हेरले / प्रतिनिधी
शाहू महाराज जयंती निमित्त "अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन, कोल्हापूर यांच्यावतीने इचलकरंजी येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे व डॉ. सुमित्रा पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार २०२२ व मानपत्र देऊन डॉ. विजय शामराव गोरड यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार यांनी डॉ. विजय गोरड हे करीत असलेल्या त्यांच्या सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल तसेच संजय गांधी व श्रावण बाळ पेन्शन योजनेमधील सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. पुरस्काराला उत्तर देताना डॉ. गोरड म्हणाले की,हा पुरस्कार म्हणजे आपण करीत असलेल्या कामाची पोचपावती आहे. दीनदुबळ्यांची, अपंगांची, ज्येष्ठांची आणि निराधारांची सेवा करणे हे पुण्याईचे काम असून ते मी यापुढेही निस्वार्थीपणे व अविरतपणे करत राहीन, आणि म्हणूनच हा पुरस्कार मी निराधार, वृद्ध, अपंग तसेच विधवा महिला यांना समर्पित करीत असल्याचे डॉ. गोरड यांनी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शाहू पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
फोटो
ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुराडे व डॉ. सुमित्रा पाटील यांच्या हस्ते लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार स्वीकारताना डॉ. विजय गोरड. शेजारी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार