पेठवडगांव / प्रतिनिधी
दि.10/2/21
मिलींद बारवडे
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी बाळासाहेब डेळेकर यांची निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार वडगाव विद्यालय ज्युनियर कॉलेज वडगावमध्ये करण्यात आला.
श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कागलचे उपमुख्याध्यापक बाळासाहेब डेळेकर यांची कोजिमाशिच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल तसेच शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरच्या शिक्षक प्रतिनिधी कौन्सिल सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मुख्याध्यापक आर आर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
वडगाव विद्यालय ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक आर आर पाटील यांची शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर च्या मुख्याध्यापक प्रतिनिधी कौन्सिल सदस्यपदी निवड व माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ मुंबईच्या कौन्सिल सदस्य पदी निवड झाल्याबद्दल व विद्यालयाचे कार्यवाहक के बी वाघमोडे यांच्या संस्थेच्या उत्कृष्ट सेवेच्या कार्याबद्दल या दोन मान्यवरांचा सत्कार कोजिमाशिचे चेअरमन बाळासाहेब डेळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी या तीन सत्कार मूर्तींनी मनोगती व्यक्त केली.
कोजिमाशी शाखा पेटवडगाव च्या वतीने चेअरमन बाळासाहेब डेळेकर यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी मॅनेजर विजय पाटील, स्वप्ना थोरात, पोपट माने, उमा पाटील, पांडुरंग दिपक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपमुख्याध्यापक संभाजी माने, पर्यवेक्षक डी के पाटील ,तंत्रविभाग प्रमुख अविनाश आंबी, पी जी सुब्रमणी, दिलीप शेळके, डी एस कुंभार ,मिलिंद बारवडे, पी ए पाटील,रमेश पाटील, पी एस पाटील, अकबर पन्हाळ्कर,सुरेश चव्हाण, जावेद मणेर, नेताजी वडगावकर, रविंद्र वासुदेव,सचिन पाटील आदी मान्यवरांसह शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी विदयार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अजित लाड यांनी केले.
फोटो
वडगांव : कोजिमाशिच्या चेअरमनपदी बाळासाहेब डेळेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मुख्याध्यापक आर आर पाटील करताना शेजारी उपमुख्याध्यापक संभाजी माने, पर्यवेक्षक डी के पाटील, कार्यवाह के बी वाघमोडे व इतर मान्यवर.