हेर्ले / वार्ताहर
दि.8/3/21
हेरले (ता. हातकणंगले )येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने दोन संगणक व दोन प्रिंटर प्रदान करण्यात आले.
हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामपंचायतीच्या वतीने १५ वित्त आयोग मधून एक लाख निधीचे दोन संगणक व दोन प्रिंटर प्रदान करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील, पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख, उपसरपंच राहुल शेटे, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या स्वरूपा पाटील, विजया घेवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो
हेरले : प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामपंचायतीच्या वतीने संगणक व प्रिंटर प्रदान करताना पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार वैद्यकिय अधिकारी डॉ.राहुल देशमुख उपसरपंच राहुल शेटे ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण व अन्य मान्यवर