Tuesday, 23 October 2018

कोगनोळीत मराठा मंडळ कडून पत्रकार अनिल पाटील यांचा सत्‍कार

कोगनोळी ः येथे पत्रकार अनिल पाटील यांचा सत्‍कार प्रसंगी उपस्थित शामराव माने, उमेश पाटील, के. डी. पाटील व अन्‍य 

-----------------------------


कोगनोळी, ता. 23 ः कोगनोळी येथील दैनिक सकाळचे व महानकार्य न्‍युजचे बातमीदार अनिल जिनगोंडा पाटील यांची नॅशनल युनियन ऑफ जर्नेलिस्‍ट महाराष्‍ट्र निपाणी तालूका उपाध्‍यक्ष पदी निवड झाल्‍याबद्दल व बेडकिहाळ येथील बसवंत नागू शिंगाडे यांच्‍यावतिने देण्‍यात येणारा आदर्श पत्रकार पुरस्‍कार मिळाल्‍याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज मंडळ ट्रस्‍टच्‍यावतिने अध्‍यक्ष शामराव माने यांच्‍या हस्‍ते शाल, श्रीफळ, पुष्‍पहार देवून सत्‍कार करण्‍यात आला. अध्‍यक्षस्‍थानी गौरावती खराडे(निपाणी) ह्या होत्‍या. 

स्‍वागत करून प्रास्‍ताविकात के. डी. पाटील यांनी अनिल पाटील यांच्‍या कार्याचा अढावा घेवून पत्रकार क्षेत्रात त्‍यांनी दिलेल्या योगदानाची माहीती दिली.

यावेळी मराठा मंडळचे उपाध्‍यक्ष उमेश पाटील, नरसिंह पाटील, महादेव पाटील, रावसो पाटील, प्रकाश कदम, विजय पाटील, ग्राम पंचायत सदस्‍य सचिन खोत, रामचंद्र डोंगळे, श्रीरंग पंढरे, अनिल भोसले, सुनिल चौगुले, दशरथ माळी आदीसह अन्‍य मान्‍यवर व ग्रामस्‍थ व महिला मोठया संख्‍येने उपस्थित होते.

-----------------------------------------------------------

Monday, 22 October 2018

तालूका पंचायत सदस्‍य प्रितम पाटील यांची हणबरवाडी शाळेला सदिच्‍छा भेट


हणबरवाडी ः येथील मराठी शाळेला सदिच्‍छा भेटी प्रसंगी प्रितम पाटील, सचिन खोत, मारूती कोळेकर व अन्‍य

-----------------------------


कोगनोळी, ता. 22 ः कोगनोळी तालूका पंचायत सदस्‍य प्रितम पाटील यांनी हणबरवाडी मराठी मुलां-मुलींच्‍या शाळेला सदिच्‍छा भेट दिली. यावेळी अध्‍यक्षस्‍थानी एसडीएमसी अध्‍यक्ष सागर पाटील होते.

स्‍वागत करून प्रास्‍ताविकात मुख्‍याध्‍यापक डी. एस. नाईक यांनी शाळेत राबविण्‍यात येत आसलेल्या विविध योजनाची माहिती दिली.

यावेळी प्रितम पाटील यांनी बोलकी शाळा, शाळेचा परिसर, बागेची पहाणी करून समाधान व्‍यक्‍त केले. शाळेचे काम चांगले असून सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्‍यांसाठी नव-नवीन योजना राबवून शाळेचा आदर्श निर्माण केला आहे.

यावेळी ग्राम पंचायत सदस्‍य सचिन खोत, प्राथमिक कृषी पत्तीनचे चेअरमन मारूती कोळेकर, प्रकाश काशिद,  दादू खोत, सरदार पोवाडे, अमर खोत, विजय खोत, अमर विटे, प्रशांत पोवाडे आदीसह अन्‍य मान्‍यवर व ग्रामस्‍थ उपस्थित होते.

--------------------------------------------------------

Sunday, 21 October 2018

जनसेवा तरूण मंडळाकडून स्‍मशान भुमीची स्‍वच्‍छता


कोगनोळी ः येथे स्‍मशान शेडची स्‍वच्‍छता करताना जनसेवा मंडळाचे पदाधिकारी

------------------------


कोगनोळी, अनिल पाटील ता. 21 ः

 येथील बिरदेव माळाजवळ आसलेल्या स्‍मशान भुमीची जनसेवा तरूण मंडळ प्रभाग क्रमांक 3 च्‍या कार्यक्रर्त्‍यांनी स्‍वच्‍छता करून घेतली. त्‍यांच्‍या या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी बोलताना अजित वठारे म्‍हणाले, गेल्‍या अनेक दिवसापासून येथे मोठया प्रमाणात धाणीचे साम्राज्‍य पसरले होते. लोक अनेक प्रकारे येथे घाण करत होते. त्‍यामुळे अंतविधी करण्‍यासाठी आलेल्‍या लोकांना त्रास सहन करावा लगात होता. त्‍यासाठी मंडळाचे कार्यक्रर्त्ये यांच्‍याकडून स्‍वच्‍छता करून घेतला आहे. या आधी मंडळाकडून बसण्‍यासाठी बैठक व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. मंडळाकडून वृक्षारोपन करण्‍यात येणार आसल्‍याचे सांगीतले. या कामी तालूका पंचायत सदस्‍य प्रितम पाटील, माजी जिल्‍हा पंचायत उपाध्‍यक्ष पंकज पाटील यांचे सहकार्य मिळाले आहे.

यावेळी ग्राम पंचायत सदस्‍य कृष्‍णात भोजे, संजय डूम, राजू  चौगुले, पोपट पसारे, बद्रीनाथ निकम, कुशालसिंह रजपूत, राजू किल्‍लेदार, सदाशिव टोपाजी, सुनिल बरगे, अनिल बरगे, मुकेश धगुरे, दिपक धुगरे, प्रशांत पसारे, रमेश निकम, अजित चौगुले यांच्‍यासह अन्‍य मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

-------------------------------------------------------

हणबरवाडीत अंगणवाडी पायाखुदाई शुभारंभ


हणबरवाडी ः येथे अंगणवाडी पायाखुदाई प्रसंगी तालूका पंचायत सदस्‍य प्रितम पाटील, सचिन खोत, मारूती कोळेकर व अन्‍य

--------------------------------


कोगनोळी  ( अनिल पाटील) ता. 21 ः हणबरवाडी (ता. निपाणी) येथे ग्राम पंचायत अतर्गत एनआरजी 10 लाख रुपये खर्च करून बांधण्‍यात येत आसलेल्‍या अंगणवाडीचा पायाखुदाई शुभारंभ तालूका पंचायत सदस्य प्रि‍तम पाटील यांच्‍या हस्‍ते कुदळ मारून करण्‍यात आला. यावेळी अध्‍यक्षस्‍थानी ग्राम पंचायत सदस्‍य सचिन खोत हे होते. 

स्‍वागत व प्रास्‍ताविक ग्राम पंचायत सदस्‍य मारूती कोळेकर यांनी केले.

यावेळी बोलताना सचिन खोत म्‍हणाले गेल्‍या अनेक दिवसापासून हणबरवाडी येथे अंगणवाडीची गरज होती ती लक्षात घेवून माजी मंत्री वीरकुमार पाटील, जिल्‍हा पंचायत उपाध्‍यक्ष पंकज पाटील, प्रितम पाटील यांनी लक्ष देवून ग्राम पंचायत अतर्गंत एनआरजी मधून 10 लाखाचा निधी मंजूर केला आहे. हे काम लवकरच होणार आसल्‍याने नागरिकांतून समाधाण व्‍यक्‍त होत आहे.  या अंगणवाडीमुळे मुलांची सोय होणार आहे.

यावेळी एसडीएमसी अध्‍यक्ष सागर खोत, मुख्‍याध्‍यापक डी. एस. नाईक, दादू खोत, सरदार पोवाडे, कृष्‍णात खोत, अमर खोत, विजय खोत, प्रशांत पोवाडे, संजय डूम, प्रकाश काशीद, अजित चौगुले यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर व ग्रामस्‍थ उपस्थित होते.

-----------------------------------------------------------

Saturday, 20 October 2018

विद्यार्थांसाठी अविरत धडपडणारा कृतिशील मुख्याध्यापक


शिरोली/ प्रतिनिधी  

अवधूत मुसळे

   मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तानाजी कुंभार यांनी विद्यार्थ्यासाठी बालचित्रपट, अभ्यासिका, ग्रंथालय आदी नवोपक्रम सुरू करून जिल्हयात आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांसाठी अविरत धडपडणारा एक कृतिशील मुख्याध्यापक अशी त्यांची ओळख आहे. 

       मुख्याध्यापक कुंभार म्हणाले की , माझ्या ३५ वर्षाच्या नोकरीच्या कालावधीत अनेक विद्यार्थी वकील , डॉकटर , इंजिनिअर, तसेच अधिकारी बनले असून या गावातीलही काही विद्यार्थी चांगले अधिकारी घडावेत यासाठी कल्पनेतून मी शाळेसाठी डॉ . बाबासाहेब आंबेडकर या नावाने अभ्यासिका व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने बाल वाचनालयाची सुरुवात करत आहे तसेच वाचनालयासाठी सध्या १००० पुस्तके उपलब्ध केली असून शाळेमध्ये अभ्यासक्रमातील काही गोष्टी , धडे , यावर आधारीत प्रोजेक्टरद्वारे दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बाल फिल्म म्हणून दाखविले जातात.  वाचनालय व अभ्यासिका असे वेगळे उपक्रम शाळेसाठी राबविणारी जिल्हातील पहिलीच प्राथमिक शाळा आहे.

        यावेळी सुत्य उपक्रम पित्यार्थ आनंदाने शाळेतील सर्व विदयार्थांना लाडुचे वाटप करण्यात आले . ग्रा पं . सदस्य अवधूत मुसळे , अविनाश पाटील , माजी उपसरपंच सुरेश कांबरे , व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी आकवाटे , प्रकाश कांबरे यांनी आपली मनोगते व्यक्त करून मुख्याध्यापकानां नवोपक्रमा बददल शुभेच्छा दिल्या . 

        याप्रसंगी निवास शेंडगे , रघूनाथ कुंभार , पाडळकर , नदाफ मॅडम , पाटील  , आककाताई कांबरे , राबिया नगारजी . यांच्यासह शिक्षक पालकवर्ग विद्यार्थी हजर होते . स्वागत व प्रास्ताविक योगेश पाकले यांनी केले तर आभार देवदत्त कुंभार यांनी मानले '

       फोटो 

   मुख्याध्यापक तानाजी कुंभार यांचा सत्कार करनांना अवधूत मुसळे , निवास शेंडगे , सुरेश कांबरे ' व इतर मान्यवर

देव, देश अन् धर्मासाठी दुर्गामाता दौड



   शिरोली/ प्रतिनिधी 

    अवधूत मुसळे

 देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी शारदिय नवरात्र उत्सवानिमित्त शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान व शिवसेनेच्या वतीने नऊ दिवस दुर्गामाता दौडचे मौजे वडगावमध्ये आयोजन करण्यात आले.या दौडमध्ये गावातील युवा तरूणांसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

          सकाळी साडेपाच वाजल्यापासून कार्यकर्ते महादेव मंदिर येथे जमा होतात . त्या ठिकाणी प्रेरणा मंत्र घेऊन दौडला सुरुवात होते . तसेच या दौडमध्ये देशभक्तीपर गीत , छ . शिवाजीराजे , धर्मवीर संभाजीराजे यांच्यावर अधारीत गितांसह , जय भवानी ' जय शिवाजी ' दुर्गामाता की जय ' आंबा माता की जय ' अशा विविध घोषणां देऊन छ . शिवाजी महाराजांचा व शूर मराठयांचा जाज्वल्य इतिहास डोळ्यासमोर उभा करण्याचे काम या दौडच्या माध्यमातून केले जाते . ज्या -ज्या भागात हि दुर्गामाता दौड जाते त्या भागातील महिला व माता भागिनी रांगोळी काढून या दौडचे स्वागत करतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात युवावर्ग सहभागी झाले होते. दौडचे विसर्जन मारूती मंदिर झेंडा चौक  होते.

        विजय शेंडगे , सुरेश कांबरे , अवधूत मुसळे ,महादेव चौगुले , महादेव शिंदे , स्वप्निल चौगुले , अविनाश पाटील , नेताजी कांबरे निवास शेंडगे , गणेश मोरे , तेजस लोहार , सनी चौगुले , श्रवण चौगुले , यांच्यासह शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून दौडचे नियोजन केले जाते.

  फोटो 

   मौजे वडगाव येथे दुर्गामाता दौड साठी जमलेले कार्यकर्ते

हसत खेळत राहिल्‍यास सुख समाधान मिळते प्रा.पवनकुमार पाटील ः कोगनोळी नवरात्र व्‍याख्‍यानमाला



कोगनोळी ः येथील व्‍याख्‍यान मालेत बोलताना प्रा. पवनकुमार पाटील 

-----------------------------------------------------------


कोगनोळी, ता. 20 ः घ्‍रातील प्रत्‍येक व्‍यक्‍ती हसत खेळत राहिल्‍याने सुख व समाधान मिळते. घरांत मुलांच्‍यावर कोणते संस्‍कार होणे गरजेचे आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. भोजन व भजन एकत्र होते तेथे संस्‍कृती नांदते. लोक आपल्‍या दुखने नाही तर दुसर्याचे सुख बधून दुखी आहेत.

असे विचार प्रा. पवनकुमार पाटील(भोगावती महाविद्यालय, कुरूकली) यांनी केले. कोगनोळी ता. निपाणी येथील समस्‍त मराठा समाज यांच्‍यावतिने शारदिय नवरात्र उत्‍सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ येथे सुरू आसलेल्या व्‍याख्‍यान मालेत शेवटचे पुष्‍प गुंतताना बोलत होते.

अध्‍यक्षस्‍थानी मंडळचे अध्‍यक्ष शामराव माने हे होते.

सुरूवातीला स्‍वागत व प्रास्‍ताविक मंडळाचे सचिव के. डी. पाटील(सर) यांनी केले. दिपप्रज्वलन व शिवाजी महाराजाच्‍या प्रतिमेचे पुजन माजी मंत्री व कर्नाटक प्रदेश कॉग्रेसचे उपाध्‍यक्ष वीरकुमार पाटील व माजी आमदार काकासो पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

पुढे बोलताना प्रा. पाटील म्‍हणाले, आता लोकांच्‍यातील संवाद कमी होत चालले आहेत. बघेल तेव्‍हा लोक मोबईल मध्‍ये गुंतला आहे. बोलणे बंद झाल्याने विचाराची देवान घेवान बंद झाले आहे. असे शेवटी प्रा. पाटील म्‍हणाले.

यावेळी मराठा मंडळचे उपाध्‍यक्ष उमेश पाटील, नरसिंह पाटील, विजय पाटील, महादेव पाटील, बाळासाहेब पाटील, केशव पाटील, रामचंद्र कागले, दगडू नाईक, संजय डूम, शिवाजी पाटील, प्रकाश गायकवाड, सचिन खोत, रामचंद्र डोंगळे, रावसाहेब पाटील, रावसाहेब चौगुले यांच्‍यासह विविध सेवा संस्‍थेचे पदाधिकारी व ग्राम पंचायत सदस्‍य, ग्रामस्‍थ व महिला मोठया संख्‍येने उपस्थित होते.

सुत्रसंचालन करून आभार प्रकाश कदम यांनी मानले.

----------------------------

बालचमूंची किल्ला बनवण्यासाठी लगबग सुरू


कोगनोळी : येेथील लोखंडे गल्लीतील बालचमू किल्ला करताना मग्न

(छायाचित्र :अनिल अक्कोळे)  

------------------------------


कोगनोळी, अनिल पाटील ता. 20 :  

दसरा संपला आता दिवळी आता अवघ्या काही दिवसावर येवून ठेपल्याने दिवाळीच्‍या पार्श्‍वभुमिवर कोगनोळीसह परिसरातील बालचंमूची किल्ला करण्यासाठी मोठी लगबग सुरू झाली आहे. गल्लीच्या कोपऱ्यावर चौकात हे किल्‍ले करण्‍यात येत आहेत.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या विविध किल्‍ल्‍याच्‍या प्रतिकृती ब‍नविण्‍यात येत आहेत.

परिसरातील मत्तीवडे,सुळगांव, आप्पाचीवाडी,हदनाळ,हंचिनाळ भागात आशा प्रकारचे किल्ले बनविण्यात येत आहेत. किल्ल्यावर ठेवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, मावळे यांची खरेदी करण्यात येत आहे. किल्ले म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयासह मावळयांची फौज आलीच, आपला किल्ला इतरांच्या पेक्षा वेगळा व्हावा या हेतूने बालचमू विशेष परिश्रम घेत आहेत. किल्ल्याची प्रतिकृती तयार करताना मावळे,तोफ, किल्‍ल्‍याचे प्रवेश व्‍दार, शेतकरी महिलां-पुरूष, व्‍दारपाल, तोफ चालविणारा मावळा, लढणारे मावळे, विविध मंदिरे यावर भर दिला आहे.त्‍यामुळे दुकानात अशा प्रतिकृतींची मागणी मोठी आहे. यांची दखल घेत परिसयरातील दुकानात अशा प्रतिकृती ठेवण्‍यात आल्‍या आहेत.

चालू वर्षी बालचमूकडून विविध प्रकारची खेळणी, तोफ,छत्रपाती शिवाजी महाराज, मावळे आदीच्‍या प्रतिकृतीची मागणी  मोठी आहे. यामध्‍ये मातीचे व प्‍लॉस्‍टीकची दोन प्रकारच्‍या प्रतिकृती आहे. प्‍लॉस्‍टीक पेक्षा मातीची प्रतिकृती महाग आहे. तरी बालचमूकडून मातीच्‍या प्रतिकृतीची मागणी जास्‍त आहे.

Friday, 19 October 2018

बदाम भिजवूनच का खावेत ?


बदाम बी बुद्धी साठी उपयुक्त असून रात्री गायीच्या एक कप कोमट दुधात किंवा पाण्यात दोन बदाम भिजत घालावेत आणि सकाळी  अनशापोटी दुधासह त्यांचे सेवन करावे ... 

शारीरिक क्षमता आणि बुद्धी दोन्ही वाढायला मदत होते.

बदाम हे पौष्टीक गुणांनी भरलेलं आहे. बदाममध्ये विटामिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नीशियम, ओमेगा-3, फॅटी अॅसिड्स यासारखे अनेक पोषक तत्व असतात. बदाम हे दुधात किंवा पाण्यात भि़जवून खाल्ले पाहिजेत कारण यामुळे त्याच्यावरचं टरफल किंवा साल ही बदामावरुन सहज निघून जाते.बदामावरच्या सालीवर टॅनीन नावाचं एक तत्व असतो जो बदामातील इतर पोषक तत्वांचं अवशोषण करण्यास रोकतो. बदामावरचं साल तसंच राहिल्यास त्याच्या तुमच्या शरीराला अधिक फायदा होत नाही. त्यामुळे त्यावरचं साल निघून जाणं अधिक महत्त्वाचं असतं.

कोगनोळी जवळ ट्रक आणि ट्रॅक्टर ट्रॉली अपघातात सहा जखमी


कोगनोळी ः येथील फाटयावर अपघातात रस्‍त्यावर पडलेला ऊस व नुकसान ग्रस्‍त वाहने

------------------------------


कोगनोळी, अनिल पाटील ता. 19 ः

 येथील राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर कोगनोळी फाटयावर आयशर व ऊस वहातूक ट्रक्‍टर-ट्रॉली यांच्‍यात झालेल्या अपघात सहा जण जखमी झाल्‍याची घटना शुक्रवार ता. 19 रोजी सायंकाळी 6 च्‍या सुमारास घडली.

याबाबत अधिक महिती अशी की, ल्रिंगनूर ता. कागल येथून वंदूर येथे गुराळासाठी ऊस वहातूक करणार नवीन ट्रॅक्‍टर (क्रमांक नाही) ऊस घेवून जात होता. कोगनोळी फाटयावर रस्‍ता ओलाडून जात आसताना याच दरम्यान निपाणी हून कोल्‍हापूर कडे भरधाव निघालेल्या आयशर ट्रक (एमएच  10 झेड 1717) ची धडक बसली.  ऊस वहातूक करणार्या ट्रेलर पलटी झाली.  या ऊस ट्रेलरवर बसलेले मजूंर फुलाबाई पोवार(वय-35), लता पोवार(वय-45), दादासो पोवार(वय-30), राहूल पोवार(वय-26), ज्योती पोवार(वय-11), सुनिता पोवार(वय-23) सर्व रहानार पाथार्डी ता. कमळ, जिल्‍हा. उस्‍मानाबाद अशी जखमी झालेल्‍याची नांवे आहेत त्‍यांना कोल्‍हापूर येथील रूग्णालयात नेण्‍यात आले. घटनास्‍थळी निपाणी ग्रामीणचे उपनिरिक्षक बी. एस. तळवार, कोगनोळी चेक पोस्‍टचे एएसआय एम. आर. हंची यांनी भेट देवून पहाणी केली. 

अपघात ग्रस्‍त ट्रॉली रस्‍त्‍यावर पडली असल्‍याने काही काळ बंद होता. नंतर रात्री उशिरा रस्‍ता वहातुकीस खुला झाला.

------------------------------------------

कोगनोळीत सरगम संगीत सोंगी भजनाचा कार्यक्रम , युवराज कोळी यांची उपस्थिती - - ग्रामिण कला टिकविण्‍यासाठी कुर्लीकरांचे प्रयत्‍न


कोगनोळी ः येथे अंबिका देवीच्‍या नवरात्र उत्‍सवानिमित्त सरगम संगीत सोंगी भजनातील कला सादर करताना कलाकार

----------------------------------------


कोगनोळी, (अनिल पाटील) ता.  16 ः 

येथील ग्राम दैवत अंबिका देवीच्‍या नवरात्र उत्‍सवनिमित्त श्री. अंबिका भक्‍त मंडळ व व्‍यापारी यांच्‍यावतिने मंदिराजवळ सोमवार ता. 15 रोजी कुर्ली ता. निपाणी येथील सरगम संगीत सोंगी भजनाचा कार्यक्रम झाला.

अंबिका गॅसचे मालक युवराज कोळी यांच्‍या हस्‍ते उदघाटन झाले. संजय डूम, योगेश उर्फ बंडा चौगुले तुकाराम पाटील,बाबासो पाटील(जनाप) आदी उपस्थित होते. 

बाळासाहेब तोरनाळे, भिमराव चव्‍हाण, युवराज खोत, सुरेश माळी, भागवंत अंबी, मुकूंद यादव, संतोष पाटील, अलिल मेंथे, चंद्रकांत ठाणेकर, गजाजन माळी, संकेत सुतार, महादेव मगदूम, नवनाथ जैन्‍याळकर,तुकाराम डोंगरे यांनी गणेश दर्शन, भारूड,लोक गीते, भक्‍ती गीत, समाजप्रबोधन नाटक, किर्तन , आदीसह अन्‍य कला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी बोलताना बाळासाहेब हुपरे म्‍हणाले, आजच्‍या 21 व्‍या शतकात टीव्‍ही, सिनेमाच्‍या जमान्‍यात ग्रामिण लोककला लोप पावत चालल्‍या आहेत. कुर्ली (ता. निपाणी) सारख्‍या खेडे गांवातून युवकांना संघटीत करून सरगम संगीत सोंगी भजनाची स्‍थापना केली आहे. शासनाने लोककला प्रसार होण्‍यासाठी व टिकण्‍यासाठी  प्रयत्‍न केले पाहिजे. कार्यक्रम पार पाडण्‍यासाठी शामराव पाटील, विजय आलासे, राजू इंगवले, संभाजी जगदाळे, दत्ता परिट, जितू चिंचणे आदींनी परिश्रम घेतले.

------------------------------------------------

कोगनोळीजवळ अपघातात दोन ट्रकचे नुकसान


फोटो ः अनिल पाटील 

कोगनोळी ः येथील राष्‍ट्रीय महामार्गावर अपघातात नुकसान झालेले ट्रक

-----------------------


कोगनोळी, ता. 19 ः येथील राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर बिरदेव माळ फाटयाजवळ गुरूवार ता. 18 रोजी रात्री 9 सुमारास आयशर व ट्रक यांच्‍या अपघात झाला. यामध्‍ये दोन्‍ही गाडयाचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक महिती अशी की, एमएच 06 एक्‍यू 2976 हा ट्रक्‍टर वाहक ट्रक कोल्‍हापूर हून बेळगांवकडे जात होता. याच दरम्‍यान एमएच 11 सीएच 2637 हा आयशर कंपनीचा ट्रक मागून येत होता. येथील बिरदेव माळ फाटयाजवळ  पुढील ट्रकचालकांने अचानक ब्रेक लावल्‍याने पाठिमागून येत आसलेल्‍या आयशरची जोराची धडक बसली यामध्‍ये कोणतीही जिवित हानी झाली नसली तरी दोन्‍ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

---------------------------------------------------------------

Thursday, 18 October 2018

भारतीय संस्कृतीचे रक्षण करणे गरजेचे - प्रा. आशपाक मकानदारः कोगनोळी व्याख्यानमालेत प्रतिपादन


कोगनोळी ः येथील मराठा मंडळ सांस्‍कृतीक भवनात व्‍याख्‍यानमालेत बोलताना प्रा. आशपाक मकानदार

---------------------


कोगनोळी, ( अनिल पाटील) ता. 15 ः

 भारत हा देश देव देवता, पशुपक्षी, धरणी मातेची पुजा करणारा देश आहे. पण पश्‍यात संस्‍कृतीने युवकांचे विचार बदलले आहेत. संस्‍कृतीचे रक्षण करणे गरजेचे आहे. व्‍यापारी पध्‍दतीने सण आणले आहे. 6500 कंपन्‍या परदेशी आहेत. नवीन सण निर्मीती व्‍यापार दृष्‍टीकोण ठेवून आणले जात आहेत असे विचार प्रा. आशपाक मकानदार(गडहिंग्लज) यांनी केले. त्‍या कोगनोळी(ता.निपाणी) येथे छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ सांस्‍कृतीक भवनात आयोजित व्‍याख्‍यान मालेत पाचवे पुष्‍प गुतंताना अव्‍हाने नव्‍या पिढीसमोरील विषयावर व्‍याख्‍यान देताना सांगीतले.

अध्‍यक्षस्‍थानी मराठा मंडळचे अध्‍यक्ष शामराव माने हे होते.

स्‍वागत व प्रास्‍ताविक के. डी. पाटील(सर) यांनी केले. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दिपप्रज्‍वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेचे पुजन केले. 

प्रा. मकानदार पुढे म्‍हणाले, सध्‍या गणेश उत्‍सव साजरा केला जातो पण त्‍या मागील उद्देश धुळीस मिळाला आहे. सध्‍या मोबईलचे वेड अबालवृध्‍दाना लागले आहे. कोपर्या कोपर्याला एक टोळी दिसते ती मोबाईल मध्‍ये डोके घालून बसलेली आसते. समोर काय होतय यांचे भान देखीन नसते. सर्व गोष्‍टीमुळे मानसातली मानुसकी संपत चालली आहे असे शेवटी मकानदार यांनी सांगीतले.

यावेळी नरसिंह पाटील, प्रकाश गायकवाड, ग्राम पंचायत सदस्‍य सचिन खोत, बाळासाहेब पाटील, आर. डी. कागले, रामचंद्र कागले. विजय पाटील, केशव पाटील, तानाजी हळिज्‍वाळे, ग्राम पंचायत उपाध्‍यक्ष दगडू नाईक, प्रकाश कदम, दिनेश पाटील, अनिल पाटील, रामचंद्र डोंगळे, शांतीनाथ उपाध्‍ये यांच्‍यासह विविध सेवा संस्‍थेचे पदाधिकारी व ग्रामस्‍थ, महिला मोठया संख्‍येने उपस्थित होते.


नृसिंहवाडी – दत्तप्रभूंची राजधानी !

दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले आहे. १३७८ मध्ये कारंजा येथे नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला. १३८८ मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. त्यादरम्यान १४२१ साली त्यांचा मुक्काम औंदुबरी क्षेत्री होता, तर १४२२ मध्ये कृष्णा पंचगंगा संगमानजीकच्या गावात होता. नृसिंहसरस्वतींनी येथे तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली. या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर १४३४ मध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली व गाणगापुरी प्रस्थान ठेवले.

नृसिंहसरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय. कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेलं हे तीर्थस्थळ आज दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखलं जातं. नृसिंहसरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केलं आहे. साधना, उपासना भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी तीन त्रिकाळ दत्तभक्तीचा जागर सुरू असतो. नदीतीरामुळे परिसरास लाभलेली समृद्धता, वातावरणातील भरून राहिलेला भक्तिभाव, गुरुचरित्रात उल्लेख असणारे पैलतीरावरील अमरेश्वर, कृष्णेचं विस्तीर्ण पात्र अशा या दत्तभक्तीच्या रम्य तीर्थक्षेत्री दत्तभक्तांचा अष्टोप्रहर राबता असतो.

पहाटे तीनपासून ते रात्रौ दहा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो. काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा, पवमान पठन, धूपदीप आरती, दत्तगजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने आजही सांभाळला जात आहे. दत्तांची विविध कवने आणि पदांचा

उच्चरवात होणारा हा जागर आणि रोजचा पालखी सोहळा खास अनुभवण्यासारखा असतो. वर्षभरातील विविध उत्सव, नृसिंहजयंती, रामनवमी व इतर सनकादीक पुण्यतिथ्या व सण नियमित साजरे केले जातात.

नदीकिनारीच मंदिर असल्यामुळे महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते, तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने येतात. मंदिरात पाणी शिरले तरी पुराच्या पाण्यातून जात सारे नित्य सोपस्कार पार पाडले जातात. पादुकांपर्यंत पाणी आल्यावर मात्र उत्सव मूर्ती टप्प्याटप्प्याने हलवली जाते. अर्थात दरवर्षीच्या या नित्य कार्यक्रमाचं पालन येथे काटेकोरपणे होतं.

साधारण पंधरा-वीस वर्षांपूर्वी नृसिंहवाडीचा विस्तार तुलनेनं मर्यादित होता. गर्दीदेखील मर्यादित होती. विस्तारासाठी नैसर्गिक मर्यादा असल्या तरी आज खूप मोठय़ा प्रमाणात धर्मशाळा, भक्तनिवास, प्रसादालय, वेद उपासनेच्या सुविधा यामुळे क्षेत्र बाराही महिने गजबजलेले असते. नदीकिनारी बांधलेल्या विस्तीर्ण घाटामुळे मंदिर परिसर भव्य झाला आहे. २००५ च्या महापुरात जवळपास संपूर्ण गावालाच पाण्यानं वेढलं होतं.

वाडीतील दत्त मंदिराबाबत सांगितली जाणारी माहिती मात्र आश्चर्यकारक अशीच आहे. जरी हे हिंदूंचं स्थान असलं तरी विजापूरच्या आदिलशाहने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती. त्याला सकारात्मक फळ आल्यामुळे आदिलशहाने मंदिराचे बांधकाम करून दिले. त्यामुळे त्याला कळस नाही.

या क्षेत्री पोहोचण्यासाठी सांगली २२ कीलोमीटरवर आहे. तर नजीकचे रेल्वे स्टेशन मिरज हे १५ किलोमीटरवर आहे. तर कोकणातून, कर्नाटकातून येताना कोल्हापूरहून जयसिंगपूर अथवा इचलकरंजीमार्गे येता येते. नृसिंहवाडीच्या नजीकच दोन किलोमीटरवर असणारे कुरुंदवाड संस्थानकालीन ठाणं आहे. कृष्णा पंचगंगेच्या संगमानंतर कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या कृष्णेच्या तीरावरील संस्थानिकांनी बांधलेला घाट व विष्णू मंदिर पाहण्यासारखं आहे. तर आवर्जून पाहावं असं इतिहासकालीन कोपेश्वराचं मंदिर असणारं खिद्रापूर २५ किलोमीटरवर आहे.

कोगनोळीत जागर सोहळा उत्‍साहात हजारो भविकांची गर्दी ः अंबाबाई, बिरदेव पालखी मिरवणूक उत्साहात




कोगनोळी - येथील जागर सोहळयात हेडम खेळविताना भाविक

(छायाचित्र - अनिल पाटील, कोगनोळी)

-------------------------


कोगनोळी, ता. 17 ः येथील हजारो भविकांचे श्रध्‍दास्‍थान आसलेल्या अंबिका देवीचा जागर व नवरात्रोत्‍सव सोहळा उत्‍साहात संपन्‍न झाला. बुधवार (ता. 17) जागर सोहळयानिमित्त दर्शनासाठी भविकांनी गर्दी केली होती. 

सकाळी आठ वाजता देवीची आरती करून सजविलेल्या पालखीतून छत्रपती शिवाजी महाराज चौक, महादेव गल्‍ली, लोखंडे गल्‍ली, पी ऑन्‍ड पी सर्कल, मगदूम गल्‍ली, माळी गल्‍ली अशी भव्‍य सवाद्य मिरवणूक काढण्‍यात आली. सर्वत्र दुतर्फा रांगीळी व पुष्‍पवृष्‍टी करण्‍यात आली. 

अंबिका मंदिरासह गांवातील विविध मंदिरावर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्‍यात आली होती.माजी मंत्री वीरकुमार पाटील, तालूका पंचायत सदस्‍य प्रितम पाटील, माजी जिल्‍हा पंचायत उपाध्‍यक्ष पंकज पाटील,माजी मंडल पंचायत अध्‍यक्ष शरद पाटील(काका), योगेश पाटील, अतुल कुलकर्णी, सी. के. पाटील, के. डी. पाटील, अनिल चौगुले, आप्‍पासाहेब मगदूम, अशोक मगदूम आदीच्‍या उपस्थित आरती करण्‍यात आली.

या मिरवणूकीत बिरदेव पालखी व अश्‍वाचा समावेश होता.पालखी मिरवणूक गांवातील प्रमुख मार्गावरून मंदिराजवळ आल्‍यावर अश्‍व, पालखी मानकरी यांनी धावत जावून मंदिर प्रदक्षिणा घेतली. यावेळी वालंग व हेडम खेळविण्‍यात आले. रात्री 12 वाजता मान्‍यवरांच्‍या उपस्थित आरती झाल्‍यावर पालखी मंदिर प्रदक्षिणा घेतली. यावेळी फटाक्‍याची आताबाजी करण्‍यात आली. देवीला नैवेद्य दाखवून सा दिवसाचे उपवास सोडण्‍यात आले. 

या सात दिवसात अंबिका भक्‍त मंडळाच्‍यावतिने संगीत सोंगी भजन यासह अन्‍य कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते. मंदिरात सुरेश गुरव, बाळासो गुरव, नंदू गुरव, संजू गुरव, अशोक गुरव यांच्‍याकडून देवीची वेगवेगळया रूपात पुजा बांधण्‍यात आली होती.

देवीच्‍या जागर सोहळयास मुंबई, पुणे, कोल्‍हापूर, निपाणी, संकेश्‍वर, सांगली, सातारा, चिक्‍कोडी सह पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

शमी आणि आपट्याच्या पानांचे दसर्याला महत्त्व काय ? नक्की वाचा !



दसऱ्याचा सण. उत्सवाचा सण. आजच्या या सुवर्ण दिनी शमी आणि आपटा या दोन्हींना फार महत्त्वाचे स्थान आहे. सोन्याचे प्रतीक असणारी आपट्याची पाने, शमीच्या झाडाची पूजा याशिवाय विजया दशमी तथा दसरा साजरा होऊच शकत नाही.

या दिवशी शमी आणि आपट्याच्या पानांना खास महत्व असते. या पानांचा मूळ गुणधर्म काय? आणि त्या पानांचे आयुर्वेदिक गुण कोणते हे पाहूया….

शमी

एकवीस पत्रींमध्ये समावेश असणारी शमी गणपती, हरितालिका वगैरेच्या पूजांमध्ये वापरली जातेच, पण शमीचे झाड औषधीसुद्धा असते. शमीचे झाड मध्यम आकाराचे, छोटी छोटी पाने असणारे आणि काटेरी असते. याची पाने वर्षभर हिरवीगार असतात.


हाती घेतलेल्या कामात यश मिळावे यासाठी शमीच्या झाडाची पूजा केली जाते. काही प्रदेशात दिवाळीच्या दिवशी रात्रभर शमीची पाने भिजवून ठेवलेल्या पाण्याने स्नान करण्याचाही प्रघात दिसतो. आयुर्वेदात शमीच्या झाडाचे गुणधर्म याप्रमाणे सांगितलेले आहेत.

चव नसणे, मूळव्याध, जंत या पचनसंस्थेशी संबंधित विकारांवर शमी उपयोगी असते. तसेच ती रक्तशुद्धिकर असल्याने त्वचाविकारांवर उपयोगी पडते. शमीची पाने भिजत घातलेल्या पाण्याने स्नान करण्यामागे त्वचारोगांचा प्रतिबंध, त्वचारोगांवर उपचार हा हेतू असतो. शमी कफदोषशामक असल्याने खोकला, दमा या त्रासांवरही उपयुक्त असते.


आपटा. 

याला संस्कृतमध्ये अश्मंतक असे म्हणतात. समोरच्याबद्दल आपल्या हृदयातला आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठी दसऱ्याला खरे तर सोने वाटण्याची आपली परंपरा; पण खरे सोने देणे अवघड असल्याने त्याऐवजी आपट्याच्या झाडाचे हृदयाकृती पान देण्याची रूढी पडली असावी.

वनस्पतींची मुख्यत्वे साल, काही प्रमाणात पाने व फुले औषधात वापरली जातात. तोंड आल्यास सालीच्या काढ्याच्या गुळण्या केल्यास बरे वाटते. आपटा मूतखडा विरघळवून किंवा बारीक करून शरीराबाहेर निघून जाण्यास मदत करतो, मूतखडा वारंवार होण्याची प्रवृत्ती समूळ नष्ट करतो; तर कांचनार मुख्यत्वे रसधातूची शुद्धी करतो, रसग्रंथींमधील दोष दूर करून सूज उतरवण्यासाठी सहायक असतो. सुवर्ण भस्म करण्यापूर्वी सुवर्णाची शुद्धी करण्यासाठी कांचनाराच्या सालीचा काढा वापरला जातो.

🍃​आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार

आनंदाच्या क्षणी करा तुम्ही शुभेच्छांचा स्विकार ! 

विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा !


Wednesday, 17 October 2018

आर्ट आॅफ लिविंगचा हॅपिनेस प्रोग्रॅम माजगांव मध्ये उत्साहात संपन्न.


        माजगांव प्रतिनिधी:—दि.११/१०/२०१८.

     सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये समोर येणार्‍या ताणतणाव,अप्रसन्नता,नकारात्मक विचार,भिती,शारिरीक व मानसिक आजार इत्यादी पासून दुर राहण्यासाठी विश्वविख्यात आर्ट आॅफ लिविंग चा हॅपिनेस प्रोग्रॅम माजगाव मध्ये दि.०२/१०/२०१८ते दि.०७/१०/२०१८ या कालावधीमध्ये टिचर प्रविन भैयांसोबत विठ्ठल विकास सोसायटी हाॅल माजगांव ता.पन्हाळा जि.कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाला.

       यामध्ये योग, प्राणायाम,ध्यान,तणावमुक्त जीवण जगण्याची सुत्रे व जीवनामध्ये येणार्‍या समस्यांना सामोरे जाण्याची कला इत्यादी बाबत सखोल मर्गदर्शन करण्यात आले, 

        सुदर्शन क्रीया ही फक्त आर्ट आॅफ लिविंगमध्येच शिकवली जाते.ही श्वसनाची अत्यंत प्रभावी लयबध्द प्रक्रिया आहे,याव्दारे अनेक साधकांना ब्लड प्रेशर,अस्थमा,डायबेटीस,हार्ट अटॅक,पॅरलिसिस,अॅसिडीटी,मायग्रेन,पाठ व  सांधेदुखी यासारख्या असंख्य आजारातुन बरे होण्याची संधी उपलब्ध होते.

       या शिबीरासाठी दिपक विचारे.(डी.ओ.)एल.आय.सी.व संदीप कुंभार.प्राथमिक शिक्षक.(जिल्हा परिषद)यांनी परीश्रम घेतले.

Saturday, 13 October 2018

जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी.पाटील यांना शिवाजी विद्यापीठाची 'डी-लिट' पदवी मिळण्याबाबत कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे नाम.चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन


कोल्हापूर/ प्रतिनिधी


मिलींद बारवडे


    जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी.पाटील यांना शिवाजी विद्यापीठाची 'डी-लिट' पदवी मिळण्याबाबत कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे नाम.चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन देण्यात आले.

      जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी.पाटील यांनी गेली ६० वर्षे शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली आहे.कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ,श्री.प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस,शैक्षणिक व्यासपीठ,शिवाजी विद्यापीठ सिनेटर,स्काउट-गाईड व आर.एस.पी. संघटना आदी ठिकाणी पदाधिकारी म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे.त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून "शैक्षणिक व्यासपीठाच्या" वतीने राज्यपाल यांच्याकडे शिफारस होण्यासाठी हे शिष्टमंडळ पालकमंत्री यांना भेटले.

      या शिष्टमंडळात शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस.डी.लाड,डॉ.क्रांतिकुमार पाटील,प्राचार्य.सी.आर.गोडसे, जयंत आसगावकर,व्ही.जी.पोवार,प्रा.सी.एम.गायकवाड,प्रा.विनय पाटील,उदय पाटील,संदीप पाटील,एस.बी.पाटील यांचा समावेश होता.


      फोटो 

नाम. चंद्रकांतदादा पाटील यांना कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे निवेदन देतांना अध्यक्ष एस.डी. लाड व् अन्य पदाधिकारी.

कार्यानुभव कार्यशाळा उत्साहात साजरी.


      माजगांव प्रतिनिधी:—दि.१०/१०/२०१८.

        कुमार व कन्या विद्या मंदिर पोर्ले/ठाणे. ता.पन्हाळा.जि.कोल्हापूर येथे कार्यानुभव कार्यशाळा उत्साहात पार पडली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कन्या शाळेचे मुख्याध्यापक डी.एस.चौगले.होते.

   या कार्यशाळेमध्ये मुलांना टाकावू वस्तुपासून टिकावू वस्तु सुंदर कशा बनवाव्यात याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.यामध्ये फुले,जपानी बाहुली,कोंबडीचे पिलू,शांताक्लाॅज,पिशव्या,सूर्यफूल,द्राक्षांचा घड,फूलपाखरू,पर्स,लोकरीपासून झेंडुच्या फुलांचा हार,गुलाब फुले व झुंबर यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले व मुलांच्याकडून वस्तु बनवून घेन्यात आल्या व त्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले.

        या उपक्रमामध्ये बचत गट अध्यक्षा कविता लाड,कन्या शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष रामभाऊ चेचर,कुमार शाळा व्यस्थापण अध्यक्ष संभाजी खवरे,सदस्य सचिन घाटगे,कुमार शाळेचे मुख्याध्यापक सी.डी.सावंत,अध्यापक गणपती मांडवकर,काशिराम जाधव,हिंदुराव काशीद,मारुती गवळी,आसीफ पठाण,प्रकाश पोवार,शोभा आरगे,सुनिल खोत,विकास कांबळे,नामदेव पोवार,बाजीराव कदम,कृष्णात कोरे,सागर उबाळे व प्रज्ञा पाटील उपस्थित होत्या.

Friday, 12 October 2018

संपूर्ण आरोग्यवर्धिनी - प्रत्येकाकडे संग्रही असावे असे पुस्तक




संपूर्ण आरोग्यवर्धिनी वैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले हे व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून गेली ४८ वर्षं आरोग्य सेवेसाठी व्रतस्थपणे झटत आहेत. आयुर्वेदामधल्या संशोधनाबरोबरच ‘आयुर्वेद’ लोकप्रिय व्हावा, या दुहेरी उद्देशाने त्यांनी १९७४ साली ‘वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन’ संस्थेची स्थापना केली. तसेच त्यांनी ‘हरी परशुराम औषधालय’ आणि ‘आयुर्वेदिक औषध भांडार’ सुरू केलं असून २०० प्रकारच्या आयुर्वेदिक पद्धती आणि आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारी १५०हून अधिक ग्रंथसंपदा वैद्य खडीवाले यांच्या नावावर आहे. १९८२ साली ‘जनकल्याण रक्तपेढी’ आणि १९८८ साली ‘जनकल्याण नेत्रपेढी’ सुरू करून त्याद्वारे त्यांनी हजारो गरजूंना मदत केली. तसेच बीड जिल्ह्यामध्ये मोफत आयुर्वेद चिकित्सालयाद्वारे ५ वर्षं आरोग्यसेवा राबवली. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने त्यांची ‘राष्ट्रीय गुरू’ म्हणून निवड केली आहे. 
पुरस्कार : 
• २००९ साली मा.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या तर्फे दिल्ली येथे ‘शताब्दी महर्षी’ म्हणून गौरव. 
• २०१५ साली मा.श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्व आयुर्वेद महाविद्यालयातर्फे ‘आयुर्वेद भूषण’ पुरस्कार प्रदान. 
• २०१६ साली दिल्ली येथे मा.आयुष आरोग्य मंत्री श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते पहिला ‘राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार’ प्रदान.

सर्व सामान्य नागरिकांना संपूर्ण स्वास्थ्य लाभावे यासाठी संपूर्ण आरोग्यवर्धीनी हे पुस्तक प्रत्येकाकडे संग्रही असावे. साध्या सोप्या शब्दात आयुर्वेद आणि आरोग्य विषयक सल्ला यांचे पूर्ण विवेचन केले होते.

खालील लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण वाचा


संपूर्ण आरोग्यवर्धिनी 

शनि महात्म्य आणि त्याचा संदेश !


शनि महात्म्य आणि त्याचा संदेश –

त्याची दृष्टी पडे जयावर ! करी तयाचा चकनाचूर !

अथवा कृपा करी जयावर ! तयासी सर्व आनंदच प्राप्त होय !!

दृष्टीचा ऐका चमत्कार ! जन्मला जेंव्हा शनैश्वर !

तेंव्हा दृष्टी पडली पित्यावर ! तेणे कुष्ठ भरला सर्वांगी !!

पित्याच्या रथी होता सारथी ! तो पांगुळा झाला निश्चिती !

अश्वांचिया नेत्रांप्रती ! अंधत्व आले तत्क्षणी !!

असे शनीचे वर्णन केले आहे शनी महात्म्यामध्ये. हे वर्णन वाचल्यावर कुणालाही शनी व शनीच्या साडेसातीची भिती वाटणे साहजीकच आहे. साडेसाती म्हणजे त्रास, साडेसाती म्हणजे अधोगती, साडेसाती म्हणजे नुकसान, साडेसाती म्हणजे आता काहीतरी वाईटच, भयंकर असे घडणार अशी भीती बऱ्याच लोकांच्या मनात येते. पण वरील वर्णनातील “अथवा कृपा करी जयावर ! तयासी सर्व आनंदच प्राप्त होय !! ” या ओळींकडे मात्र कोणाचे लक्ष जात नाही असे दिसते. शनी जेंव्हा एखाद्याला शुभ असतो तेंव्हा तो भरभरून देतो, कशाचीही कमतरता भासू देत नाही. व्यक्तीला नशीबाची नेहमी साथ लाभते. ही शनीची दुसरी बाजू आहे.

साडेसातीत शनी महात्म्य ही पोथी वाचण्याची प्रथा आहे, त्यामुळे साडेसातीचा त्रास कमी होतो असे समजले जाते. शनी महात्म्य ह्या पोथी मध्ये एक पौराणिक कथा सांगण्यात आली आहे. त्याचे प्रमुख पात्र आहे राजा विक्रम. या कथेत शनी राजा विक्रमाला साडेसातीत अनेक प्रकारच्या यातना भोगावयास भाग पाडतो. त्या सर्व यातना भोगताना सुध्दा राजाने आपला संयम, सत्वगुण व विवेक सोडला नाही. लोभ, लालच व कामविकार यांचा त्याग केला. राजा विक्रम हा शनि महात्म्याचे माध्यम आहे, कोणत्याही व्यक्तीने मस्तपणा, टिंगळ टवाळी, माज, गर्व, मत्सर हे कुठल्याही परिस्थितीत करू नये हेच या राजा विक्रमाच्या कथेच्या माध्यमातून शनि महात्म्यकारास सांगायचे आहे. यातून प्रत्येकाने हा बोध घेऊन आपले आचरण शुध्द व सात्विक ठेवावे, तरच साडेसातीची तीव्रता कमी होईल. केवळ पोथी वाचून काही होणार नाही.

साडेसाती म्हणजे मनाविरुध्द घडणाऱ्या घटनांचा काळ असा समज आहे पण वास्तविक पाहता शनीची साडेसाती ही व्यक्तीला सहनशील, धार्मिक, दानशील व कर्मशील बनवते. अशा वाईट काळातच माणसाची योग्य पारख होते. याकाळात व्यक्तीला आपल्या परक्याची जाणीव होते. स्वत:चे गुण दोष लक्षात येतात, गर्व हरण होते, अहंकार गळून पडतो. माणूसकीची जाणीव होते. एक माणूस म्हणून कसे जगावे याचे ज्ञान होते. अविचारांनी केलेल्या कामांची फळे साडेसातीत मिळताना दिसतात.

वरील विवेचनावरुन हे लक्षात येते की साडेसाती म्हणजे एक सत्व परीक्षाच असते. साडेसाती म्हणजे आपण केलेल्या कर्मांचे फळ मिळण्याचा कालखंड. जर आपण चांगले कर्म केले असतील तर साडेसातीच्या काळात भाग्योदय होईल, उत्कर्ष होईल, उच्च पद प्राप्ती होईल, आपण ठरवलेले ध्येय- लक्ष साध्य होईल आणि जर का वाईट कर्मे केली असतील अथवा हातून घडली असतील तर त्रास, नुकसान, अपयश सहन करावे लागेल, नोकरी व्यवसायात पिछेहाट होईल. मग या व्यक्तीनी अशा घटनानी खचून न जाता यातून काही बोध घ्यावा. इतकेच.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण वाचा 

शनि महात्म्य मराठी 

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची दुष्काळग्रस्त गावांची पाहणी

हातकणंगले / प्रतिनिधी

सलीम खतीब


कोल्हापूरचे पालक मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी मनपाडळे, कासारवाडी,लक्ष्मीवाडी,तारदाळ, माले या हातकणंगले तालुक्यातील गावांना भेटी देऊन दुष्काळ स्थितीची पाहणी केली.

           माले (ता. हातकणंगले ) येथील दुष्काळ ग्रस्त शेतीची पाहणी करण्यात आली.यावेळी बोलताना  पालकमंत्री म्हणाले भुईमूग, सोयाबीन आदी पीके २५% खराब झाली आहेत. या बिकट स्थितीपेक्षा मार्च नंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे ही  गरजेचे आहे. त्यासाठी उपाय योजनेसाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सर्वे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

 यावेळी सरपंच उमेश पाटील यांनी तलाव खुदाई व रुंदी करण्याची मागणी केली.तसेच माजी उपसरपंच प्रताप उर्फ  बंटी पाटील यांनी नदीतून थेट पाईप लाईन करून गावाला पाण्याची व्ययवस्था करावी अशी  मागणी केली.

‌      यावेळी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, माजी सभापती राजेश पाटील,भाजपा तालुका अध्यक्ष पी डी पाटील, प्रताफ उर्फ बंटी पाटील, तहसिलदार सुधाकर भोसले,उपसरपंच सुनिल कांबळे,ग्रामपंचायात सदस्य , ,गटविकास अधिकारी, कृषी अधीकारी, मंडल अधिकारी,तलाठी, ,ग्रामसेवक ,शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

        फोटो 

माले( ता. हातकणंगले) येथे दुष्काळग्रस्त शेतीच्या परिस्थितीची पाहणी करतांना नाम. चंद्रकांतदादा पाटील , आम.डॉ. सुजित मिणचेकर व अधिकारी वर्ग

पुढील 48 तास जगभरात इंटरनेट ठप्प राहण्याची शक्यता

इंटरनेट वापरणाऱ्यांना पुढील 48 तासांसाठी इंटरनेट नसल्याने अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जगभरात पुढील 48 तासांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद होऊ शकते, असं सांगितलं जात आहे. मुख्य डोमेन सर्व्हरचं काही तासांसाठी नियमित देखरेखीचं काम सुरु 

सविस्तर बातमी साठी खालील लिंकवर क्लिक करा 

 48 तास जगभरात इंटरनेट ठप्प राहण्याची शक्यता

इडली ऑर्किड आणि मी !


कामत ग्रुप'चे सर्वेसर्वा डॉ. विठ्ठल कामत यांचं हे पुस्तक उद्योजक बनण्याची प्रेरणा देतं. सर्वसाधारण खानपानवाला, ते ऑर्कीड'सारख्या पंचतारांकित हॉटेलचा मालक हा त्यांचा प्रवास या पुस्तकातून वाचक अनुभवतो. १९५० साली कामत यांच्या वडिलांनी चर्चगेट रेल्वेस्टेशनपाशी सत्कार हे हॉटेल सुरू केलं.

आईनं दागिने गहाण ठेवून हे होटेल उभारायला मदत केली.याच हॉटेलनं पुढे इतिहास घडविला. 'सत्कार'पासून सुरु झालेला प्रवास दिमाखदार ठरला. 'पर्यावरणाचा तोल राखणारं सर्वोत्कृष्ट हॉटेल'चा मानही त्यांच्या हॉटेलला मिळाला. मराठी माणसाला उद्योजक होता येत नाही, ही उक्ती खोटी ठरवणारं कामत यांचं हे आत्मचरित्रपर लेखन वाचावं असेच आहे.

हे पुस्तक आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अॉनलाईन ही मागवू शकता.

इडली ऑर्किड आणि मी 

Thursday, 11 October 2018

पी.एन.पाटील दुध संस्थेची सभा खेळीमेळीत


    माजगाव प्रतिनिधी.

दि.१०/१०/२०१८

        मा.आ.श्री.पी.एन.पाटील दुध संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत  पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ सभासद बापुजी गोडसे होते.प्रमुख पाहुणे पन्हाळा काॅग्रेसचे उपाध्यक्ष व संस्थापक पांडूरंग पाटील(पा.वी.)होते.. 


संस्थेचे संस्थापक चेअरमन बाजीराव कदम म्हणाले "संस्थेच्या नफ्यात वाढ करण्यासाठी सर्वांनी गट तट बाजुला ठेवून सहकार्य करावे."

      संस्थेला या अार्थिक वर्षामध्ये ७,१९,२०१.६५रुपये व्यापारी नफा झाला आहे.अहवाल वाचन संस्थेचे सचिव ज्ञानदेव पाटील यांनी केले.यावेळी संस्थेला अहवाल वर्षात जादा दुध पुरवठा करणार्‍या सभासदांचा बक्षीस स्वरुपात रोख रक्कम देवून सत्कार करणेत आला.

   गाय विभाग.

१.मारुती कृष्णा कदम(पडळ)

एकूण दुध.२५,४०६.०००लिटर.

एकूण रक्कम.६,८४,८३२.५८रुपये.

२.अमित बाबुराव चौगले(गवंडी)

एकूण दुध.२४,५७२.८००लिटर.

एकूण   रक्कम.६,११,७९१.५८रुपये.

३.पांडुरंग विठ्ठल पाटील.

एकूण दुध.२०,०८६.४००लिटर.

एकूण रक्कम४,९९,६६५.४९रुपये.

    म्हैस विभाग.

१.ज्ञानदेव मारुती गुरव.

एकूण दुध.३,९०९.०००लिटर.

एकूण रक्कम.१,७४,४६८.३४रुपये.

२.शिवाजी वसंत कदम.

एकूण दुध.३,३४१.६००लिटर.

एकूण  रक्कम.१,३१,४४४.२४रुपये.

३.ज्ञानदेव बापु पाटील.

एकूण दुध.२,०१४.४००लिटर.

एकूण रक्कम.८३,०८७.६२.

        यावेळी व्हा.चेअरमन.बळवंत कुंभार(दाजी),संचालक बी.आर.चौगले,तानाजी चौगले(बाळ),ज्ञानदेव गुरव,पांडुरंग कांबळे,सुनिता चौगले,राजश्री पाटील,मारुती कदम,के.पी.पाटील,संतराम,कांबळे,राजाराम सुतार,रवी पाटील,विलास पाटील,तानाजी पाटील,एकनाथ कदम,आदी उपस्थीत होते.


Wednesday, 10 October 2018

108 रुग्णवाहिका पुन्हा ठरली जीवनदायी - जोतिबा रस्त्यावर टेम्पो पलटी, अपघातग्रस्तांना मिळाली तात्काळ मदत

पन्हाळा- जोतिबा डोंगरावरून रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्यासाठी गेलेला ठेकेदाराचा टेम्पो उलटून टेम्पोत असलेला एक कामगार जखमी झाला तर अन्य दोघे जण बचावले आहेत. रस्त्यावर पांढरे पट्टे रण्यासाठीचे रसायन रंग आणि ज्वलनशील पदार्थ असलेला हा टेम्पो जोतिबा डोंगरावरून केर्लीच्या दिशेने जात असताना एका वळणावर पलटी झाला. यामधील गॅस टाकी लिक झाली होती. त्यामुळे अपघातग्रस्तांना धोका निर्माण झाला होता. 


पण महाराष्ट्र शासनाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी जावून टेंम्पोत अडकलेल्यांची सुटका केली, तसेच रुग्णवाहिकेसोबत असलेले डॉ. अभिजित जाधव आणि रुग्णवाहिकेच्या चालकाने प्रसंगावधान राखून टेम्पोतील ज्वलनशील पदार्थ बाजूला काढले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. लक्ष्मण प्रल्हाद कांबळे- (२२) मुळ गाव पुसद जिल्हा यवतमाळ सध्या राहणार वडगाव हा तरुण जखमी झाला तर अन्य दोघेजण सुदैवाने बचावले. जखमींना रुग्णवाहिकेतून कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tuesday, 9 October 2018

घटस्थापना आणि नवरात्र महात्म्य


नमो दैव्ये महादेव्यै शिवायै सततं नमः ।

नमः प्रकृत्यैभद्रायै नारायणि नमोऽस्तुते ॥

ब्रम्हरुपे सदानन्दे परमानन्द स्वरुपिणी ।

द्रुत सिध्दिप्रदे देवि, नारायणि नमोऽस्तुते ॥नवरात्र व्रत, उत्सव आश्विन शुध्द प्रतिपदेपासून नऊ दिवस भक्तिभावे करतात. प्रतिपदेच्या दिवशी सर्वच ठिकाणी देवीची स्थापना करतात. नऊ दिवसापर्यंत नवरात्र असते. अनेक कुटुंबांतही दुर्गा देवीची पूजा होत असते. दुर्गा देवी ही असंख्य कुटुंबांची कुलदेवता आहे.

पहिल्या दिवशी घटस्थापना करतात. तांब्याच्या कलशावर ताम्हण ठेवून त्यात मंडलाकर मुख्य देवता महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती व त्यांच्या अनेक परिवार देवता यांची स्थापना करतात. घटाच्या बाजूलाच नवे धान्य रुजत घालतात. नंतर ते रुजवण उत्सवसमाप्तीनंतर भगिनी केसात माळतात.

घटस्थापनेच्या वेळी लावलेला नंदादीप, अखंडदीप विसर्जनापर्यंत पेटत ठेवतात.


या नऊ दिवसात श्रीदेवी माहात्म्य - प्राकृत सप्तशती, श्री दुर्गा माहात्म्य, नवरात्र माहात्म्य (देवी गौरव गाथा ), श्री दुर्गा कवच इत्यादी ग्रंथांचे, पोथ्यांचे वाचन करतात. काही ठिकाणी नऊ दिवस उपवास करतात. तर कोणी पहिल्या दिवशी व घट उठण्याच्या आदल्या दिवशी उपवास करतात.

नवरात्रात कुमारिकांना, सुवासिनींना घरी जेवायला आमंत्रित करतात. एका दिवशी एका सुवासिनीची खणानारळाने ओटी भरतात. मंदिरात जाऊन देवीची खणानारळाने ओटी भरतात.

नवरात्रात नऊ दिवस देवीच्या घटावर सुगंधी फुलांची माळ सोडतात.

नवरात्रात काही विशिष्ट व्रते करावयाची असतात. आश्विन शुध्द पंचमीला उपांगललिता देवीचे व्रत असते. ललिता पंचमीस घटावर सायंकाळी पापडया, करंज्या, गोड वडे वगैरे फुलोरा टांगतात. त्या समारंभात ललिता देवीची पूजा प्रार्थना करुन महाप्रसादासाठी लोकांना बोलवतात. हा कुळधर्म आहे.

कुंकवाच्या करंडयाचे झाकण घेऊन त्याची ललितादेवी म्हणून प्रतीकात्मक पूजा करतात. गंधपुष्प आणि अठ्ठेचाळीस दूर्वा ललिता देवीला वाहण्याची परंपरागत रुढी आहे.

नमो दैव्यै महादैव्ये शिवायै सततं नमः । नमः प्रकृत्यै भद्रायै नियता; प्रणताः स्म ताम्॥

ललितादेवीचा हा ध्यानमंत्र आहे.

पंचमीला कुंकुमार्चन म्हणजे कुमारिका आणि सुवासिनींकडून देवीला कुंकू वाहतात. कुंकूवाबरोबर दूर्वा, फुले वाहून देवीची आरती म्हणतात. घरात मंगल वातावरण सदैव राहावे यासाठी, शिवाय सौभाग्यरक्षणासाठी सुवासिनी देवीला कुंकू वाहतात.

आश्विन शुध्द अष्टमीला श्रीमहालक्ष्मी व्रतांग पूजा करतात. महाराष्ट्रात चित्त्पावन ब्राम्हण समाजात हे व्रत प्रचलित आहे. लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्षे श्रीमहालक्ष्मीची पूजा सुवासिनी मोठया उत्साहाने भक्तिभावे करतात. या दिवशी सकाळी देवीचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवून पूजा करतात. आरती करतात. रात्रौ तांदुळाच्या पिठाची श्रीमहालक्ष्मीची मूर्ती करुन तिची पूजा करतात. ज्यांच्या घरी ही पूजा असते, त्यांच्या घरी सुवासिनी देवीची पूजा करण्यासाठी जातात.

सोळा पदरी रेशमाचा दोरा घेऊन त्याला गाठी मारतात. पहिले वर्षे असेल तर एक गाठ, पाचवे वर्ष असेल तर पाच गाठी असा तातू तयार करतात. हा दोरा पूजिकेने आपल्या हातात बांधावयाचा असतो. दुस-या दिवशी सकाळी मूर्तिविसर्जनाच्या वेळी देवीपुढे ठेवायचा असतो.

रात्री देवीची पूजा झाल्यानंतर सुवासिनी घागरी फुंकून नाचू लागतात. दुस-या दिवशी सूर्योदयापूर्वी पंचोपचार पूजा करुन आरत्या, प्रार्थना करुन विसर्जन करतात. 'उदयोऽस्तु' ही या देवीची घोषणा आहे.नवरात्रात महालक्ष्मीची पूजा हा कुलाचार आहे. कुलधर्म आहे.

आश्विन शुध्द प्रतिपदेपासून दशमीपर्यंत नवरात्रात बोडण भरण्याची चाल पुष्कळ ठिकाणी आहे. विशेषतः कोकणस्थ व देशस्थ ब्राम्हणांमधील हा एक कुलाचार आहे. बोडण विधी आश्विन शुध्द प्रतिपदेलाच करण्याची वहिवाट काही कुटुंबांत आहे.

बोडण म्हणजे कालवणे. एका मोठया पात्रात घरातील देवीची मूर्ती ठेवून तिची पूजा करायची आणि सभोवती पाच सुवासिनींनी बसून त्या पात्रात दूध, दही, तूप, साखर, मध ही पाच द्रव्ये एकत्र घालून सर्वांनी मिळून कालवायची असा हा विधी आहे. तर काही ठिकाणी पाच सुवासिनी व एक कुमारिका एकत्र बसून देवीची पूजा करतात व पुरणावरणाचा स्वयंपाक देवीला अर्पण करतात. नंतर तो स्वयंपाक पाच सुवासिनी मिळून एकत्र कालवतात आणि त्या कुमारिकेला देवी मानून तिची पूजा करतात. ती जेव्हा 'खूप झाले' असे म्हणते तेव्हा ते कालवलेले अन्न गायीला नेऊन देतात.

आश्विन शुध्द नवमीला खड्गानवमी किंवा खांडेनवमी असे म्हणतात. या दिवशी शस्त्रपूजा करण्याची चाल अनेक कुटुंबात आहे.

विजयादशमीला श्रीसरस्वती पूजन करण्यात येते. लहान मुलांना प्रथमच पाटीवर 'श्रीगणेशा' ही अक्षरे गिरवायला लावतात. विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक चांगला मुहूर्त आहे. या दिवशी नक्षत्रांच्या उदयाच्या वेळी विजय हा मुहूर्त असतो. या वेळी इच्छा केलेली आणि कार्यारंभ केलेली सर्व कार्ये सिध्दीस जातात. म्हणूनच कोणत्याही शुभकार्याला लोक या दिवशी प्रारंभ करतात. हा पराक्रमाचा, विजयाचा दिवस आहे. या दिवशी शमीच्या वृक्षाची पूजा करतात. आणि आपटयाची पाने सुवर्णमुद्रा म्हणून लुटण्याची चाल पौराणिक काळापासून प्रचारात आहे.

दस-याला 'अपराजिता' दशमी असेही म्हणतात. ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्या ठिकाणी अष्टदल कमल काढून त्यावर दुर्गेची मूर्ती ठेवून श्रध्देने पूजा करतात. जीवनाची सर्वोच्च साधना म्हणजे शक्ती प्राप्त करुन घेणे. शक्तीचे मुख्य लक्षण कधीही पराभूत न होणे हेच आहे. तिचे अंतिम फळ विजयप्राप्ती करणे हेच आहे. दस-याच्या दिवशी

'रुप देहि, जयं देहि, यशो देहि, द्विषो जहि'

अशी दुर्गेची प्रार्थना करतात.

नवरात्र पूजेत घटावर मंडपी बांधून त्याखाली लोंबणार्या विविध फुलांच्या माला बांधतात हा एक महत्वाचा विधी आहे. कित्येक कुटुंबांत ही माला चढती असते. म्हणजे पहिल्या दिवशी एक, दुसर्या दिवशी दोन, तिसर्या दिवशी तीन याप्रमाणे नवव्या दिवशी नऊ माला बांधतात.


संत सज्जनांचा छळ करणा-या असुरशक्तीचे निर्मूलन देवी भगवतीने निरनिराळे अवतार घेऊन केले आणि देव व मानवांचे रक्षण केले तेव्हा देवीची स्मृती जागविण्यासाठी नवरात्र उत्सव मोठया उत्साहाने साजरा करतात. या नऊ दिवसात घराच्या दारावर झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. सर्वजण नवरात्र जागवून देवीची आराधना, प्रार्थना करतात. देवी सर्वांची इच्छा पूर्ण करते. देवीच्या कृपाप्रसादाने मनुष्य सर्व बाधेतून मुक्त होतो. सुखी होतो. त्याच्या घरी श्रीमंती येते. देवीचे माहात्म्य सर्व पुराणातून वर्णन केलेले आहे.

मसाला उद्योगाचे बादशाह एम.डी.एच (MDH) मसाला यशोगाथा

सोशल मीडिया पासून ते टीव्ही मिडिया पर्यंत सर्वत्र पसरलेली बातमी एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाबाबतची माहिती अफवा असल्याची माहिती समोर आली आहे.

पण या निमित्ताने आपण मसाल्याचे बादशाह एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या व्यवसायाची यशोगाथा पाहूया.

धर्मपाल यांचं शिक्षण फक्त पाचवी पर्यंतच झालं आहे. वडिलांपेक्षा वेगळा व्यवसाय करून त्यांना यशस्वी व्हायचं होतं. त्यामुळं त्यांनी अनेक व्यवसाय करून बघितले. पण त्यांना यश आलं नाही.

महाशय धरमपाल गुलाटी यांचा जन्म २७ मार्च १९२३ ला सियालकोट (पाकिस्तान) मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव महाशय चुनीलाल आणि धरमपाल जन्माला येण्या आधी 1919 ला MDH म्हणजे महाशियन दी हात्ती या मसाला दुकानाची स्थापना केली होती. 

धरमपाल यांनी पाचवीमधूनच शाळा सोडली. ते साल होते १९३३. त्यानंतर १९३७ मध्ये वडिलांच्या मदतीने त्यांनी छोटा व्यवसाय सुरू केला. मग काही दिवस साबणाचा व्यवसाय, त्यानंतर काही काळ नोकरीही केली. कपडे आणि तांदळाच्या व्यापारामध्येही त्यांना काही काळ आपले नशीब आजमावले. 

१९४७ साली  देशाची फाळणी झाल्यावर धरमपाल गुलाटी भारतात आले. २७ सप्टेंबर १९४७ ला ते दिल्लीला आले, त्यावेळी त्यांच्याकडे फक्त १५०० रुपये होते. त्यातले ६५० रूपये खर्च करून त्यांनी एक टांगा विकत घेतला. नवी दिल्ली स्टेशनपासून कुतुब रोड आणि करोल बाग ते बडा हिंदूराव पर्यंत ते टांगा चालवत असत. त्यानंतर करोलबाग इथं एका लाकडाच्या लहानश्या पेटील मसाले विकायला सुरूवात केली. तेव्हापासून तो व्यवसाय वाढतच गेला.

 त्यांनी आपल्या पारंपारिक मसाला व्यवसायाची नव्याने मुहूर्तमेढ रोवली आणि पुनश्च ‘महाशिअन दी हात्ती ऑफ सियालकोट’ म्हणजेच ‘देग्गी मिर्चवाले’ यांचे नाव उज्जवल केले.

धर्मपाल हे एमडीएच मसाल्याचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहेत. गेली अनेक वर्ष ते कंपनीच्या मसाल्यांचे ब्रॅण्डींग करतात. आणि त्यांच्या त्या जाहीरातीला उत्तम प्रतिसादही मिळतोय. एमडीएच मसाल्याच्या प्रत्येक पाकिटावर त्यांचा फोटो असतो.

एमडीएच ची सुरूवात छोट्या स्तरपासून झाली असली तरी कंपनीचा आजचा व्याप प्रचंड मोठा आहे. देशातल्या मसाला बाजारात कंपनीचा वाटा 12 टक्के आहे. कंपनी 62 प्रकारची उत्पादनं तयार करते. ही सर्व उत्पादनं 150 पॉकेट्समध्ये उपलब्ध आहेत.

 तुम्हाला आश्चर्य धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. दोन वर्षांपूर्वी त्यांचं वार्षिक वेतन हे 24 कोटी रूपये होतं. त्याचबरोबर कंपनीत त्यांचा 80 टक्के हिस्साही आहे. आपल्या वेतनामधला 90 टक्के हिस्सा आपण सामाजिक कार्यासाठी देतो असा त्यांचा दावा आहे.

एमडीएच ची वार्षिक उलाढाल 1500 कोटींच्याही वर आहे. त्यांच्या कंपनीकडे 15 कारखाने असून 1000 डिलर्सचं जाळं आहे. जगभरातल्या अनेक देशांमध्ये त्याची उत्पादनं विकली जातात. 

‘जे जे तुमच्यकडे सर्वोत्कृष्ट आहे, ते ते जगाला द्या. तुम्ही दिलेले सर्वोत्कृष्ट तुमच्याकडेच परत येईल.  अशी फिलॉसॉफी असणाऱ्या महाशय धरमपाल गुलाटी यांचे योगदान भारतातील सर्व उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात काही शंका नाही.


Sunday, 7 October 2018

जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्या व प्रश्नांची चर्चा

कोल्हापूर / प्रतिनिधी दि. ६ / १०/१८
     मिलींद बारवडे
  कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्या व प्रश्नांची चर्चा करण्यासाठी सभा आयोजित केली होती. या सभेत जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी. पाटील यांना शिवाजी विद्यापिठाची डिलीट पदवी मिळावी अशी मागणी करण्यात आली.
    प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींगमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षण विभागातील विविध समस्यां व प्रश्नांची चर्चा करण्यासाठी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सभा आयोजित केली होती. प्रास्ताविक शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस.डी. लाड यांनी केले. प्रमुख उपस्थिती जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी. पाटील यांची होती. अध्यक्षस्थानी डॉ.क्रांतीकुमार पाटील होते.
    संस्थाचालकांचा तालूकानिह बैठका,पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती शासन कार्यवाही विरोध,शिक्षक भरती बंदी उठवून शिक्षक भरतीचे अधिकार संस्थेस द्यावे,अतिरिक्त शिक्षकांचे प्रश्न,संच मान्येतच्या त्रुटी दूर करणे,ऑनलाईन भरतीमुळे अध्यापन सोडून काम करावे लागते. शासनाने ऑनलाईन माहितीसाठी वेगळी यंत्रणा सुरू करावी,बीएलओचे काम बंद करावे,शासनाच्या काही चुकीचे धोरण विरोध,शिक्षकेत्तर कर्मचारी नसलेने शाळेतील व्यवस्थापनाचे कार्य होत नाही,१४ व्या वित्त आयोगातर्फे प्राथमिक विभागासारखी पाचवी ते आठवीसाठी आर्थिक तरतूद करावी,शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांच्या मागण्या,वंदूरमधील मुख्याध्यापक विष्णू मोरे यांच्या आत्यहत्याची सखोल चौकशी व्हावी,, माध्यमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार मागणी आदी विषयावर चर्चा होऊन कार्यवाही होणेसाठी शिष्टमंडळ गठीत करून विभागिय कार्यालय व कॅबिनेट मंत्र्याना भेटणेचे ठरले. तसेच कुरळपयेथील आश्रमशाळेतील घडल्या प्रकारचा तिव्र निषेध करप्यात आला.
     चौकट-
   जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी. पाटील यांच्या साठ वर्षातील शैक्षणिक कार्याबद्दल शिवाजी विद्यापिठाची डिलीट पदवी मिळावी यासाठी सर्वानु मते ठराव करण्यात आला.
  या प्रसंगी  डॉ.क्रांतीकुमार पाटील, वसंतराव देशमुख, जयंत आसगावकर, व्ही.जी. पवार, आर. वाय. पाटील, सुधाकर निर्मळे, सी.एम. गायकवाड, मिलींद बारवडे, आर.डी. पाटील, प्राचार्य सी.आर. गोडसे, गजानन जाथव, बी.जी. बोराडे, सुधाकर सावंत, के.के. पाटील, उदय पाटील, राजेश वरक,अरूण मुजमदार,डी.ए. जाधव, रंगराव तोरस्कर, समीर घोरपडे,संदीप पाटील,  गजानन काटकर, प्रकाश पाटील, ईश्वरा गायकवाड, बी.के. मोरे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार सी.एम. गायकवाड यांनी मानले.
      फोटो
शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस.डी. लाड बोलतांना शेजारी डी.बी. पाटील, डॉ. क्रांतीकुमार पाटील, बी.जी. बोराडे आदीसह पदाधिकारी

https://www.amazon.in/gp/product/B00VRV2MVG/ref=as_li_qf_asin_il_tl?ie=UTF8&tag=mh9livenews-21&creative=24630&linkCode=as2&creativeASIN=B00VRV2MVG&linkId=9057f5ecd974076bebec506d04fca553

Saturday, 6 October 2018

पौष्टिक आहार महत्वाचा -  डॉ.उमेश कदम

     कसबा बावडा परिसरातील उपक्रमशील शाळा मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ कसबा बावडा व सेवा रुग्णालय लाईन बझार यांच्या संयुक्त विद्यमानाने
भव्य स्वाईन फ्लू, गोवर व रुबेला जनजागृती,पर्यावरण रॅलीचे आयोजन करणेत आले होते.
या रॅलीचे उदघाटन प्रसंगी प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, नगरसेविका माधुरी लाड,डॉ. उमेश कदम , डॉ. दिलीप वाडकर, मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांच्या उपस्थितीत रॅलीचे उदघाटन झाले.
या प्रसंगी सी.एल.कदम, अभिजित जाधव, शाळेचे शिक्षक उत्तम कुंभार,  शिवशंभू गाटे,,बाबा थोरात, विद्याचेतना शिक्षक मित्र अर्चना एकशिंगे, वैशाली चौगुले, शाळेचे विद्यार्थी, सेवा रुग्णालय कर्मचारी, पालक आणि भागातील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत स्वच्छ परिसर,  स्वच्छता राखा आरोग्य पाळा,  रुबेला लस बाळाला द्या,  निसर्गाचे रक्षण करा प्रदूषण करू नका,  पौष्टीक आहार बाळाला द्या,  येता ताप, खोकला, डॉक्टरना भेटा, याप्रकारच्या घोषणा देण्यात आल्या, तसेच छावा चौक,दवाखाना चौक मध्ये **प्लास्टिक मुक्ती भारत पथनाट्य** सादर करून उपस्थित्यांची मने जिंकली.
रॅलीचे नियोजन डॉ उमेश कदम,अजितकुमार पाटील,उत्तम कुंभार यांनी केले होते.पथनाट्य मध्ये मृणाली दाभाडे,रसिका माळी,निषिका शिंदे, आशिषा, गायकवाड,सिदेश मोरे( M.D),रोहित लाखे,मयुरी कांबळे,शार्दूल सुतार,सुजय घोणे,स्नेहल दाभाडे,मिसभाह मणियार,ऋतुराज कोरवी,प्रज्वल घाटगे,राजनंदिनी कारंडे,पीयूष सरगर,कादंबरी चौगले,सानिका कांबळे व इतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

<iframe style="width:120px;height:240px;" marginwidth="0" marginheight="0" scrolling="no" frameborder="0" src="//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?ServiceVersion=20070822&OneJS=1&Operation=GetAdHtml&MarketPlace=IN&source=ac&ref=qf_sp_asin_til&ad_type=product_link&tracking_id=mh9livenews-21&marketplace=amazon&region=IN&placement=B00VRV2MVG&asins=B00VRV2MVG&linkId=a29e778977593381ab072495e97bc400&show_border=false&link_opens_in_new_window=false&price_color=333333&title_color=0066C0&bg_color=FFFFFF">
    </iframe>

Thursday, 4 October 2018

संजय पवार यांची आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या  (राज्यमंत्री दर्जा ) उपाध्यक्षपदी निवड झाल्याने मौजे वडगाव शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार

शिरोली / प्रतिनिधी
   अवधूत मुसळे


 शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांची आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या  (राज्यमंत्री दर्जा ) उपाध्यक्षपदी निवड झाल्याने मौजे वडगाव शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला
      यावेळी ते म्हणाले की , मला मिळालेले पद हे गेली २८ वर्ष पक्षात एकनिष्ठपणे केलेल्या कामाची पोचपावती आहे .सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी चळवळ उभी करुण विविध आंदोलनातून गोरगरिब जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे.यापुढे ग्रामीण भागातील युवा ' व होतकरू तरुणांना महामंडळाच्या माध्यमातून विविध व्यावसायसाठी कर्ज प्रकरणे उपलब्ध करून देऊन मला मिळालेल्या संधीचे सोने करणार असल्याचे मत त्यांनी व्यकत केले
        यावेळी मौजे वडगाव शिवसेना शहरप्रमुख  सुरेश कांबरे , जय हनुमान दुध संस्थेचे चेअरमन बाळासो चौगुले , ग्रा पं . सदस्य अवधूत मुसळे , महादेव शिंदे , निवास शेडगे , जयवंत चौगुले ' महादेव चौगुले , श्रीकृष्ण थोरवत , सुनिल सुतार , आणासो पाटील यांच्या सह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.
        फोटो
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचा सत्कार करतांना मौजे वडगांव शहरप्रमुख सुरेश कांबरे व अन्य पदाधिकारी

https://amzn.to/2E7sWn8

मौजे वडगाव प्रभाग २मध्ये नवीन पाईपलाईन कामाचा शुभारंभ



  शिरोली/ प्रतिनिधी

    अवधूत मुसळे

मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील प्रभाग दोन मध्ये कुंभार कोपरा ते गाव चावडी ते जैन बस्ती परिसरामध्ये वाढीव नळ पाणीपुरवठा कामाचा शुभारंभ भाजपाचे तालुका उपाध्यक्ष व ग्रा.पं. विरोधी पक्षनेते अविनाश पाटील यांच्या हस्ते पार पडला

       पं समिती सदस्य उत्तम सावंत यांच्या प्रयत्नातून व जि.प. अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या फंडातून ग्रामीण पाणीपुरवठा जि.प. यांच्या देखभाल दुरुस्ती अंतर्गत ७ लाख रुपयेचा निधी उपलब्ध झाला होता . त्या कामाचा शुभारंभ यावेळी पार पडला प्रभाग २मध्ये वाढत्या नळ कनेक्शन धारकांचा विचार करता कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. तसेच प्रभागातील लोकसंख्या पाहता पाणीपुरवठ्यावर कमालीचा लोड येत असल्यामुळे येथील रहिवाशी असणाऱ्या लोकांचा विचार करूण पिण्याच्या पाण्याचा जुना प्रश्न मार्गी लागल्याने रहिवाशांमध्ये व प्रामुख्याने महिला वर्गात आनंद व समाधान व्यकत होत आहे .

        यावेळी शिवसेनेचे ग्रां .पंसदस्य अवधूत मुसळे , सदस्या सुनिता मगदुम , सरिता यादव , मायावती तराळ , स्वप्नील चौगुले , माजी उपसरपंच सुरेश कांबरे , सुनिल खारेपाटणे , आनंदा थोरवत , सतिश वाकरेकर , डॉ .आमिर हजारी , शिवाजी यादव , चंद्रकांत लंबे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते

       फोटो 

  मौजे वडगाव येथे नळ पाईपलाईन शुभरंभप्रसंगी अविनाश पाटील ' अवधूत मुसळे ' सुरेश कांबरे ' आनंदा थोरवत ' सुनिल खारेपाटणे व इतर ग्रां .पं. सदस्य मान्यवर

एमआयडीसी पोलीस ठाणे प्रमुख सपोनि परशुराम कांबळे यांना सर्वोत्कृष्ठ प्रकटीकरण पुरस्कार


शिरोली / प्रतिनिधी दि. २/ १०/१८

    अवधूत मुसळे

   एमआयडीसी पोलीस ठाणेचे प्रमुख सपोनि परशुराम कांबळे यांना सर्वोत्कृष्ठ प्रकटीकरण पुरस्काराने पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गौरविले.

     प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक यांच्या उपस्थित  महिन्यातील पोलीस ठाण्याच्या गुन्हे संदर्भात सर्व अधिकाऱ्यांची  आढावा  बैठक घेतली जाते. या बैठकीत एमआयडीसी पोलीस ठाणेचे प्रमुख सपोनि परशुराम कांबळे यांनी एका गुन्हयातील तात्काळ २o लाख ३५ हजार रोख रक्कमेची रिकव्हरी केली होती. तसेच ३९४ रॉबरी गुन्हा  तात्काळ आपल्या सहकाऱ्यांच्या साह्याने उघडकीस आणला होता. या आव्हानात्मक गुन्हे उघडकीस आणण्याच्या कामगिरी बद्दल पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्यांचा सर्वोत्कृष्ठ प्रकटीकरण पुरस्कार प्रमाणपत्र देऊन गुणगौरव केला. या प्रसंगी सपोनि सुशांत चव्हाण, पोलीस कर्मचारी वसंत पिंगळे,मच्छींद्र पटेकर, सतिश जंगम, सुरेश कांबळे यांचे ही कामगिरी बद्दल कौतुक करण्यात आले.

      फोटो 

एमआयडीसी पोलीस ठाणेचे प्रमुख सपोनि परशुराम कांबळे यांना  पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख गौरवितांना शेजारी सपोनि सुशांत चव्हाण व पोलीस कर्मचारी

Tuesday, 2 October 2018

ग्रामिण पत्रकारांना राज्य शासनाच्या सोयीसुविधा मिळवून देणेसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणेसाठी प्रयत्नशील राहणार : भाजपा नेते दलितमित्र डॉ.अशोकराव माने


     हातकणंगले / प्रतिनिधी

         सलीम खतिब


कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या हातकणंगले तालूका शाखेतील विविध दैनिकांच्या व इलेक्ट्रॉनिक चॅनेल्स मेडियाच्या पत्रकारांचा परिचय व पत्रकारांच्या समस्या जाणून घेणेसाठी दलित मित्र डॉ.अशोक माने यांनी स्नेहमेळावा  देशभक्त रत्नाप्पा कुंभार सहकारी मागासवर्गिय सुतगिरणी येथे आयोजित केला होता.

     यावेळी संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील ,तालुका अध्यक्ष प्रा. रविंद्र पाटील, कौन्सील मेंबर अतुल मंडपे, संजय दबडे, संतोष सणगर, अनिल तोडकर  यांनी ग्रामिण पत्रकारांच्या विविध समस्या मांडून राज्य शासनाकडून खालील मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी  डॉ. अशोकराव माने यांनी शासन दरबारी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.


       ग्रामिण पत्रकारांच्या मागण्या

१) कोल्हापर जिल्ह्यातील सर्व ग्रामिण पत्रकारांना मोफत नगरपालिका, नगरपंचायत , परिसरातील  मोठे गांव येथे प्लॉट व  हौसिंग सोसायटीच्या माध्यमातून म्हाडा अंतर्गत घरे मंजूर करावीत.

२ ) पेन्शन योजना सुरू करावी

3) मोफत एस.टी. प्रवास सेवा पास मिळावेत

४ ) टोल फ्री पास सेवा मिळावी.

५) आरोग्य विमा योजना लागू करावी

६ ) पत्रकारांच्या मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आर्थिक मदत, व्यावसाईक शैक्षणिक फी माफ व्हावी.

७ )पत्रकार संघास पत्रकार दिन , पत्रकार पुरस्कार कार्यक्रम, पत्रकार कार्यशाळा आदी कार्यक्रम आयोजनासाठी शासनाकडून अर्थसहाय्य मिळावे.

८ ) बारा तालूक्याच्या ठिकाणी पत्रकार भवन स्थापन व्हावे.

      

    कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या हातकणंगले तालूका शाखेच्या वतीन जि.प. सदस्य तथा चेअरमन दलित मित्र डॉ. अशोक माने यांना पत्रकारांच्यासाठी शासनाकडून विविध सोयी सुविधा मिळणेबाबत लेखी निवेदन देतांना संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, संजय दबडे, अतुल मंडपे, प्रा. रविंद्र पाटील, आनंदा काशिद,सुरेश कांबरे, संतोष सणगर, राजू पाटील, भाऊसाहेब सकट,अनिल तोडकर, बाळासाहेब चोपडे,बाळासाहेब कांबळे, विवेक स्वामी, लक्ष्मण कांबरे, सतिश पाटील,सलीम खतीब, सुरज पाटील, अवधूत मुसळे, हरी बुवा, कुबेर हंकारे, दिपक यादव, सतीष मोरे, आण्णा कामत, नाना जाधव, रविंद्र पाटील, एस.आर. जाधव, अनिल बाबर, उदय पाटील, प्रविण जाधव, भाऊसाहेब दाबाडे, सुरेश कुंभार, शिवाजी चव्हाण, युवराज पाटील, राजेंद्र जगदेव, अजित लटके ,शैलेंद्र चव्हाण, रमेश शिंगे, उत्तम हुजरे, अमित काकडे, अनिल हजारे, संजय काजवे, प्रविण पवार, गजानन खोत, तानाजी पाटील, टिपू सनदी, अमोल नांद्रे, विठ्ठल मोहिते, संजय साळुंखे, संभाजी भालबर, रामनाथ डेंगळे, कोळी, रवि जत्राटकर, प्रविण मोरे, विनोद खोत, अल्लाऊद्दीन मुल्ला, आदी ५७ पत्रकार उपस्थित होते.

राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी...

**.


*कसबा बावडा:* कसबा बावडा परिसरातील उपक्रमशील शाळा राजर्षी शाहू विद्यामंदिर मध्ये महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती उत्सहात साजरी करण्यात आली.मुख्याध्यापक अजितकुमार पाटील सर यांच्याहस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.या वेळी त्यांनी महात्मा गांधीजी यांचे विचार बोलण्यापेक्षा आत्मसात करणे महत्वाचे आहे.स्वच्छता राखा, आरोग्य पाळा कारण सर्व आजार हे स्वच्छता नसलेमुळे उदभवतात.असे प्रतिपादन केले.शाळेचे शिक्षक शिवशंभू गाटे सर व विद्यार्थी पालक मोठया संख्येनं उपस्थित होते.



                      सदर प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लाला बहाद्दूर शास्त्री यांच्याविषयी आपला आदर व्यक्त करण्यासाठी भाषण सादर केले.त्यात समर्थ कांबळे,बापू गाढवे,पियुष सरगर,यशराज घाडगे,जान्हवी ताठे,अस्मिता लोंढे,अक्षरा लोंढे,देवयानी पोवार,तेजस्विनी माने,तनिष्का पाटील,राजनंदिनी कारंडे,वैष्णवी बंडगर,ऋतूराज कोरवी,राजवर्धन अडनाईक आदी मुलांनी दर्जेदार भाषणे केली.तसेच शालेय परिसर स्वच्छ केला.व खऱ्या अर्थाने राष्ट्रपित्याच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचा संकल्प केला.शिक्षक

आणि विद्यार्थी यांनी शालेय परिसर स्वच्छ केला.