Sunday 10 July 2022

mh9 NEWS

कोजिमाशि निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने सर्व जागा जिंकल्या - विरोधी पॅनेलचा धुव्वा उडवून सलग चौथ्यांदा सत्तेवर

.
.

     कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी सहकार सत्ताधारी आघाडीने २१ पैकी २१ जागा जिंकत विरोधी आमदार जयंत आसगावकर यांच्या राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडी 
पॅनेलचा पुरता धुव्वा उडवून सलग चौथ्यांदा सत्ता संपादित केली.
रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये रविवारी दि.१० रोजी  सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत  मतमोजणी झाली व निकाल जाहीर करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांनी काम पाहिले.
    दादासाहेब लाड यांच्या  नेतृत्वाखाली सत्ताधारी आघाडीने सलग चौथ्यांदा ही निवडणूक जिंकली. शिक्षक आमदार जयंत आसगावकर व शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्यादृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. या निवडणुकीत दादा लाड हे सरस ठरले. संपूर्ण निकाल जाहीर होताच सत्ताधारी आघाडीच्या समर्थकांनी कोजिमाशित 'एकच वादा लाड दादा ' घोषणा देत परिसर  दणानून सोडला. कोजिमाशिचे विद्यमान चेअरमन बाळ डेळेकर व संचालक राजेंद्र रानमाळे हे सलग तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅट्ट्रिक केली.संचालक अनिल चव्हाण दुसऱ्यांदा निवडून आले. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला. 
   कोजिमाशिच्या २१ जागेसाठी ४७ उमेदवार रिंगणात होते. कोजिमाशिची सभासद संख्या ८५२६ इतकी आहे. त्यापैकी ८१०६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाची टक्केवारी ९५.०७ इतकी आहे. कोजिमाशिच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेले महिनाभर माध्यमिक शिक्षण जगत ढवळले होते. आरोप-प्रत्यारोपांनी निवडणूक गाजली होती. आमदार आसगावकर व दादा लाड यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. कोजिमाशीमध्ये गेली १८ वर्षे दादा लाड यांची सत्ता आहे. यंदा सत्ताधारी आघाडी निवडणूक जिंकून विजय चौकार मारणार असा ठाम निर्धार दादा लाड यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला होता. दुसरीकडे आमदार आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीने कोजिमाशीमध्ये परिवर्तन घडवायचे ‌ या इराद्याने प्रचार यंत्रणा राबवली होती. शनिवारी झालेल्या  मतदानात ९५.७%  इतके मतदान झाल्याने सभासद कोणाला कौल देणार याविषयी उत्कंठा वाढली होती. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच दादा लाड यांच्या सत्ताधारी गटाने आघाडी घेतली. प्रत्येक फेरीनुसार ही आघाडी वाढत गेली आणि दादा लाड यांनी कोजिमाशिवर आपलेच वर्चस्व असल्याचे सिद्ध करून दाखवले.

सर्वसाधारण प्रतिनिधी
विजयी उमेदवारांचे नावे व मिळालेली मते 
 श्रीकांत कदम ( ४५४१ ),श्रीकांत पाटील  ( ४६३२),प्रकाश कोकाटे (४५०४),
 उत्तम पाटील  ( ४५९६),सुभाष खामकर  (४६३४),दीपक पाटील (४७२७),दत्तात्रय घुगरे ( ४५९७),मनोहर पाटील  (४३६३) 
अविनाश चौगले (४५६०),राजेंद्र पाटील  ( ४४९३),लक्ष्मण डेळेकर  (४५०५),राजेंद्र रानमाळे ( ४५४९)
,शरद तावदारे ( ४३२२),सचिन शिंदे  (४२७०),मदन निकम ( ४४५५)
,पांडुरंग हळदकर (४०४७)
अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी
 अनिल चव्हाण ( ४६९१)
भटक्या जाती विमुक्त जमाती / विशेष मागासवर्ग प्रतिनिधी -जितेंद्र म्हैशाळे (४७८०),इतर मागास प्रतिनिधी -राजाराम शिंदे (४८३५),महिला राखीव प्रतिनिधी -
ऋतुजा पाटील (४६४१),शितल हिरेमठ (४६२४) आदी उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले.
    राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडी सर्वसाधारण गट उमेदवारांची नावे व मिळालेली मते:  प्रविण आंबोळे ( ३१७७), विनोद उत्तेकर ( ३०१२), सहदेव केंगाळे ( २७७३), प्रकाश शंकर कोकाटे ( २७१२), अभिजित गायकवाड ( २९५४), श्रीधर गोंधळी ( ३१३५), बाळासाहेब चिंदगे (२८१७), उत्तम तिबिले ( ३१२६), पंडित पोवार ( २८५०), बाबासाहेब यशवंत पाटील (३०४२), युवराज पाटील ( २७९३), संजय बटकडली ( २९२०), संतोष भोसले ( २७०८), विक्रमसिंह मोरे
 ( २९२९), अमर सदलगे ( २६७०), अर्जुन होनगेकर ( २५७३) इतर मागासप्रवर्ग- यशवंत बाबुराव पाटील ( ३२०२), भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग - शिवाजी कोरवी ( ३२५४), अनुसूचित जाती प्रवर्ग पांडूरंग राउसो कांबळे (३३५७ ), महिला प्रतिनिधी आक्काताई नलवडे (३२००), सीमा महेश सुर्यवंशी ( ३०४३)
      प्रतिक्रिया
   शिक्षक नेते दादासाहेब लाड
स्वाभिमानी सहकार आघाडीच्या सर्व २१ उमेदवार प्रचंड बहुमतांनी विजयी झाले. कोजिमाशि पतसंस्था शिक्षक - शिक्षेकेत्तर सभासदांच्या मालकीची आहे.
कोल्हापूर जिल्हयातील सर्व सामान्य सभासद ही एक शक्ती आहे आणि ती माझ्या सोबत आहे त्यामुळेच हा विजय सुकर झाला आहे. त्यांना राजकिय शक्तीचा प्रवेश मान्य नसल्यानेच माझ्या पाठीशी खंबर पणे राहून कोजिमाशिची चौथ्यांदा सत्ता हाती दिली आहे. निवडणूक संपली आहे.आता कोणी विरोधक नाही सर्वांना समान वागणूक देऊन सर्वांच्या हिताचे निर्णय घेऊन वचननाम्याची अमलबजावणी करून सभासदांची उन्नती साधली जाईल.
    कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी सहकार सत्ताधारी आघाडीस विद्यमान चेअरमन बाळ डेळेकर, खंडेराव जगदाळे, मुख्याध्यापक संघ सचिव दत्ता पाटील, डॉ. डी.एस. घुगरे, व्हा.चेअरमन सुभाष पाटील, संजय परीट, राजेंद्र रानमाळे, कैलास सुतार, आदींसह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शिक्षक, शिक्षेकेत्तर संघटना, आजी माजी संचालक, मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांचे मोठे पाठबळ लाभले.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :