दि 29 कसबा बावडा
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण संचलित मनपा राजश्री शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडा व यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय कसबा बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली शिक्षण परिषद डॉक्टर डी वाय पाटील इंजीनियरिंग हॉल मध्ये संपन्न झाली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ अजितकुमार पाटील होते शाळेच्या मुख्याध्यापिका छाया हिरगुडे व गौतमी पाटील यांच्या हस्ते तज्ञ मार्गदर्शक यांचा सत्कार करण्यात आला ,
कसबा बावड्यामध्ये केंद्रस्तरीय शिक्षण परिषदमध्ये शिवराज नलवडे ,विजय माळी, सुनिता कांबळे दत्तात्रय, डांगरे छाया पवार ,जे जे पाटील, अनिता नवाळे, टी आर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण परिषदेचे उद्घाटन झाले पहिल्या सत्रात व प्रास्ताविक मध्ये डॉ अजितकुमार पाटील यांनी निपुण भारत जीआर पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान अभियान यामध्ये त्यांनी
" विद्यार्थी देशाचे भवितव्य आणि संपत्ती आहेत त्यांचा सर्वाधिक विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही आपली सामग जबाबदारी आहे भारत सरकार च्या निपुण भारत हा राज्यात इयत्ता पहिली ते येणारे मुलांसाठी पहिले पाऊल शाळा पूर्वतयारी साठी राबवण्यात येत आहे मिळावे घेण्यात येत आहे विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य,भाषिक भाषा विकास उच्चार शास्त्राची जाणीव सांकेतिक भाषा शब्द संग्रह वाचन व आकलन वाचनातील लेखन ,वाचन संस्कृती तसेच पायाभूत संख्या ज्ञान ,संख्या व संख्यावरील क्रिया गणना करणे ,आकार व अवकाश समजावून घेणे यासाठी समावेशित शिक्षणा ची सुद्धा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शासन हे उपक्रम राज्यातील तीन ते नऊ वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांसाठी राबवत आहे याची अंमलबजावणी शिक्षकांनी करून शैक्षणिक धोरण 2020 ला न्याय द्यायचं काम शिक्षकांनी करायचं आहे, असे प्रतिपादन केले
शिक्षण परिषदेत तज्ञ मार्गदर्शक रामराजे सुतार नितीन खामकर, जयेंद्र बडद, साताप्पा पाटील, प्रदीप जानकर यांनी दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पाटील व उत्तम कुंभार यांनी केले तर आभार चंद्रकांत कुंभार यांनी मानले शिक्षण परिषदेमध्ये 109 शिक्षक,मुख्याध्यापक उपस्थित होते.