हेरले प्रतिनिधी
जय हनुमान कबड्डी क्लब आणूर (ता. कागल ) येथे झालेल्या भव्य 60 किलो मॅटवरील कबड्डी स्पर्धेत 30 संघांनी सहभाग नोंदवला होता. त्या मध्ये आकर्षक चढाई आणि बचावाच्या जोरावर मात करत जय हनुमान व्यायाम मंडळ हेरले संघाने, फायनलमध्ये जयक्रांती हासुर संघासोबत, 20-5 अश्या गुण फरकाच्या आघाडीने, एकतर्फी पराभूत करून प्रथम क्रमांक पटकाविला. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक काकासाहेब सावडकर याच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष- कृष्णात खांबे आणि प्रशिक्षक- अभिजित सुर्यवंशी उपस्थित होते .
फोटो
हेरलेचा जय हनुमान व्यायाम मंडळ विजेता कबड्डी संघ खेळाडूसह मान्यवर