हेरले (प्रतिनिधी ) मौजे वडगांव गाव माझ्या कुटूंबा सारखे असून मला मिळणाऱ्या विकास कामाच्या प्रत्येक निधीतील मौजे वडगावला भरिव निधी देत आलो आहे. व इथून पुढेही विकासकामाच्या निधीचा मौजे वडगावसाठी हिस्सा ठरलेलाच असतो . असे प्रतिपादन माजी आम. अमल महाडिक यांनी केले ते मौजे वडगांव (ता हातकणंगले) येथे विविध विकासकामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते . तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुकत सरपंच कस्तुरी पाटील होत्या .
मौजे वडगांव येथे माजी आम. अमल महाडिक व जि प . च्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या फंडातून प्राथमिक शाळा दोन नविन खोल्या बांधणे, दलित वस्तीसह विविध भागात RCC रस्ते ५० लाख , तसेच गटर्स , उपकेंद्र दुरुस्ती, प्राथमिक शाळा वर्गखोल्या दुरुस्तीसह ३३ लाख, आशा एकूण ८३ लाख रुपये रकमेच्या निधीतून झालेल्या कामाचे लोकार्पण व शुभारंभ करण्यात आला .
यावेळी उपसरपंच सुनिल खारेपाटणे, ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे, रघूनाथ गोरड, स्वप्नील चौगुले, तंटामुक्त अध्यक्ष मधुकर आकिवाटे ,नितिन घोरपडे, सविता सावंत, सुवर्णा सुतार , सुनिता मोरे , दिपाली तराळ , श्रीकांत सावंत, सतिश चौगुले, बाळासो थोरवत, धोडिराम चौगुले, सतिश वाकरेकर , विजय चौगुले, आनंदा पोवार,अमोल झांबरे , जयवंत चौगुले, प्रकाश कांबरे , आनंदा थोरवत , शप्पीक हजारी, आजमुदीन हजारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संखयेने उपस्थित होते .
फोटो
मौजे वडगांव येथे RCC रस्त्याचे उद्घाटन करतांना माजी आम . अमल महाडिक व मान्यवर