हेरले /प्रतिनिधी
ग्रामपंचायत मौजे वडगांव व लायन्स आय क्लब इंचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यवर्धिनी प्राथमिक उपकेंद्र मौजे वडगांव येथे मोफत नेत्र रुग्ण तपसणीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच कस्तुरी पाटील यांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या नेत्र शिबिरामध्ये गावातील एकूण १०३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मोतिबिंदू चाचणी मध्ये दोषी आढळलेल्या रुग्णांची संख्या १८ तर नजर कमकुवत आसणाऱ्या रुग्णांची संख्या ९ तसेच ६ विध्यार्थाचाही यामध्ये समावेश आहे. सदर नेत्र तपासणी मध्ये आढळलेल्या ५७ रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सरपंच कस्तुरी पाटील, उपसरंपच सुनिल खारेपाटणे , ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे , स्वप्नील चौगुले , रघूनाथ गोरड ,माजी सदस्य अविनाश पाटील, , समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पंकज पाटील, लायन्स आय क्लब इंचलकरंजीचे डॉ. स्वप्नील आवळे, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सुपरवायझर , आशा वर्कर यांचे विशेष सहकार्य लाभले.
फोटो
प्राथमिक उपकेंद्र मौजे वडगांव येथे मोफत नेत्र रुग्ण
शिबीरामध्ये डॉ. पंकज पाटील मार्गदर्शन करतांना.