हेरले / प्रतिनिधी
मौजे वडगाव (ता. हातकणगले ) येथील शिवसेना शाखा व ग्रामपंचायतींच्या वतीने हिँदूहुदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे याच्या ९७ व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस लोकनियुक्त सरपंच कस्तुरी पाटील व शाखाप्रमुख विद्यमान ग्रा. पं . सदस्य सुरेश कांबरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करूण अभिवादन करण्यात आले .
यावेळी बोलतांना सुरेश कांबरे म्हणाले की, हिंदूहुदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या रोखठोक भुमिका आणि भल्याभल्या राजकारण्यांना घाम फोडणारे एक बिनधास्त व्यक्तीमत्व होते . एक पक्ष एक मैदान आणि एक नेता आशी ख्याती असलेले महाराष्ट्रातील ते एकमेव नेते होते . ते भाषण करित असतांना कोणाचीही भीडभाड ठेवत नसत त्यामुळे त्यांच्या स्पष्ट आणि जहाल भुमिकेमुळे ते हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखले जाऊ लागले .
यावेळी सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच सुनिल खारेपाटणे, शाखाप्रमुख व विद्यमान ग्रा . पं .सदस्य सुरेश कांबरे, रघूनाथ गोरड , स्पप्नील चौगुले, माजी ग्रा.पं. सदस्य अवधूत मुसळे , आनंदा थोरवत , अमोल झांबरे , दगडू मोरे , ज्ञानेश्वर सावंत, सविता सावंत, सुनिता मोरे , सुवर्णा सुतार, दिपाली तराळ , यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
फोटो
हिंदूहुदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त अभिवादन करतांना सरपंच उपसरपंच ग्रा.पं. सदस्य व शिवसैनिक