कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.4/3/21
जागतिक महिला दिन 2021 निमित्ताने गायक शिक्षक मंच यांच्या वतीने गेले दोन वर्ष गायक शिक्षक मंचामध्ये आपले कुटुंब व आपली नोकरी सांभाळून गायन सादर करणाऱ्या प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक 21 शिक्षिकांना "संगीत सखी सन्मान 2021 " हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे गायक शिक्षक मंचाचे प्रमुख राजेंद्र कोरे, बाळ डेळेकर व रवींद्र सूर्यवंशी यांनी संयुक्तपणे माहिती दिली.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ७मार्च २०२१ रोजी दुपारी ४:०० ते सायंकाळी ७:००वा. या वेळेमध्ये सदरचा कार्यक्रम होणार असून हा कार्यक्रम राम गणेश गडकरी हॉल , पेटाळा या ठिकाणी संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन व पुरस्कार वितरण अप्पर पोलीस अधीक्षक गडिंग्लज जयश्री गायकवाड व पोलिस उपअधीक्षक ( गृह )कोल्हापूर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमास सोमनाथ रसाळ हे प्रमुख पाहुणे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रभाकर हेरवाडे असणार आहेत.
याप्रसंगी " रजनीगंधा " हा पुरस्कार प्राप्त महिलांचा मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.सदरचा कार्यक्रम हा " गायक शिक्षक मंच कोल्हापूर " या फेसबुक पेज वरून सर्वांना लाईव्ह पाहता येणार आहे.
पुरस्कार प्राप्त शिक्षिका :
गिरिजा जोशी, शयराज मणेर, वर्षाराणी वायदंडे ,तबस्सुम आत्तार , मिरा शिंदे ,स्मिता पुनवतकर , निशा साळुंखे, नयना पाटील, स्नेहलता शिर्के ,उज्वला पाटील, रुपाली पाटील ,मनीषा एकशिंगे ,माया सूर्यवंशी ,रेखा पोवार ,विद्या शिंत्रे , संध्या आळवेकर ,आदिती ठाकरे ,उषा कोल्हे, स्वरा आकोळकर, सुजाता गायकवाड अशी माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे राजेंद्र कोरे यांनी प्रसिध्दीस दिली.