Sunday 3 December 2023

mh9 NEWS

बौद्धिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांचे क्रीडानैपुण्य व शारीरिक विकास देखील तितकाच महत्वाचा" - मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष पाटील

कोल्हापूर / प्रतिनिधी
 शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, कोल्हापूर व माण देशी फौन्डेशन, म्हसवड,ता. माण जि.सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आदर्श शाळेतील शिक्षकाना निवासी क्रीडा प्रशिक्षण दि. २८ नोव्हेंबर ते दि. २ डिसेंबर अखेर कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मठ ता. करवीर येथे पाच दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानी  जिल्हा परिषद कोल्हापूरचे  मुख्य कार्यकारी अधिकारी
संतोष पाटील होते.
   मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी मनोगतातून सरकारी शाळांतील शिक्षकांचे योगदान व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचे  कौतुक करून पुढे म्हणाले आपणही जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतल्याचा अभिमान आहे. केवळ बौद्धिक विकासावर लक्ष केंद्रित न करता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन हेच विद्यार्थी राष्ट्र उभारणीसाठी सक्षम बनविण्याचे महान कार्य शिक्षकांनी करायचे आहे, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत "माझी शाळा आदर्श शाळा" अंतर्गत, क्रीडा शिक्षकांना पायाभूत प्रशिक्षण माण देशी फौन्डेशन, म्हसवड, ता. माण जि.सातारा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे.यापुढे देखील सरकारी शाळांच्या गुणात्मक व भौतिक विकासासाठी आम्ही प्रशासन सदैव आपल्या पाठीशी राहू असे आश्वासन दिले. शिक्षकांनी आपल्या कौशल्यांच्या जोरावर राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवणारे आदर्श खेळाडू तयार करावेत, त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायीत्व जपणारा आदर्श माणूस घडवावा असे आवाहन केले. 
   प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिला शिक्षकांचा प्रशिक्षणातील उत्साही सहभाग व महिलांच्या मनोगतातून व्यक्त केलेल्या मागणीनुसार, पुढील प्रशिक्षणासाठी यापेक्षा अधिक संख्येने महिलांना सहभागी करून घ्यावे, ज्यामुळे शाळेतील मुलींना देखील योग्य मार्गदर्शन व प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली."सदर प्रशिक्षणा अंतर्गत शिक्षकाना कबड्डी, खोखो, पोषणमूल्य युक्त आहार, ऍथलेटिक्स ट्रॅक आणि फील्ड, पोक्सो कायदा, सामाजिक जाणीव व खेळातून विकास, NIS कोच मार्फत विविध खेळांचे नियम, हातखंडे व प्रात्यक्षिक घेण्यात आले.
  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारीआर.व्ही. कांबळे यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी "माझी शाळा आदर्श शाळा" उपक्रमाचा उद्देश व प्रत्यक्ष कार्यवाही याबाबतीत शिक्षणाधिकारी
 मीना शेंडकर यांच्या देखरेखीखाली चाललेल्या कार्याचा आढावा सादर केला. प्रशिक्षण काळातील आपले अनुभव  निवास चौगले, भारती सुतार, पूजा तुपारे यांनी आपले मनोगत व अनुभव व्यक्त केले. महिलांची संख्या कमी असल्याने आम्हाला खेळात सहभागी होता आले नाही याची खंत बोलून दाखविली, आमची संख्या आणखी असती तर आम्ही पुरुषांना खेळात आव्हान निर्माण केले असते असे विचार महिलांनी मांडले. प्रशिक्षण काळात माण देशी फौन्डेशन, यांचे वतीने विविध क्रीडा प्रकारात विशेष नैपुण्य दाखवणाऱ्या  ८ शिक्षक खेळाडूंपुढील प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. प्रशिक्षण यशस्वी पूर्ण करण्यासाठी काम करणारे  ओंकार गोंजारी संचालक, सर्व व्यवस्थापक
माण देशी फौन्डेशन, सुरेश कांबळे, केंद्रप्रमुख व व्यवस्थापक,  के. वाय. कुभार, चिदंबर चित्रगार, बाजीराव कांबळे, शिंदे सर व व्यवस्थापक टीम, परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वरस्वामी कणेरी मठ व काडसिद्धेश्वर हायस्कूल क्रीडा शिक्षक व व्यवस्थापक, या सर्व शिक्षकांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
    या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, मुख्यकार्यकारी अधिकारी यशोवर्धन बारामतीकर, परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वरस्वामी कणेरी मठ, प्रल्हाद जाधव, प्रमुख विद्या चेतना कणेरी मठ,  प्रशासनाधिकारी शिक्षण कोल्हापूर महानगरपालिका,
एस. के. यादव सोबत मठातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.सूत्र संचालन कृष्णा पाटील यांनी केले. 
     फोटो 
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी   जिल्हा परिषद कोल्हापूरचे  मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष पाटील बोलतांना शेजारी अन्य अधिकारी

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :