हेरले / प्रतिनिधी
दि.14/3/21
हेरले ( ता. हातकणंगले ) येथे कै अश्विन सर्जेराव जाधव यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले.
माने केअर हॉस्पिटल जयसिंगपूर व हातकणंगले आर्थोपेडिक अँड ई एन टी क्लिनिक व श्रीमंत जिजाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्दमाने जयसिंगपूर येथील अस्थिरोग तज्ञ डॉ. अभिजीत माने आणि कान नाक घसा तज्ञ जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ.नीता माने व लायन्स क्लब ऑफ जयसिंगपूर यांच्या वतीने डोळे तज्ञ डॉ. शिवाजी पवार यांच्या उपस्थित मोफत आरोग्य तपासणी व मोफत डोळे तपासणी तसेच मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर संपन्न झाले.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते संपन्न झाले.
या शिबिरामध्ये १३० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हाडांची तपासणी योग्य उपचार, विकारांची तपासणी योग्य उपचार, कान नाक व घसा मोफत औषधे मोफत डोळे तपासणी, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर, हर्निया व किडनी स्टोन तपासणी व उपचार करून अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यासाठी१३जणांची नोंदणी करण्यात आली.
या प्रसंगी संयोजक राकेश जाधव , सुहास राजमाने,माजी उपसभापती अशोक मुंडे, उपसरपंच राहुल शेटे, विनोद वड्ड, अर्जुन पाटील, सचिन जाधव डॉ. अमोल चौगुले, बकत्यार जमादार, सारंग पाटील , विशाल परमाज,लखन कांबळे, लखन वड्ड, प्रमोद वड्ड , मारूती जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो
हेरले: मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटन प्रसंगी दलित मित्र डॉ. अशोकराव माने डॉ. अभिजीत माने डॉ. निता माने राकेश जाधव व इतर मान्यवर.