हेरले /प्रतिनिधी
गेल इंडिया लि. व मौजे वडगांव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गायराण गट नं. ५१२ मध्ये ५०० आंबा वृक्षांचे वृक्षारोपण गेल इंडिया कंपनीचे उप महाप्रबंधक टी. राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
निसर्गाची झपाट्याने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. तापमान रोखण्यासाठी वृक्ष लागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. अनेकदा वृक्ष लागवड केल्यानंतर काही दिवसातच हि वृक्ष नष्ट होत होती. व त्याची वाढ न झाल्याने वृक्ष लागवड करूणही फायदा होत नव्हता. म्हणून यावर्षी ५०० आंब्यांच्या वृक्षाची लागवड करण्यात आली असून प्रत्येक वर्षी पाचशे ते सहाशे झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी गेल इंडिया कंपनीचे उप महाप्रबंधक टी. राजकुमार , मुख्य प्रबंधक एम. के. जोशी,सरपंच कस्तूरी पाटील , उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रामसेविका बी. एस. ढेंगे , ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे, स्वप्नील चौगुले ,रघूनाथ गोरड, सदस्या सुनिता मोरे, वरिष्ठ अभियंता आर. जे. येलपले , एम. आर. भगत, टी. के. मोहंती , अविनाश पाटील, ज्ञानेश्वर सावंत, आदीजण उपस्थित होते.
फोटो
मौजे वडगांव येथे वृक्षारोपण करतांना गेल इंडिया कंपनीचे उप महाप्रबंधक टी. राजकुमार , सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच सुनिल खारेपाटणे , एम .के. जोशी, सुरेश कांबरे, आदी मान्यवर.