मिलींद बारवडे
पेठ वडगाव / प्रतिनिधी
सन २०२० /२१ च्या शैक्षणिक वर्षातील पाचवी व आठवी इयत्तेसाठी संपन्न झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा नुकताच निकाल जाहिर झाला असून या परीक्षेमध्ये वडगाव विद्यालय (जुनियर कॉलेज ) वडगावच्या सहा विद्यार्थ्यांनी गुण संपादन करून घवघवीत यश मिळवले आहे.
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यालयाचे १५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्या पैकी कु. राजवर्धन प्रताप पसाले याने ( १९८ ) गुण संपादन केले. कु.केदार संदीप नायकवडी याने (१६८ ) गुण संपादन केले. कुमारी शर्वरी शरद पाटील हिने (१२८) गुण संपादन करून हे तीन विद्यार्थी पात्र झाले.
आठवी शिष्यवृत्ती परीक्षामध्ये १५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील तीन विद्यार्थी पात्र झाले. कुमारी आर्या सचिन गुरव हिने (२४०) गुण संपादन केले. कुमारी श्रद्धा मुरलीधर पाटील हिने (२३४ ) गुण संपादन केले. कुमारी भक्ती अजित लाड हिने (१७८) गुण संपादन केले. आदी विद्यार्थ्यांनी या परीक्षेममध्ये यश मिळविले बद्दल आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार मुख्याध्यापक आर.आर.पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन अकबर पन्हाळकर यांनी केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई,अध्यक्षा श्रीमती शिवानी देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, उपाध्यक्ष शिवाजी सावंत, कौन्सिल मेंबर बाळासाहेब डेळेकर यांची प्रेरणा लाभली.
मुख्याध्यापक आर. आर. पाटील,उपमुख्याध्यापक एस. डी. माने पर्यवेक्षक डी. के. पाटील,तंत्रविभाग प्रमुख अविनाश आंबी,कार्यवाह के. बी. वाघमोडे, डी. एस. शेळके, डी. एस. कुंभार आदीसह विषय शिक्षक मिलींद बारवडे, आर. एस. पाटील,एस. के. खाडे, जे. एम. मणेर , सचिन पाटील, जेष्ठ अध्यापिका आर.आर.पाटील, ए.डी.जाधव,एस. एस. चौगुले, एस. ए. पाटील, जी.व्ही. मोहिते ए. ए. गुरव, एस.जे.क्षीरसागर आदींचे मार्गदर्शन लाभले.
फोटो
वडगाव विद्यालय (ज्युनियर कॉलेज ) वडगावचे पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षामधील यशस्वी विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक आर. आर. पाटील व शिक्षक वृंद.