कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.२५/११/२१
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी साठी दिले जाणारे प्रशिक्षण नोंदणी बाबत शिक्षण विभागाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे.सदर प्रशिक्षणासाठी प्रति प्रशिक्षणार्थी रुपये २०००/ इतके शुल्क आकारले जाणार आहे.हा निर्णय अत्यंत चुकीचा व शिक्षकांचेवर अन्याय करणारा आहे. याचा कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे वतीने निषेध करण्यात आला.
आज पर्यंत अशा प्रकारच्या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने कधीही शुल्क आकारलेले नाही. प्रशिक्षण हे नि:शुल्कच असायला पाहिजे.
शासनाने हा निर्णय ताबडतोब रद्द करावा अन्यथा कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्याच्या संदर्भाचे निवेदन कोल्हापूर जिल्ह्याचे शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना देण्यात आले.
या वेळी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड, वसंतराव देशमुख ,मिलिंद पांगिरे, आर.वाय.पाटील,उदय पाटील , के.के.पाटील,पी.एस.हेरवाडे, संतोष आयरे,गजानन काटकर, अशोक पाटील, चंद्रकांत लाड, राजेश वरक आदी शिष्टमंडळ उपस्थित होते.
फोटो कॅप्शन --
शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना निवेदन देताना शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड , वसंतराव देशमुख, मिलिंद पांगिरे,उदय पाटील,के.के.पाटील,आर. वाय.पाटील, पी.एस.हेरवाडे, गजानन काटकर, अशोक पाटील, चंद्रकांत लाड, संतोष आयरे, राजेश वरक आदी