हेरले / प्रतिनिधी
कोल्हापूर बोर्डाच्या विभागीय सचिव पदी सुभाष चौगुले यांची नियुक्ती झाली असून ते सोमवार दिनांक १८ डिसेंबर रोजी पद भार स्वीकारणार आहेत.
सुभाष चौगुले हे कोल्हापूर जिल्ह्यातील मळगे खुर्द चे असून त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या मळगे खुर्द येथील प्राथमिक शाळेत झाले.माध्यमिक शिक्षण मळगे विद्यालय मळगे बु. येथे झाले. देवचंद कॉलेज ,अर्जुन नगर बी एस सी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.शिवाजी विद्यापीठ येथे एम एस सी व आदर्श कॉलेज ऑफ एज्युकेशन पुणे येथे बी एड चे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ,नाशिक मधून एम एड ही पूर्ण केले.
सन 2013 मध्ये एम पी एस सी मार्फत शिक्षणाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली.
तत्पूर्वी मेन राजाराम ,ज्युनियर कॉलेज कोल्हापूर येथे १४ वर्षे प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली.जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे शिक्षणाधिकारी(निरंतर) म्हणून दोन वर्षे व कोल्हापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून ३ वर्षे काम पाहिले .
२०१८ मे पासून कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालयात सहाय्यक शिक्षण संचालक म्हणून कार्यरत होते.
त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाचा अवकाही मोठा आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या १८५० शाळेमध्ये त्यांनी ई लर्निग सेवा उपलब्ध करून दिल्या . कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा सिध्दी उपक्रमात 'अ' श्रेणीतील शाळांची सरासरी संख्या राज्यात अव्वल आणली.स्वच्छ शाळा पुरस्कार योजनेत १०० टक्के सहभाग नोंदविणारा कोल्हापूर जिल्हा देशात अव्वल.(२०१७/१८).
इयत्ता ५वी व ८वी शिष्यवृत्तीत कोल्हापूर जिल्हा अव्वल.
शाला बाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष परिश्रम,जिल्ह्यातील ४८ विद्यार्थ्यांची इस्रोला (थुंबा) विमानाने भेट.
अशा विविध शैक्षणिक कामात त्यांनी उत्तम ठसा उमटवला आहे.
एस एस सी,एच एस सी विभागीय बोर्डाचे सचिव म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती झाली असून शिक्षण व सामाजिक संस्था व व्यक्ती कडून त्यांचे अभिनंदन होत आहे.