हातकणंगले / प्रतिनिधी
दि.4/2/2021
सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस ठाणे हातकणगले यांच्या नावे हेरले ( ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन उपसरपंच राहूल शेटे यांनी नायब तहसिलदार दिगंबर सानप यांना दिले.
लेखी निवेदनातील आशय असा की, कोल्हापूर - सागली रोडवर हेरले गांवामध्ये जाण्यासाठी गावभाग व माळभाग येथून आत जाण्यासाठी रस्ता आहे.त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहे. परंतु त्याच्यावर पांढऱ्या कलरने रंगवले नाही त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. दि.१ ते ३१ जानेवारी २०२१ या एक महिन्याच्या कालावधीत लहान- मोठे एकुण १२ अपघात झाले आहेत. त्यामध्ये हेरले गावातील दोन व्यक्ती मयत झाले आहेत. तर १५ व्यक्तीना गंभीर इजा पोहचली आहे . म्हणून आम्ही खालील बाबींची मागणी करत आहोत.स्पीड ब्रेकरचा फलक लावणे,गाव असले बदल फलक लावणे,वेग मार्यादाचा फलक लावणे,रेड लाईट रिफ्लेक्टर बसवणे, माळभाग व गावभाग या दोन्ही बस थांबा ठिकाणी निवारा शेड उभारने,आपल्या हाद्दीतील अतिक्रमण काढणे आदी या वरील मागण्यांचा विचार करून दहा दिवसात पुर्तता करावी व अपघात टाळण्यास मदत करावी. अन्यथा १५ फेब्रुवारी २०२१ रोजी सर्व ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा उपसरपंच राहूल शेटे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
लेखी निवेदन नायब तहसिलदार दिगंबर सानप यांना देतांना उपसरपंच राहुल शेटे,शेतकरी संघटनेचे तालुका सरचिटणीस मुनिर जमादार,माजी उपसरपंच संदीप चौगले,ग्रा पं सदस्य मज्जीद लोखंडे,बटुवेल कदम,राजू खोत व सतीश कुरणे आदी मान्यवर.
फोटो
हातकणंगले नायब तहसिलदार दिगंबर सानप यांना लेखी निवेदन देतांना मुनिर जमादार उपसरपंच राहूल शेटे व इतर मान्यवर