हेरले / प्रतिनिधी
रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं श्रेष्ठ असतं असं आपण अनेकदा ऐकतो. पण ते सार्थ ठरवणारी मैत्री पेठवडगाव शहरातील वडगाव विद्यालयाच्या सन १९९४ च्या इयत्ता दहावीच्या वर्ग मित्रांनी मनोभावे जपली असून नुकतेच अकाली निधन झालेल्या वर्गमित्र मौजे तासगांव (ता.हातकणंगले) येथील बाबासो सुतार या मित्राच्या कुंटुंबीयांना व्हाट्सअप ग्रूपच्या माध्यमातून आवाहन करून ९० हजाराची आर्थिक मदत करुन मित्रत्वाचे नाते जपण्याचे काम केले.
मौजे तासगांव येथील सुतार कुंटुंबातील बाबासो हा घरातील एकुलता कर्ता होता. त्याच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. परंतु मैत्रीचे नात संवेदनशील असतं, निस्वार्थ आणी त्यागाचं असे म्हणतात… पण अशीच मैत्री जपणारे पेठवडगाव येथील वडगाव विद्यालयाच्या सन १९९४ साली दहावी मध्ये एकाच वर्गात शिक्षण घेतलेल्या सर्व मित्रांनी व्हाट्सअप ग्रूपच्या माध्यमातून बाबासो सुतार यांच्या कुंटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आणि त्याला प्रतिसाद देत वर्ग मित्रांनी एकत्रित येत त्यांच्या कुटुंबास ९००००/- एवढी आर्थिक मदत करुन सामाजिक बांधिलकी जपली.
रविवार (दि १) रोजी बाबासो सुतार यांच्या मौजे वडगाव येथील निवासस्थानी वर्गमित्राने जावून त्यांच्या पत्नी गिताजंली सुतार यांच्या कडे ठेवपावती देण्यात आली. यावेळी आई सावित्री , वडिल रामदास,मुलगा नितिन, मुलगी सिध्दी,भाऊ दिपक तसेच चुलतभाऊ प्रदिप सुतार,कृष्णात पाटील, वर्गमित्र दै.पुण्यनगरीचे पत्रकार सचिन पाटील,म्हाडाचे अभियंता विक्रम निंबाळकर,प्रा.अमित बेलेकर,मोहन बेलेकर,जीवन नायकवडी,उत्तम पाटील,लाटवडे ग्रामपंचायत सदस्या स्वाती पाटील,निलम शहा आदी उपस्थित होते.
समाजोपयोगी कामे करुन सामाजिक बांधिलकी जोपासली : सचिन पाटील
सन १९९४ च्या दहावीच्या वर्गमित्रांनी महापुरात वडगाव परिसरातील पुरग्रस्त गांवात शुध्द पाणी,अन्नधान्यांची किट, जनावरांना चारा देणेत आला.याचबरोबर कोरोना काळात नगरपालिकेस पीपीई किट देण्यात आले.तसेच वडगाव विद्यालयाच्या शौचालय बांधकामाकरिता भरिव निधी देत अशी विविध समाजोपयोगी कामे करुन या ग्रुपने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे.
फोटो : मौजे तासगाव येथे कै.बाबासो सुतार या वर्गमित्राच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नी गीताजंली यांच्याकडे ठेवपावती देताना सचिन पाटील, विक्रम निंबाळकर,प्रा.अमित बेलेकर,मोहन बेलेकर,जीवन नायकवडी,उत्तम पाटील,स्वाती पाटील,निलम शहा आदी.(छाया तनिष्का पाटील,वडगाव)