Thursday 18 November 2021

mh9 NEWS

कोरोनाकाळातील ऑनलाइन शिक्षण व विद्यार्थी

कोरोनाकाळातील ऑनलाइन शिक्षण व विद्यार्थी
डॉ अजितकुमार पाटील, ( पीएच डी ,मराठी )केंद्रमुख्याध्यापक.म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11,कसबा बावडा, कोल्हापूर

ऑनलाइन शिक्षणाची सुरूवात

:सध्याच्या कोरोनाकाळात 
मार्च 2020 मध्ये सर्व ठिकाणी कोरोनामुळे टाळेबंदीमुळे शाळा बंद झाल्या तरी फोन आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शिक्षक मुलांशी जोडलेले आहेत. शिक्षकांनी तयार केलेल्या चित्रफिती व्हॉट्सअॅपवर पाठवण्यापासून सुरू झालेला प्रवास झूम, गुगल मीटसारख्या माध्यमांतून ऑनलाइन अध्यापनापर्यंत येऊन पोचला आहे. हा प्रवास निश्चितच सोपा आणि सुकर नव्हता. बदलेल्या परिस्थितीशी जुळवून घेत शिक्षकांनी त्यातून चांगल्या प्रकारे मार्ग काढला. नवी तंत्रज्ञान शिकून घेत ही नवी पध्दत आत्मसात केली.
'शाळा बंद, पण शिक्षण सुरू' या शासनाच्या भूमिकेमुळे ऑनलाइन अध्यापन तर सुरू झाले, पण ऑनलाइन अध्ययना' चे काय? शाळेत शिकतानादेखील वाचन-लेखन- गणनात मुले किती मागे आहेत, हे वारंवार झालेल्या सर्वेक्षणातून, वर्तमानपत्रात आलेल्या आकडेवारीतून आपल्याला समजते. मग या ऑनलाइन पध्दतीत संकल्पनांचे आकलन होते आहे का? ऑनलाइन शिक्षण मुलांसाठी योग्य आहे का? तळागाळातील मुलांपर्यंत ते पोचतेय का? अंतर्मुख करायला लावणारे हे प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत.

अडचणीची मालिका

ऑनलाइन शिक्षणासाठी लागणारा स्मार्टफोन, संगणक किंवा टॅब आणि हेडफोन, तसेच उत्तम दर्जाचे इंटरनेट मुलांकडे असले की शिक्षण निदान सुरू तरी होईल. पहिली शंका मनात येते की कोल्हापूर भागातील बराचसा ग्रामीण भाग हा सोयी नसलेल्या भागातील आहे.म्हणजे पालक अन्न व नोकरी शोधण्यात धडपडत असतात. काही ठिकाणी जिथे अद्याप वीजही घड पोहोचलेली नाही, तिथे इंटरनेटची काय सविधा असेल याविषयी न बोललेलेच बरे.... ग्रामीण आणि शहरी भागांतही आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील मुलांना दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था नसते, तिथे स्मार्टफोन कसा घेणार? अशा अडचणींमुळे ही मुले ऑनलाइन शिक्षणापासून वंचितच राहत आहेत. आवश्यक साधने नसल्याने त्यांच्या मनात न्यूनगंड तयार होऊन शिक्षणाच्या प्रवाहापासून ती दूर जाणार नाहीत ना, अशी भीती मनात येतेय. 

ऑनलाइन शिकणे

स्मार्टफोन, इंटरनेटची सुविधा असलेल्या मुलांचे तरी ऑनलाइन पध्दतीत 'शिकणे घडतेय का ?... शिक्षकांनी मुलांना शिकवणे, ही पारंपारिक पध्दत आता बदलतेय. घरी, शाळेत, परिसरात, मित्रमैत्रिणींसोबत अनेक गोष्टी बघत, ऐकत, हाताने करत अनुभवा घेत मुले शिकत असतात. त्यासाठी योग्य वातावरणनिर्मिती, शैक्षणिक साधने आवश्यक संधी शिक्षक उपलब्ध करून देत असतात. मुलांचे जास्तीत जास्त शिज्ञकणे हे त्यांनी घेतलेल्या अनुभवातून घडतं. ऑनलाइन शिक्षणात असे अनुभव घेता येत नसल्याने त्यांच्या शिकण्याला मर्यादा येते. चेहरयावरील भाव पाहून मुलांना समजलेय की नाही हे शिक्षकांना कळते. कित्येकदा सांगूनसुध्दा मोठी मुले व्हिडिओ बंद ठेवतात, त्यामुळे शिक्षकांना अध्यापनाचे समाधान मिळत नाही आणि काहीही न घडता दिवस संपतो. परंतु मुलांच्या शिकण्याला पूरक असे वातावरण शिज्ञक्षकांनी निर्माण केले, तर मुलांचे शिकणे खूपच सुलभ होते,हा माझा स्वतःचा असा काही अनुभव नक्की सांगावेसे वाटतात. प्राथमिक शाळेतील मुलांना ऑनलाइन शिक्षण झेपेल का? मोबाईल हाताळाणे, माईक चालू- बंद करणे हे मुले सराईतपणे करू लागली. पहिली हा मूलभूत शिक्षणाचा पाया असतो. या टप्प्यावर अक्षरओळख, शब्द वाक्य व छोटे उतारे अशी एकेक पायरी चढत मुले वाचन-लेखन करू लागतात. संख्याओळख, बेरीज-वजाबाकी या मूलभूत गाणिती क्रियांची ओळखदेखील याच इयत्तेपासून होते. ऑनलाइन पध्दतीने हे कसे शक्य होईल? परंतु एकमेकांशी तसेच शाळेच्या पदाधिकरयांबरोबर चर्चा करून केलेल्या प्रयत्नांचा परिपाक म्हणूनच की काय, मुले वाचू-लिहू लागली आहेत.


पालकांची भूमिका

ऑनलाइन शिक्षणात पालाकंची भूमिकाही महत्त्वाची आहे. निरक्षतेमुळे आणि कामामुळे वेळ न देऊ शकणारे, मुलांना आवश्यक तिथेच मार्गदर्शन करणारे आणि मुलांच्या अध्ययनात अवाजवी हस्तक्षेप करणारे असे तीन प्रकारचे पालक आम्हाला दिसतात.मुलांना काही कृती पालकांबरोबर कराव्या लागतात. पाकांनी समजून करून घेतल्या तर मुलेही व्यवस्थित करतात. वाचन-लेखनाचा खूप सराव घ्यावा लागतो. शाळेत वेगवेगळया पध्दतीने सराव घेतला जातो. जे पालक असा सराव घेतात आणि त्या मुलांना थोडासा सराव पुरेसा असतो, ती मुले व्यवस्थित वाचू लागली आहेत. परंतु ज्यांचे आई बाबा साक्षर नाहीत किंवा ज्यांना पुरेसा वेळ देता येत नाही, अशा मुलांच्या शिकण्यात अडचणी येतायत.
काही पालक ऑनलाइन वर्गाच्यावेळी मुलांजवळच असतात. एखाद्या संकल्पनेचे विद्यार्थ्यांच्या सर्व उत्तरे बरोबरच यायला हवीत, यासाठी हा पाकांचा अट्टहास असतो. मुलाचा मेंदू तरतरीत ठेवायचा असेल तर सतत डोक्याला चालना मिळाली पाहिजे, वेगवेगळे प्रश्न समोर आले पाहिजेत. मेंदूसमोर जितक्या अवघड गोष्टी आपण ठेवू त्यातून तो शिकत जाईल, हे मेंदूचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी अनेक प्रयोगांअंती सिध्द केलेले आहे. नेमकी किती, कुठे आणि कशा प्रकारची मदत द्यावी याबाबत पालकसभेत वारंवार बोलत राहावे लागते. आकलन न होण्यामागचे आणखी एक मोठे कारण आहे, शाळेतल्या आणि घरातल्या वातावरणातला फरक. शाळेचे वातावरण मुलांच्या शिकण्याला पूरक असते. मुले विविध शैक्षणिक साधने वापरून, कृती करून, अनुभव घेऊन संकल्पना समजून घेत असतात. गरज लागेल तिथे शिक्षकाना प्रश्न विचारतात. त्या विषयावर पाठयपुस्तकापलीकडच्या अवांतर गप्पा होतो. शिक्षक आणि मुलांचा संवाद घडतो. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व करत असताना मुलांसोबत त्यांचे समवयस्क असतात. असेही म्हणतात की मोठयांपेक्षा आपल्या समवयस्कांकडून चांगल्या प्रकारे मुले समजून घेऊ शकतात. ऑनलाइन शिक्षणात या सगळ्या गोष्टींना मर्यादा येतात. शाळेत शिक्षकांकडून मिळणारी शाबासकीची थाप कौतुकाचे शब्द, शिक्षकांचा आश्वासक स्पर्श मुलांना हवाहवासा असतो. वर्गातील मुलांच्या साथीने शिकणे, वर्गातील मुलांच्या साथीने शिकणे, वर्गातील गमतीजमती, हसणे, भांडणे, मधत्या सुटीतील मजा, एकत्र डबा खाणे, मैदानावरचे खेळ, मित्र-मैत्रिणींसबोत शाळेत येणे या सर्व भावनिक आणि शारीरिक गरजा ऑनलाइन शिक्षणात पूर्ण होऊ शकत नाहीत. सर्वच मुलांच्या घरचे वातावरण शिकण्यासाठी पोषक असेलच याचीही खात्री आपण देऊ शकत नाही.
शिक्षणक्षेत्रात अनेक वर्षे मी शैक्षणिक कार्य व यु ट्यूब च्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण देत आहे. पण आपल्या मित्रांना याचा आनंद घेता येत नाही.ऑनलाइन वर्गात मित्र- मैत्रिणी दिसले तरी त्यांच्यासोबत खेळणे, गप्पा मारणे या गोष्टी मुलांना करता येत नाहीत. त्यामुळे काही मुले अस्वस्थ होतात. पहिलीतील एक मुलगा ऑनलाइन वर्गात फक्त आपल्या मित्राला शोधत असतो. तो मित्र नसेल तर हाही लक्ष देत नाही आणि 'आधी त्याला फोन करून वर्गात यायला सांग, तरच मी अभ्यास करीन' असे आईला सांगतो. सध्या मुले खूपच चिडचिडी झाली आहेत, असेही पालक सांगतात.


शिकण्याच्या संधी


ऑनलाइन शिक्षणामुळे शाळेत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांनाही मुलांना मुकाचे लागते. शाळेतील प्रदर्शन, स्नेहसंमेलन, वस्तू तयार करून दुकानजत्रेत विकणे, खेळदिनाला चुरशीने खेळ खेळणे आणि मुले पहिलीपासून ज्याची वाट पाहत असतात असे चौथीचे रात्रशिबिर अनुभवणे (एक रात्र मित्रमैत्रिणी व ताईसोबत शाळेत राहणे) यांसारख्या उपक्रमांची मजा मुलांना अनुभवता येत नाही. डोंगरावर, जंगलात फिरणे, सार्वजनिक वाहनाने सहलीला जाणे यांसारखे अनुभवही घेता येत नाहीत. आमच्या अ. भि. गोरेगावकर या माध्यमिक शाळेतही एकेका विषयावर मुले प्रदर्शन मांडतात. हे अनुभव मुलांच्या वाढीत मोलाची भूमिका बजावत असतात. प्रत्येक शाळेत थोडयाफार फरकाने असे उपक्रम ऑनलाइन पध्दतीने घेण्याचा प्रयत्नदेखील केला, पण शाळेतली मजा तिथे आली नाही. *मूल्यमापन* हा शिक्षणाचा अविभाज्य घटक आहे. शिकण्याचा हेतू अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि मूल्यमापन हे चक्र पूर्ण झाले तरच शिकणे घडले असे म्हणतात. हे शिकणे घडले का ते मुलांचे प्रतिसाद, मुलांच्या चेहऱ्यावरील भाव, मुलाचे स्मितहास्य पाहूनही लक्षत येते. हे प्रतिसाद शिक्षक आपल्याकडे नोंदवूनही ठेवतात. एखाद्या संकल्पनेचे आकलन झाले का हे तपासण्यासाठी रोजच्या सरावपत्रिका, दर आठवडयाच्या चाचण्या घेतल्या जाता. त्यामुळे शिक्षकाला अध्यापनाची दिशा ठरवतात येते, उणिवा कमतरात भरून काढता येतात. वर्गात मैदानात, सहलीला, उपक्रमाच्यावेळी मुलांचे मिळणारे प्रतिसाद हेही मूल्यमापनच असते. सध्या हे अजिबातच घडू शकत नाही. मूल्यमापनाच्या वेगवगळ्या पध्दती वापरण्यालाही मर्यादा आहेत. तसेच मुलांचे शिकणे घडले का याबाबतही मनात सभ्रम आहे. जर शिकणे घडलेच नसेल तर मूल्यमापन परीक्षा घेणेही अर्थहीन आहे. आता सरावपत्रिका चाचण्या दिल्या जात असल्या तरी मुख्य अडचण म्हणजे हे काम मुलानेच केले का याची खात्री देता येत नाही. त्यामुळे शिकवलेल्यापैकी कितपत मुलांपर्यंत पोचले ते तपासण्यासाठी मूल्यमापन घेता येईल. पण तेही योग्य मूल्यमापन आहे, असे ठामपणे म्हणता येणार नाही. तरीही पूढच्या वर्षीच्या नियोजनासाठी त्याचा उपयोग नक्कीच होईल.
येणाऱ्या काळासाठी ऑनलाइन शिक्षणात काही गोष्टी सकारात्मकही आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे मुले 'स्मार्ट' झाली आहेत. 'माईक म्युट / अनम्युट करा, पुन्हा जॉईन व्हा, लिंकवर क्लिक करा, कॅमेरा ऑन / ऑफ करा, स्लाईड बघा...' ही भाषा सुरूवातीला सवयीची नसल्याने मुले गांगरून जात होती. आता मात्र ती सरावली आहेत. पूर्वी कॅमेरासमोर कमी बोलणारी किंवा लाजणारी मुले आता आत्मविश्वासाने कवितेचा व्हिडिओ तयार करून पाठवत आहेत. कला-कार्यानुभवाच्या तासाला काही समजले नाही तर आम्ही व्हिडिओ बघून करू असे सांगून त्याप्रमाणे करू लागली आहेत. दुसरीकडे, ऑनलाइन वर्गासाठी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे,शिक्षण उप आयुक्त रविकांत अडसुळे, प्रशासनाधिकारी एस के यादव यांच्या प्रेरणेने टेक्नॉलॉजी शिक्षकांनी तयार केलेल्या पीपीटी,टिलिमिली कार्यक्रम, शनिवारच्या गोष्टी,टी व्ही वरील व्हिडीओ ,स्वाध्याय उपक्रम,यु ट्यूब, गुगल मिट, झुम मिटींगवर या सारखे शैक्षणिक उपक्रम ने विद्यार्थ्यांना घरी,शाळा परिसर मध्ये प्रभावी अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यात येत आहे. व्हॉट्सअप गटांचा उपयोग सूचनांपुरता मर्यादित न ठेवता मुलांचे शिकणे अधिक सुलभ होण्यासाठी चित्रफिती, ध्वनिफिती पाठवणे, घरी मुलांना सरावासाठी सरावपत्रिका, स्वध्यायपत्रिका पाठवणे यासाठीही करून घेता येईल.काही दिवसांनी शाळा नियमित सुरू होतील की नाही याबाबत आपण सध्या तरी काही सांगू शकत नाही. पण जो काही वेळ मिळेल त्याचे अत्यंत काटेकोर नियोजन करून मुलांच्या राहिलेल्या क्षमता पूर्ण करून मुलांच्या राहिलेल्या क्षमता पूर्ण करून घेण्यासाठी वेगवेगळया मार्गाचा शिक्षकांना अवलंब करावा लागेल.

विचारांची देवाणघेवाण

सर्व मुलांना एकाच पातळीवर आणण्यासाठी कृती योजना तयार कराव्या लागतील तसेच मुलांचे शिकवणे म्हणजे काय? यावावत पालांचेही प्रबोधन करावे लागेल. मुलांच्या शिकण्यात राहिलेल्या कमतरता भरून काढण्यासाठी *शिक्षणक्षेत्रात विचारांची देवाणघेवाण* करावी लागेल. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत जे जे नवीन शिक्षकांच्या आणि मुलांच्या पदरी पडले आहे, ते सोडून न देता शिक्षकांचे शिकवणे अधिक प्रभावी आणि मुलांचे शिकणे अधिक अर्थपूर्ण होण्यासाठी टिकवून ठेवले पाहिजे. शाळा व परिसरातून मिळणारे शिक्षण आणि ऑनलाइन शिक्षण
यांचा योग्य मेळ घालून एकविसाव्या शतकातील नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मुलांना सक्षम करणे आणि येणाऱ्या काळासोबत यशस्वीरीत्या पुढे जात राहणे यासाठी आपण सर्वांनीच आता तयार राहिले पाहिजे.
प्रत्यक्ष वर्गात बसून घेतले जाणारे शिक्षण ते ऑनलाइन शिक्षण हा एवढा मोठा बदल स्वीकारण्याची मानसिकता आणि क्षमता आपल्याकडच्या पालकांकडे आहे का?याचा विचार करणे गरजेचे आहे.
सत्य विचार केला असता
ऑनलाइन,व कोरोना,कोरोनानंतरचे जगामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. करोनोनंतरच्या काळात शाळा कशा असतील, या प्रश्नांची चर्चा  घडत आहे. त्यात प्रामुख्याने ऑनलाइन शिक्षण या मुद्द्यावर भर आहे. पण त्यापाठोपाठ असेही प्रश्न उपस्थित होत आहेत की, या चर्चेची एवढी घाई कशाला? अशा ऑनलाइन मंचांची खरोखर गरज आहे का? अशा व्यवस्थेसाठी लागणा-या पायाभूत सुविधा आपल्याकडे आहेत का? लहान मुलांना मोकळे का सोडले जात नाही? इत्यादी इत्यादी. 

मूलभूत प्रश्न 

सर्वच क्षेत्रात कोव्हिडं 19 ने प्रश्न उभे केले आहेत. त्यास शैक्षणिक क्षेत्रही अपवाद नाही. कोरोनानंतरच्या काळात शैक्षणिक सत्रे सुरळीत सुरू करण्याबरोबरच मुलांनाही सुरक्षित ठेवण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात आहे. आपण हे तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे, अशा आशयाच्या चर्चा सुरू आहेत. या सर्व गोष्टींचा उहापोह करण्याची हीच वेळ आहे. पण, प्रत्यक्ष वर्गात बसून घेतले जाणारे शिक्षण ते ऑनलाइन शिक्षण हा एवढा मोठा बदल स्वीकारण्याची मानसिकता आपल्याकडच्या पालकांकडे आहे का?
मुलांचे लक्ष एकाच गोष्टीकडे गुंतवणे ही महाकठीण गोष्ट. निदान शाळेत मित्र, शिक्षक, शाळेचे वातावरण या कारणांमुळे तरी मुले काही प्रमाणात का होईना अभ्यासाकडे लक्ष देतात *वातावरणाचा अभाव*:  घरात मात्र या सर्व वातावरणाचा अभाव असल्याने ‘घरून शिक्षण’ (लर्न फ्रॉम होम) या संकल्पनेचं काय होईल, ती यशस्वी ठरेल का, अशा शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
लहान मुलांना एखादी गोष्ट करण्यापासून जेवढे तुम्ही रोखाल तेवढे ते आणखी हट्टाने तीच कृती करतात. मोबाइलचेच उदाहरण घ्या ना. मोबाइल घेऊ नको, असं कितीही बजावून सांगितले तरी ते या ना त्या कारणाने मोबाइल डोळ्यासमोर धरतातच. याला सध्याच्या परिभाषेत ‘स्क्रीन टाइम’ असे म्हटले जाते. स्मार्टफोन आणि स्क्रीन यांच्यापासून लहान मुलांना फार काळ दूर ठेवणे शक्य होत नाही. टाळेबंदीमुळे घरात अडकून पडलेल्या लहानग्यांना या स्क्रीन टाइमपासून कसं भरकटवायचे हा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा आहे.


कौटुंबिक नाते सबंध

उलटपक्षी असाही विचार करणारे आहेत की, आपण आपल्या दैनंदिन जीवनात थोडा बदल करण्यात थोडे जरी यशस्वी ठरलो आणि लहान मुलांच्या कलेनुसार घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा स्क्रीन टाइम कमी करता येईल. त्यांचे गॅजेट्सवरील अवलंबित्व कमी केले तर पालक आणि कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर त्यांचे नाते आणखी दृढ होण्यास मदत होईल. मात्र, अल्प उत्पन्न गटातील पालक आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे अगदी असंच्या असे घडेल, याची काही शाश्वती नाही.
घरच्या घरी शाळा, हा पर्याय होऊ शकतो?
आधुनिक विचारांच्या आणि सुशिक्षित पालकांच्या मते घरच्या घरी शाळा हा पारंपरिक शाळांना उत्तम पर्याय आहे. त्यातील अनेकांना आता या कोरोना संकटाच्या काळात हा पर्याय योग्य वाटत नाही. मात्र, या घरातील शाळांचे अनेक फायदे असले तरी ते वास्तवात किती परिणामकारक ठरतात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शाळांकडून येणा-या माहितीत मोलाची भर घालून त्यांना परिपूर्ण करण्याच्या पालकांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही.
मुलांना गणितासारखा अवघड विषय सोपा करून सांगताना वेगवेगळी उदाहरणे देण्याकडे पालकांचा कल असतो. त्याचप्रमाणे इतिहासाचे धडे समजावून सांगण्यासाठी ऐतिहासिक स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्या माध्यमातून मुलांना इतिहास समजावून सांगण्यासाठी हल्लीचे पालक आग्रही असतात. ज्ञान आणि कौशल्यांबरोबरच पालकांच्या दिमतीला हल्ली ऑनलाइन साहित्यही असते. परंतु असे असले तरी प्रत्येकाच्या बाबतीत या घरातील शाळा हा उपक्रम यशस्वी ठरेल का, हा प्रश्न उरतोच.

अनेकदा अनेक कुटुंबांमध्ये काही प्रमाणात अशा काही कमतरता असतात की ज्यांमुळे शिक्षणाचे स्वरूप कसेही असो, त्या कमतरतांमध्ये बदल करता येतच नाही. लांबलेल्या सुट्ट्यांमुळे अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांमधील मुलांच्या शैक्षणिक सत्रातील यशाचे नुकसान झाल्याचे काही अभ्यासातून पुढे आले आहे. अशा प्रकारे शिकवण्याच्या वेळांमध्ये बदल होईल तसेच पालकांना उपलब्ध असलेल्या साधनांमध्ये बदल होईल.
अनेक पालकांना या पद्धतीसाठी आवश्यक असे ऑनलाइन साहित्य मिळविणेही दुरापास्त होईल आणि त्याचा अंतिम परिणाम विद्यार्थ्याच्या ज्ञानार्जनावर होईल. त्यामुळे कमी उत्पन्न असणा-या तसेच डिजिटली गरीब असलेल्या कुटुंबांतील मुले मागे पडतील. उपकरणांच्या किमतींमुळे तसेच परवडू न शकणा-या डेटा प्लॅन्समुळेही ही मुले ऑनलाइन अभ्यासात मागे राहतील. अनेक पालकांसाठी पर्यायाने त्यांच्या पाल्यांसाठीही महागडी उपकरणे दुष्प्राप्य आहेत. त्यामुळे ऑनलाइन अभ्यासाच्या शर्यातीतून अशा प्रकारचे विद्यार्थी आपोआपच बाद होतील.


ऑनलाइन वर्ग

 ऑनलाइन वर्गांची मागणी जसजशी वाढत जाईल, तसतसा ऑनलाइन शिकवणीच्या व्यवसायात गुंतलेल्या कंपन्यांचे प्रस्थ वाढू लागेल. एक असा टप्पा येईल की, सुरुवातीला मोफत ऑनलाइन शिक्षण देणा-या या कंपन्या त्यांच्या सेवांसाठी चांगला दाम मोजून घेऊ लागतील. ऑनलाइन शिक्षण देणा-या या कंपन्यांच्या अवाच्या सवा शुल्कामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना हे ऑनलाइन शिक्षण परवडणार नाही. त्यामुळे शाळा स्तरावर तंत्रज्ञानावर अति अवलंबित्व आणि वर्गातील सत्रांमध्ये घट, विशेषतः शहरी भागांत, या गोष्टींमुळे शालेय शिक्षण दुर्मीळ होईल आणि त्यामुळे अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांना तर प्राथमिक शिक्षण घेण्यातही अडथळे निर्माण होतील. इंटरनेटच्या कमी जोडण्या (२०१९ मध्ये ३६ टक्के) आणि वापरकर्त्यांमधील सामाजिक दरी यांमुळेही शालेय शिक्षणाची दैनावस्था होईल.
या साऱ्याव्यतिरिक्त इतरही घटक आहेत जे अल्प उत्पन्न आणि उच्च उत्पन्न कुटुंबातील मुलांमधील शिक्षणाची दरी अधिक रुंदावतील. अनेकदा असे होते की, अल्प उत्पन्न कुटुंबातील मुलांची कौटुंबिक परिस्थिती घरातील शाळांसाठी पोषक नसते. सामान्यतः ऑनलाइन शिक्षणासाठी संगणक आणि इंटरनेट जोडणी या दोन मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते. मात्र, भारतात आज असे कोट्यवधी कुटुंबे आहेत की, ज्यांना इंटरनेट जोडणी परवडत नाही. तसेच या कुटुंबांतील मुलांना धड गृहपाठ करण्याइतपतही मोकळी जागा घरात उपलब्ध नसते. शिवाय क्रमिक पुस्तकांची वानवाही त्यांच्या पाचवीला पूजलेली असते.
कित्येकांना तर चार भिंतींचे घरही नशिबात नसते. गाव, घर-दार सोडून रोजगाराच्या शोधार्थ शहराकडे धाव घेणा-या स्थलांतरित मजुरांच्या मुलांना तर त्यांचे आई-वडील गावीच सोडून जातात. अशा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्या आजी-आजोबांवर येते. सामान्यतः आजी-आजोबा फार शिकलेले नसतात. त्यामुळे मुलांच्या गृहपाठात ते सहकार्य करू शकत नाहीत. त्यामुळे अल्प उत्पन्न कुटुंबांतील मुलांना कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांचा अभ्यास आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अनंत अडचणी येतात. परिणामी ते अभ्यासात मागे पडतात.
कोरोना संकटामुळे अभूतपूर्व अशी आर्थिक मंदी येणे अपरिहार्य आहे. वाढती बेरोजगारी आणि अन्नाची भ्रांत यांमुळे विद्यार्थिदशेतील मुले कुपोषण, कौटुंबिक हिंसाचार, मुलांचा छळ आणि बालविवाह या अनिष्टतेच्या चक्रात अडकू शकतात. या कोरोना संकटाच्या काळात अनेक अल्पवयीन मुलांनी हेल्पलाइन क्रमांकावर दूरध्वनी करून मदत मागितली. यावरूनच अल्पवयीन मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या छळाला सुरुवात झाल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे मुलांना जरी इंटरनेट जोडणी आणि इतर आवश्यक गॅजेट्स दिली गेली तरी त्यांच्या घरातील वातावरण ऑनलाइन शिक्षणासाठी पोषक असेलच असे नाही.* 

इतर समस्या

त्यातच अनेक मुलांना कोरोना संकट ओसरल्यानंतर मजुरीच्या कामांना जुंपले जाण्याची शक्यताच अधिक आहे. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटू शकते. त्यामुळे दीर्घकाळ सर्व व्यवहार बंद राहण्याचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना संकटाच्या काळात धोरणकर्त्यांना पोषण आणि मुलांचे शिक्षण या दोन समस्या तीव्रपणे भेडसावत आहेत. शाळेत मिळणा-या आहारावरच जर गदा येणार असेल तर शाळेत जावे तरी का? असा प्रश्न मुलांना पडण्याची शक्यता अधिक आहे. तेव्हा हा भयगंड मोठ्या प्रमाणात मुलांमध्ये निर्माण होऊ नये, यासाठी सरकारने मुलांना शाळांमध्ये पोषण आहार मिळेल, याची शाश्वती द्यायला हवी. केरळ, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सरकारांनी याबाबतीत वेळीच योग्य पाऊल उचलले आहे. मुलांच्या शाळा बंद असल्या तरी त्यांना घरपोच माध्यान्ह भोजन प्राप्त होईल, याची तजवीज या राज्यांनी अंगणवाडी सेवकांच्या माध्यमातून करून ठेवली आहे.

शिक्षकांनीही संगणक, वायरलेस, इंटरनेट किंवा अभ्यासासाठी समर्पित ठिकाण या सुविधांशिवाय विद्यार्थ्यांना विद्यादान कसे करता येईल, या दृष्टीने अभ्यास करून त्या पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना करावी, असा विचार आता पुढे येऊ लागला आहे. दूरस्थ शिक्षण म्हणजे फक्त ऑनलाइन शिक्षण असे नाही तर संमिश्र माध्यमातून शिक्षण होय. अशा प्रकारच्या शिक्षणाचे उद्दिष्ट टीव्ही, रेडिओ आणि लघुसंदेश सेवा या माध्यमांतून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे, हे असते. टीव्हीद्वारे मुलांना शिक्षण देण्याच्या प्रक्रियेला पश्चिम बंगालमध्ये सुरुवातदेखील झाली आहे.
महाराष्ट्रातही असा प्रयोग राबविण्याचा विचार शासन पातळीवर गांभीर्याने केला जात आहे. साक्षरता आणि सामाजिक-आर्थिक दर्जा यांच्या पलीकडे जाऊन आज प्रत्येक पालक किंवा कुटुंब त्यांच्या पाल्याच्या शिक्षण प्रक्रियेत सहभागी होत आहे. पाल्याला मदत करू पाहात आहे. आपल्या पाल्यांचे शिक्षण अधिकाधिक सुकर कसे होईल, यावर पालक भर देऊ लागले असून ते एसएमएस सेवा, टीव्ही आणि रेडिओ या माध्यमांचा अधिक खुलेपणाने वापर करू लागले आहेत.
कोरोनाचा प्रभाव ओसरू लागला की, अनेक शाळा-विद्यालये कोरोनामुळे अभ्यासापासून वंचित राहिलेल्या सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी/हिवाळी शाळा शिबिरे भरवतील. तसेच विद्यार्थ्यांचे लहान लहान गट करून त्यांच्यासाठी जादा वर्ग किंवा नियमित शिकवण्या सुरू केल्या जातील. कोरोनाकाळात अनेक शाळांनी त्यांच्या वार्षिक परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे वर्षभरातील कामगिरीच्या आधारावरच मुलांचे मूल्यमापन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनातून त्यांना शिक्षणात येणा-या अडचणी ओळखता येतात तसेच शिकवण्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम पाहता येतो, त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे, या प्रक्रियेला तरी पूर्णविराम देऊ नये. तसेच सरकारनेही शालेय विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नियमित आर्थिक आधार उपलब्ध करून द्यावा.
धोरणांची आखणीही अशा पद्धतीने केली जावी की, ऑनलाइन पद्धतीने शिक्षण क्षेत्र संस्थांना पूर्ण मोकळीक  धोरण निश्चितीतही सर्जनशीलता, शैक्षणिक स्वातंत्र्य, सर्वसमावेशकता आणि ना- नफा किंवा राजकीय प्रभावापासून दूर राहणे इत्यादी घटकांना प्राधान्य द्यायला हवे.

समारोप


धोरणांची आखणी आणि निश्चिती केली जात असताना घरच्या आघाडीवर पालकांनी मुलांवर पुरेसे लक्ष ठेवत त्यांच्यावर या अभ्यासाच्या पूर्णपणे नवीन स्वरूपाची सक्ती न करणे गरेजेचे आहे. असेही होऊ शकते की मुले स्व-अभ्यासात स्वतःला गुंतवू पाहतील किंवा नवीन छंद जोपासतील अथवा वेळापत्रकाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे न पाहता नवनवीन गोष्टी शिकण्याकडे कल वाढवू शकतील.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :