कोल्हापूर /प्रतिनिधी
दि.1/3/21
वीस टक्के व चाळीस टक्के टप्पा अनुदान घेणाऱ्या शाळांचा वेतन अनुदान वितरणाची पुरवणी यादी बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. लवकरच या बाबतचा आदेश निघणार आहे, अशी माहिती पुणे विभाग शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी दिली.
शिक्षक आम. प्रा.आसगावकर म्हणाले, ही प्रक्रीया यापूर्वीच होणे गरजेचे होती, तरी देखील या माझ्या शिक्षक बांधवांना या तरतुदीमुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे. भविष्यामध्ये आपण प्रचलित पद्धतीचा आदेश काढण्यासाठी आग्रही राहणार आहोत. तसेच अघोषिताच्या याद्या लवकरात लवकर घोषित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच आहेत.
कोल्हापूर विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे टप्पा अनुदानाचा निधी वितरणाचा आदेश एकत्रितच निघणार आहे.या पूरक मागण्यांमध्ये जरी त्याचा उल्लेख नसला तरी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी हा आदेश काढताना या संस्था एकत्र घेण्याचे आश्वासन दिले आहे,तरी शिक्षकांनी आश्वस्त राहावे असे आवाहन पुणे शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी केले आहे .
फोटो
शालेय शिक्षणमंत्री नाम. वर्षाताई गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करतांना शिक्षक आम. प्रा. जयंत आसगावकर.