हातकणंगले / प्रतिनिधी
दि.20/2/21
आनंद गंगा फाऊंडेशनचा 'यशस्वी उद्योजक' पुरस्कार चंद्रकांत पाटील यांना माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
संजय घोडावत शिक्षण संकुलामध्ये आनंद गंगा फाऊंडेशनचे अध्यक्ष तानाजी पोवार यांच्या सामाजिक उपक्रमातून हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी शिक्षण सभापती प्रवीण यादव,सभापती डॉ.प्रदीप पाटील ,विश्वस्त विनायक भोसले,प्राचार्य विराट गिरी ,गटशिक्षणाधिकारी प्रवीण फाटक,शिक्षक बँकेचे चेअरमन प्रशांत पोतदार,शिक्षक नेते एन. वाय. पाटील,अर्जुन पाटील,अनिल चव्हाण, सरपंच रंजना जाधव,अरविंद खोत,शिक्षक बँक संचालक दिलीप पाटील,साहेब शेख,जी.एस. पाटीलसह मान्यवर उपस्थित होते.