात हरित उदगीर,व हरित जळकोट ही संकल्पना राबविली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा,पर्यावरण राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे.
उदगीर,जळकोट तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये 5 जुन,पर्यावरण दिन रोजी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे या बाबत  आढावा घेण्यात आला.या बैठकील मछिद्रं गायकर विभागीय वन अधिकारी उस्मानाबाद, प्रियंका गंगावणे सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी,उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, रोहयो चे उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी,उदगीर चे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, तहसीलदार जळकोट संदीप कुलकर्णी, न. प. मुख्याधिकारी उदगीर  भरत राठोड,उदगीर पंचायत समितीचे  गटविकास अधिकारी उदगीर अंकुश चव्हाण,जळकोट  गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांच्या सह उदगीर जळकोट मतदान संघातील बसवराज पाटील नागराळकर ( प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस),राजेश्वरजी निटुरे ( माजी नगराध्यक्ष उदगीर), प्रा. शिवाजीराव मुळे (ता.अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस उदगीर ),मन्मथ अप्पा किडे ( ता. अध्यक्ष कॉंग्रेस जळकोट ), अर्जुन मामा आगलावे ( ता.अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जळकोट ), सिध्देश्वरजी पाटील(सभापती कृ. उ. बा. स. उदगीर )शिवाजी अण्णा केंद्रे, कल्याणजी पाटील(ता.अध्यक्ष कॉंग्रेस उदगीर ),चंदन पाटील नागराळकर ( युवक जि.अ.राष्ट्रवादी काँग्रेस लातुर )बाबुराव जाधव,बालाजी ताकबीडे(सभापती पं. स. जळकोट ),संतोष तिडके(जि. प. गटनेते )बापुराव राठोड,समीर शेख उपस्थित होते
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाचे वृक्ष लागवडीचे जे उदीष्ट आहे त्याप्रमाणे नियोजन करण्यात यावे सामाजिक वनीकरण विभागाने 30 जुन 2011 चा शासन निर्णय नुसार राज्यात वृक्षलागवडीचा बिहार पँटर्न राबवावा पर्यावरण दिनानिमित्त उदगीर,जळकोट या तालुक्यात लावण्यात येणाऱ्या वृक्षारोपासाठी दोन्ही तालुक्यातील उपविभागीय अधिकारी याच्या अघ्यक्षेतेखाली सामिती स्थापण करण्यात येणार आहे.ही समिती तालुक्यातील प्रत्येक नगरपालिका, ग्रामपंचायत  याच्याशी समन्वय साधेल प्रत्येक ग्रामपंचायतीस झाडे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासोबतच मागील काही वर्षाचा अनुभव पाहाता काही सेवाभावी संस्था पाच जुन रोजी वृक्ष लागवड करत असतात या संस्था मार्फत करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीचा आढावा घेऊन ज्या संस्था या वृक्ष लागवड व संगोपन पुढील तीन वर्षे यशस्वी करतील त्या संस्था पैकी प्रथम,द्वितीय,तृतीय येणाऱ्या संस्थास अनुक्रमे 11लाख, 5 लाख व ,3 लाख बक्षिसे देण्यात येणार आहेत अशी माहिती राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

प्रेरणादायी - महिला स्वयंसहाय्यता समुहांची मंदीतही संधी - लॉकडाऊनमध्ये तब्बल 72 लाखांच्या मास्कची निर्मिती आणि विक्री

कोल्हापूर प्रतिनिधी 
 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 305 स्वयं-सहाय्यता समुहाने या लॉकडाऊनच्या काळात 5 लाख 55 हजार 742 मास्कची निर्मिती केली. केवळ निर्मिती करून न थांबता 71 लाख 35 हजार 16 रूपये किंमतीला या मास्कची विक्री करून कोल्हापूर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर स्थानापन्न झाला आहे.
 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य या स्वयं-सहाय्यता समुहांना मास्क निर्मितीसाठी लाभले आहे. 
 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू सर्वप्रथम झाला. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात लॉकडाऊनला सुरूवात झाली. या लॉकडाऊनच्या काळात घराघरात नवनवे उपक्रम, विशेषत: खाद्यपदार्थांच्या निर्मितीवर भर राहिला आहे. पण तो कुटूंबातील सदस्यांसाठी मर्यादित असेल. बदलत्या काळाची पावले ओळखत त्याच पध्दतीने स्वत:मध्ये बदल घडवण्याचे काम जिल्ह्यातील स्वयं-सहाय्यता समुहातील महिलांनी केले आहे. बाजारातील मागणी आणि पुरवठा याचे गणित समजावून घेत जिल्ह्यातील या महिला सदस्यांनी लॉकडाऊनचा उत्तम फायदा करून घेतला आणि जिल्ह्यालाही दिला आहे.  गेल्या 64 दिवसात मिळालेल्या संधीचं सोनं करत जिल्ह्यातील 305 स्वयं-सहाय्‌यता समुहातील 1301 महिला सदस्यांनी 5 लाख 55 हजार 742 मास्कची निर्मिती आजअखेर केली आहे. आजअखेर 71 लाख 35 हजार 16 रूपयांना याची  विक्री झाली आहे. 
 आजरामधील 12, भुदरगडमधील 150, चंदगडमधील 15, गडहिंग्लजधील 17, गगनबावडामधील 11, हातकणंगलेमधील 12, कागलमधील 17, करवीरमधील 16, पन्हाळ्यातील 14, राधानगरीतील 16, शाहूवाडीतील 13 आणि शिरोळमधील 12 अशा एकूण 305 समुहांचा समावेश आहे. यामध्ये कागलमधील समुहाने सर्वाधिक म्हणजे 2 लाख 42 हजार 10 मास्कची निर्मिती करून विक्री केली आहे.
 या निर्मिती झालेल्या मास्कची खरेदी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केली आहे. बाजारापेक्षा अत्यंत कमी किंमतीत पण दर्जेदार असणाऱ्या या मास्कला आता मागणी वाढती आहे. बाजारात उपलब्ध झालेली गरज, असणारी मागणी आणि आलेल्या कोरोनासारख्या महामारीच्या युध्दात महिलांनीही लावलेला हातभार यशस्वी ठरतोय. आम्ही महिलाही  मागे नाही, योध्दे ठरतोय असाच काहीसा संदेश जिल्ह्यातील या महिलांनी स्वकर्तृत्वाने दिला आहे. 
                                           

२६ मेपासून बँकांचे कामकाज सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत चालणार


वाशिम, प्रतिनिधि (m आरिफ पोपटे ) २३ में:

      जिल्ह्यात लॉकडाऊनचे सुधारित नियम लागू करण्यात आले असून सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांच्या कामकाजाच्या वेळेतही बदल करण्यात आला असून २६ मे २०२० पासून जिल्ह्यातील बँक कामकाजाचा कालावधी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत करण्यास जिल्हाधिकारी हृषीकेश  मोडक यांनी मंजुरी दिली आहे.


कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व बँकांच्या कामकाजाची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आली होती. मात्र, लॉकडाऊनच्या सुधारित नियमानुसार सर्व दुकाने व आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेच्या वेळत बदल करण्यात आला आहे. राज्यस्तरीय बँक सल्लागार समितीच्या सूचनेनुसार बँक कामकाजाची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत करण्याच्या जिल्हा अग्रणी बँकेच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी मंजुरी दिली असून २६ मेपासून जिल्ह्यातील सर्व बँका आता सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. 

प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पिक कर्ज देण्याच्या सूचना

*विभागीय जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक*

• *उत्पादन वाढीसाठी दर्जेदार बियाणे आवश्यक*




वाशिम, प्रतिनिधि (m आरिफ़ पोपटे ) : दि 27

     आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून अथवा या खतांचा काळाबाजार करून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. विभागीय जिल्हा खरीप हंगाम पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज, २७ मे रोजी आयोजित बैठकीत अकोला येथून ते बोलत होते.


वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. गडेकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांच्यासह प्रगतशील शेतकरी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले होते.


वाशिम जिल्ह्याचा आढावा घेताना कृषिमंत्री श्री. भुसे म्हणाले, खरीप हंगामासाठी रासायनिक खतांचा, विशेषतः युरियाचा मुबलक साठा उपलब्ध आहे. कृषि विभाग यंदा ५० हजार मेट्रिक टन युरियाचा अतिरिक्त साठा करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना युरियाचा तुटवडा भासणार नाही. लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांची गैरसोय होवू नये, यासाठी त्यांना बांधावर खते, बियाणे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम कृषि विभाग राबवीत असून त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हंगाम काळात खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होवू नये, तसेच लिंकिंगचे प्रकार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी. असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.


आगामी खरीप हंगामात कृषि उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच पेरणीसाठी वापरल्या जाणाऱ्या घरगुती बियाणांची उगवण क्षमता तपासणे सुद्धा आवश्यक असून त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी. गुलाबी बोंड अळीचा धोका लक्षात घेता, शेतकऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी कापूस लागवड न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.


*शेतमाल खरेदीची गती वाढवा*


वाशिम जिल्ह्यात कापूस पणन महासंघ व ‘सीसीआय’मार्फत कापूस खरेदी करण्यात येत आहे. आगामी पावसाळा लक्षात घेता कापूस खरेदी प्रक्रिया गतिमान करून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी होईल, याची दक्षता घ्यावी. तसेच ‘नाफेड’मार्फत सुरु असलेल्या तूर व हरभरा खरेदीची सुद्धा गती वाढवावी. जिल्ह्यात हळद खरेदी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी कृषि विभागाने समन्वय साधून प्रयत्न करावेत, अशा सूचना श्री. भुसे यांनी यावेळी दिल्या.


*प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज द्या*


महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेकरिता जिल्ह्यातील ९९ हजार २२३ शेतकरी पात्र ठरले असून आतापर्यंत ७० हजार ९६५ शेतकऱ्यांना ४५३ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. उर्वरित २८ हजार २५८ शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम लवकरच बँकेकडे वर्ग केली जाणार आहे. राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार या शेतकऱ्यांना सुद्धा बँकांनी यंदा पीक कर्ज वाटप करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही कृषिमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिल्या.


*जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. ठाकरे म्हणाले*, वाशिम येथे स्वतंत्र जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी कार्यालय सुरु करावे. तसेच जिल्ह्यात सध्या एकच उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय असून एक नवीन उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालये सुरु करण्याची विनंती केली. सदर मागण्यांवर सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ, असे श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. तोटावार यांनी खरीप हंगामाच्या अनुषंगाने करण्यात आलेले नियोजन, उपलब्ध बियाणे, खते याविषयी माहिती दिली

Wednesday, 27 May 2020

महावितरणच्या 3700 कर्मचार्‍यांना अर्सेनिक अल्बम चे मोफत वाटप - डॉ. अर्चना सपाटेंनी जपली सामाजिक बांधिलकी

कोल्हापूर प्रतिनिधी -
कोरोना संकटकाळात डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबरच महावितरणचे कर्मचारी सुद्धा अविरत कार्यरत आहेत. संचारबंदीतही वीज पुरवठा अखंडित सुरळीत ठेवून लोकांना दिलासा देत आहेत. त्यांचा अनेक ग्राहक व नागरिकांशी संपर्क येतो याकरिता त्यांना कोरोनापासून संरक्षणासाठी काळजी घेण्याची गरज आहे.
            नेमकी हीच बाब लक्षात घेऊन कोल्हापूर येथील डॉ. अर्चना विक्रांत सपाटे यांनी महावितरण कर्मचार्‍यांना अर्सेनिक अल्बम औषधाचे मोफत वाटप करुन मदत केली. आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असलेल्या अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधांचे त्यांनी जवळपास 3700 वर कर्मचारी आणि अधिकारी यांना वाटप करण्यात आले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकी बद्दल महावितरण कर्मचार्‍यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 
             कोरोना संकटकाळात महावितरण कर्मचार्‍यांना अर्सेनिक अल्बम औषधाचे वाटप केले बद्दल महावितरण कोल्हापूर परिमंडळाचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी डॉ अर्चना सपाटे यांचे आभार व्यक्त केले व आपल्या औषधांमुळे महावितरण कर्मचार्‍यांचे मनोबल नक्कीच वाढेल असे सांगितले.


http://mh9kolhapurnews.blogspot.com/2020/05/blog-post_642.html?m=1 मुळव्याध अत्यंत प्रभावी औषध जाणू घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा 

दिनेश व दिपाली च्या शुभविवाह निमित्ताने रेशीमबंध प्रमाणपत्र व शपधविधी संपन्न

दोंडाईचा - (प्रतिनिधी वैभव करवंदकर)  दोंडाईचा  येथील चुनिलाल शंकर मेटकर यांचे जेष्ठ पुत्र  दिनेश  व चोपडा येथील  अनिल बाबुराव शिंपी  यांची जेष्ठ कन्या दिपाली यांचा शुभविवाह सोहळा झाला.       कोरोना  विषाणूचा  संसर्गचा काळात तसेच  केंद्र सरकार राज्य शासनाने लाॅकडाऊन केल्यामुळे लग्न सोहळा मोठ्या स्वरूपात न घेण्याचे आदेश असल्यामुळे   कोणत्याही प्रकारची गर्दी न करता रामी शिवारातील महादेवाचा मंदिरात  साध्या पद्धतीने त्यांचे कौटुंबिक व मुलीकडील  दोंन व्यक्ती यांच्या साक्षिणी  विवाह संपन्न झाला होता.   त्या नव दाम्पत्याला  अखिल भारतीय श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज  ,  मंध्यवंर्ती संस्थे तर्फे दिल्या जाणारे रेशीमबंध प्रमाणपत्र व नव दाम्पत्यास  शपथ आज दिनांक  २६ मे २०२०  रोजी   अखिल भारतीय श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज  ,  मंध्यवंर्ती  संस्थेचे  नामविश्व चे सहसंपादक प्रा प्रकाश भांडारकर धुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पांडुरंग शिंपी दोंडाईचा शिंपी समाज अध्यक्ष   हरिदास जगताप ,  उपाध्यक्ष   मनोज मेटकर  ,  म.का.सदस्य  सुरेश बागुल   ,  कन्हैयालाल जगदाळे ,  नामविश्व प्रतिनिधी युवा अध्यक्ष   सतिश जाधव ,  नवयुवक मंडळाचे उपाध्यक्ष   विशाल मेटकर , सचिव  सागर पवार  ,  योगेश बोरसे  यांच्या उपस्थितीत  वरवधू यांना       अखिल भारतीय श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज  ,  मंध्यवंर्ती  संस्थेच्या तर्फे रेशिमबंध  प्रमाणपत्र देऊन शपथविधी दिला गेला.

मुदतबाह्वय रिक्षा, टॅक्सीसाठी दिलासा - स्क्रॅपला वर्षाची मुदतवाढ - डॉ. स्टीव्हन अल्वारिस



कोल्हापूर,दि. 27  :  पेट्रोल-डिझेल ऑटोरिक्षा  16 वर्षे, एलपीजी ऑटोरिक्षा 18 वर्षे व टॅक्सी 20 वर्षे अशी वयोमर्यादा यापूर्वी राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकारणाने निश्चित केली होती.  त्यानुसार ही  मुदत 31 मार्च 2020 रोजी  संपली होती. त्यामुळे  ही वाहने स्क्रॅप करावी लागणार होती. या वाहनांना 1 वर्षाची म्हणजे 31 मार्च 2021 पर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय  जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षते खाली आणि पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी दिली.
 राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने यापूर्वी निश्चित केलेल्या वयोमर्यादे नुसार 2823 पेट्रोलच्या, 396 डिझेलच्या, 2128 एलपीजीच्या रिक्षा अशा एकूण 5347 ऑटो रिक्षा त्याचप्रमाणे 13 पेट्रोल टॅक्सी, 112 डिझेल टॅक्सी, 61 एलपीजी टॅक्सी अशा एकूण एकूण 180 टॅक्सींची वयोमर्यादा 31 मार्च 2020 ला संपल्यामुळे सर्वांना वाहने स्क्रॅप करावी लागणार होती. बऱ्याच ऑटोरिक्षा संघटनांनी याबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे मुदत वाढवून मिळण्याबाबत विनंती केली होती. 
कोरोना पार्श्वभूमीवर ऑटो चालकांवर ओढवलेले संकट पाहता ऑटो रिक्षा स्क्रॅप करून दुसरे मोठे संकट त्यांच्यावर ओढवणार होते. जिल्हाधिकारी अध्यक्ष, पोलीस अधीक्षक सदस्य व प्रादेशिक परिवहन अधिकारी सदस्य सचिव असणाऱ्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीने या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या निर्णयाला  एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांना दिलासा दिला आहे. आता ही मर्यादा 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 

http://mh9kolhapurnews.blogspot.com/2020/05/blog-post_642.html?m=1  मुळव्याध अत्यंत प्रभावी औषध जाणू घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा