कोल्हापूर / प्रतिनिधी
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना नव्याने 20 टक्के व 20 टक्के वेतन घेणाऱ्या शाळांना 20 टक्के वाढीव वेतन अनुदान देण्याचा शासन आदेश आज शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केला . यामुळे या आदेशाने राज्यातील 33 हजार 214 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यासाठी 140 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून एक नोव्हेंबर २०२० पासून यांचा लाभ मिळणार आहे . यासाठी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा केला होता .
15 फेब्रुवारी 2019 रोजी पात्र झालेल्या प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सी एम फंडातून आर्थिक तरतूद द्यावी अशी मागणी या अधिवेशनात आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी केली होती .शासनाने त्वरित हा प्रश्न निकाली काढण्याचे ग्वाही यावेळी दिली होती . त्यामुळे राज्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिले होते .आज हा आदेश प्राप्त होत असताना यापूर्वी नियमबाह्य अनुदान उपलब्ध झालेल्या शाळांना अनुदान देऊ नये तसेच असे अनुदान दिले असल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी करण्यात येणार आहे. तसेच हे अनुदान कोणत्याही दुसर्या कामासाठी वापरता येणार नाही कोषागार अधिकारी हा निधी या निधीची तरतूद झाल्यावर ताबडतोब या सर्वांचे वेतन काढण्याचे आदेश दिला आहे .
15 फेब्रुवारी 2021 रोजी पात्र झालेल्या शाळांना सी.एफ. फंडातून तरतूद झाली नसल्याने मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी शिक्षणमंत्र्यांच्या विनंतीवरून 1 मार्च 2021 रोजी सुरू होणाऱ्या अधिवेशनात पुरवणी मागणी मंजूर करण्याचे अभिवचन दिले. त्यानुसार शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पुरवणी मागणी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झाली.
आज शालेय विभागाने 140 कोटीचा निधी वितरणाचा शासन आदेश शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे.हा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार जयंत आसगावकर यांनी ना. वर्षाताई गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.
हा आदेश सगळ्यांच्या संघटित प्रयत्नांमुळे निर्गमित होऊ शकला, याबद्दल मी सर्वांचेच आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो. परंतु अजूनही लढाई संपलेली नाही, कारण अद्यापही कोल्हापूर व मुंबई विभाग वंचित राहिलेले आहेत, अपात्र शाळा, अघोषित शाळा या अजूनही पगाराविना वंचित आहेत. या सर्वांसाठी आपण संघटितपणे प्रयत्न करूया.असे आवाहन शिक्षक आम. प्रा. जयंत आसगावकर यांनी केले आहे. अशी माहिती त्यांनी प्रसिध्दीस पत्रकाद्वारे दिली आहे.
. .. . . . . . ..
फोटो
वाढीव वेतन अनुदान देण्याचा शासन आदेश मंजूर केल्या बाबत शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांचे अभिनंदन करताना शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर .