शिरोली / प्रतिनिधी
येथील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामनिधी व १५ वा वित्त आयोग निधीतून खरेदी करणेत आलेल्या घंटागाडी वाहनांचा लोकार्पण सोहळा छत्रपती राजाराम साखर कारखाना चेअरमन अमल महाडिक यांच्या शुभहस्ते तसेच लोकनियुक्त सरपंच पदमजा कृष्णात करपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहामध्ये ५ वी ते ७ वी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. व शिरोली हायस्कूल मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास उपसरपंच अविनाश कोळी, ग्राम विकास अधिकारी ए वाय कदम, वडगाव बाजार समिती सभापती श्री सुरेश पाटील माजी सरपंच विठ्ठल पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष राजेश पाटील, माजी उपसरपंच कृष्णात करपे, सतीश पाटील, सलिम महात, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील, विजय जाधव, महंमद महात, अरिफ सर्जेखान, महादेव सुतार, कमल कौंदाडे, सुजाता पाटील, धनश्री खवरे, मनिषा संकपाळ, वसिफा पटेल, कोमल समुद्रे, नजिया देसाई, हर्षदा यादव, अनिता शिंदे, बबन संकपाळ, आदी उपस्थित होते.
फोटो
पुलाची शिरोलीत घंटागाडी लोकार्पण प्रसंगी माजी आमदार अमल महाडिक, सरपंच सौ. पद्मजा करपे, उपसरपंच अविनाश कोळी, सुरेश पाटील व इतर मान्यवर.