हेरले / प्रतिनिधी
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार एम एस एम ई टेक्नॉलॉजी सेंटर सितारगंज व संजय घोडावत पॉलिटेक्निक अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने "कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग" या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळा दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ वेळ ११ .०० ते ४ .०० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती प्राचार्य विराट गिरी यांनी दिली आहे.
या कार्यशाळेस सुशिक्षित बेरोजगार, महाविद्यालयीन विद्यार्थी, आय टी आय, डिप्लोमा, डिग्रीचे विद्यार्थी व हे सर्व शिकण्याची इच्छा असणारे सर्व युवक –युवती सहभाग घेवू शकतात. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून एम एस एम ई चे मा. श्री.आदित्य चौधरी आणि त्यांची टीम लाभलेले आहेत.
या कार्यशाळेस सहभागी होणाऱ्या सर्वांना एम एस एम ई चे शासनमान्य ई प्रमाणपत्र मिळणार आहे. ई-प्रमाणपत्राचा उपयोग उद्योग आधार नोंदणीसाठी तसेच शासकीय योजनेतील कर्ज प्रकरणासाठी उपयुक्त असेल. तरी या कार्यशाळेस जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख समन्वयक प्रा.अजय कोंगे यांनी केले आहे.
या कायर्शाळेच्या आयोजनाला कॉम्प्युटर इंजिनीरिंग विभागाचे प्रमुख प्रा.सागर चव्हाण व टीम यांचे सहकार्य लाभले.
या यशाबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन केले.