हेरले / प्रतिनिधी
छत्रपती शाहू फाउंडेशन यांच्या वतीने छत्रपती राजश्री शाहू राज्यस्तरीय पुरस्कार डॉक्टर दिपक मधुकर शेटे यांना देण्यात आला .छत्रपती शाहू महाराजांचे विचार विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचावेत यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात . अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समितीचे कोल्हापूरचे विद्यमान जिल्हाध्यक्षपद भूषवताना वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्यामध्ये जागृत व्हावा यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो . त्यांनी गणित रंजक व सुलभ करण्यासाठी दिपक शेटे अत्यंत दुर्मिळ वजन मापनाचा संग्रह असलेले असलेली स्वमालकीची गणित लॅब , गणितावर आधारित सात पुस्तके व दोन नाटके, गणितामधील विविध उपक्रम व आज अखेर दहावीचा शंभर टक्के निकालची परंपरा जपून योगदान दिले आहे.शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात ही दीपक शेटे आग्रही भूमिका बजावत आहेत त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . त्यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातुन कौतुक होत आहे . त्यांना शाळेचे प्राचार्य डॉ. डी. एस. घुगरे, सचिव एम.ए. परीट यांचे मार्गदर्शन लाभते .
फोटो
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारततांना डॉ. दीपक शेटे