हेरले प्रतिनिधी
दि.3/11/21
दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी त्यांच्या सेवाभावी संस्थेस गणेश मंदिरानजीक दोन गुंठे जमिन दिली असून या ठिकाणी सभागृह उभारण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या डॉ. पद्माराणी पाटील आपल्या विकास निधीतून प्रयत्नशिल आहेत असे मत माजी सभापती राजेश पाटील यांनी व्यक्त केले. ते हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे येथील वेद दिव्यांग अपंग सेवाभावी संस्था यांच्यावतीने परीसरातील दिव्यांग व अपंग बांधवांना दिवाळी भेट वस्तू वाटप प्रसंगी बोलत होते.या वेळी माजी सभापती राजेश पाटील यांच्या हस्ते दिवाळी भेट वस्तू वाटप करण्यात आले.
या प्रसंगी पंचायत समिती सदस्या मेहरनिगा जमादार, सरपंच प्रतिनिधी संदीप चौगुले ,उपसरपंच फरीद नायकवडी, ग्रामपंचायत सदस्य राहुल शेटे,बाळगोंडा पाटील, शिवाजी भोसले तसेच गावातील अपंग दिव्यांग बांधव व महिला उपस्थित होत्या.
फोटो
हेरले येथे वेद दिव्यांग अपंग सेवाभावी संस्था यांच्यावतीने परीसरातील दिव्यांग व अपंग बांधवांना दिवाळी भेट वस्तू वाटप करतांना माजी सभापती राजेश पाटील व अन्य मान्यवर