कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण संचलित बॅरिस्टर खर्डेकर विद्यालयात सुंदर हस्ताक्षर कसे काढावे या संदर्भात मराठी विषयावर कार्यशाळा संपन्न झाली कार्यशाळेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक नामदेव वाघ यांचे हस्ते झाले प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुभाष मराठे यांनी केले आभार राजमाने मॅडम यांनी मानले.
कार्यशाळेचे नियोजन किरण पाडळकर यांनी केले होते प्रमुख मार्गदर्शन डॉ अजितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर कसे काढावे या संदर्भात आनंददायी शिक्षणातून प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांच्या करवी सुंदर हस्ताक्षर कशा प्रकारचे असावे याचे मार्गदर्शन केले.
उभी रेघ, आडवी रेघ, तिरकी रेघ, अर्धा गोल, पूर्ण गोल व लेखन करत असताना ताठ बसावे, पायाची हालचाल करू नये, डोळे व वही यामध्ये योग्य अंतर ठेवावे, पेन पकडण्याची प्रक्रिया व्यवस्थित असावी सतत पेन हलवू नये, शांत एकाग्रपणे लेखन करावे, लेखन करत असताना पूर्ण लक्ष लेखनकडे द्यावी अशा प्रकारचे छोटे छोटे नियम व प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर हसत हसत खेळत शिकवली त्यांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक नामदेव वाघ यांनी शैक्षणिक धोरण 2020 हे पुस्तक देऊन मानले.कार्यशाळेत 1 ली ते 7 वी मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.