हेरले / प्रतिनिधी
माननीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या सोबतचा संवादात्मक परीक्षा पे चर्चा या अनोख्या कार्यक्रमाची सातवी आवृत्ती तालकटोरा स्टेडियम ,नवी दिल्ली येथे फेब्रुवारी /मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी व निवड करण्यासाठी 12 डिसेंबर 2023 पासून https://innovateindia.mygov.in/ppc-2024/ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लिंक वर ऑनलाईन पद्धतीने बहुपर्यायी प्रश्नांच्या द्वारे इयत्ता सहावी ते बारावी मध्ये शिकणारे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याकरिता स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने 12 डिसेंबर 2023 ते 12 जानेवारी 2024 पर्यंत खुली राहणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना मा.संचालक, एन सी आर टी यांचे मार्फत सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सर्व माध्यमाच्या इयत्ता सहावी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी ,पालक व शिक्षक यांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की ," *परीक्षा पे* *चर्चा*" या उपक्रमामध्ये सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा व मुख्याध्यापकांनी या उपक्रमास आपल्या शाळेच्या संकेतस्थळावरून तसेच पालकांच्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी. असे आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.